Skip to main content

परत एकदा १८९७

लेखक विकास यांनी बुधवार, 05/08/2009 20:20 या दिवशी प्रकाशित केले.
पुण्यात स्वाईन फ्लूचा पहीला बळी पडला आणि सरकारला खडबडून जाग आली. ११० स्वाईन फ्लूचे रुग्ण आहेत, त्यात ११ शाळांमधले ७० विद्यार्थी आहेत. आता अजून शाळा, क्लासेस वगैरे बंद ठेवणे अजूनच वाढले आहे. मात्र सरकारला जाग येण्यासाठी इतका वेळ लागावा हे दुर्दैव. पण जाग आल्यामुळे सरकारने जो कायदा/नियम तात्काळ लागू (activate) केला आहे तो वाचून आश्चर्य वाटले. "संसर्गजन्य रोग प्रतिबंधक कायदा १८९७" असे त्याचे नाव आहे. तत्कालीन प्लेगच्या साथीमुळे हा कायदा तयार केला गेला होता आणि याच कायद्याचा वापर रँडच्या आज्ञेने कसाही केला गेला होता. परीणामी २२ जून १८९७ ला रँडचा "गोंद्या आला रे" झाला.

'नांदा सौख्यभरे' (राखी तू मांडले। तुझे स्वयंवर)

लेखक अविनाश ओगले यांनी बुधवार, 05/08/2009 19:08 या दिवशी प्रकाशित केले.
राखी तू मांडले। तुझे स्वयंवर 'वर' अनावर। देशोदेशी 'टीआरपी'साठीच। मिडियाचा स्टंट प्रसिद्धी इंस्टंट। मिळे तुला आपुल्या देहाचा। मांडसी बाजार कैसा हा आजार। राखी तुझा भारतीय नार। आहेस तू राखी संस्कृतीची 'राखी'। लाज थोडी देतो आशीर्वाद। लग्नगाठ बांधा एकाशीच 'नांदा। सौख्यभरे' -अविनाश ओगले
काव्यरस

राखी : देवस्थळी ते सावंत!

लेखक आपला अभिजित यांनी बुधवार, 05/08/2009 18:39 या दिवशी प्रकाशित केले.
rakhi राखीपौर्णिमेचं लहानपणापासूनच कधीही फारसं अप्रूप नव्हतं. एकतर मला सख्खी बहीण नाही. त्यामुळे तिच्याकडून राखी बांधून घेण्याची क्रेझ नव्हती. मामेबहिणी कधीतरी असायच्या रत्नागिरीत. तेव्हा राखीबंधनाचा सोहळा व्हायचा. पण ती राखी नैसर्गिक न वाटता, "बंधन'च वाटायचं. शेजारची स्वरूपा लहानपणापासून राखी बांधायची. आजही बांधते.

संस्कार

लेखक विनायक प्रभू यांनी बुधवार, 05/08/2009 13:15 या दिवशी प्रकाशित केले.
चुकले मी परत अस कधीही करणार नाही. तुझी शप्पथ. तुला वाटत तस काहीही नाही. हव तर मार परत एकदा मला. तु सांगशिल ती शिक्षा मला मंजुर आहे. आता इतर मैत्रीणी ऐनवेळी आल्या नाहीत त्याला मी काय करु? आता ही पोर हाताशी नसती तर हीला कधीच सोडली असती. आई म्हणायच का ह्या बयेला? कसले संस्कार आयशीच्या घोवाचे. तरी सांगत होतो एवढा जाच करु नकोस. नाही दिवस राहीले पुर्वीचे. हिच्या आग्रहाकरता कन्या शाळेत घातली. आता पोर रुपाने माझ्यावर गेली त्यात तीचा काय दोष? ही तीच्या रुपावर जळते की काय? ३६ गुण मिळतात म्हणून बापाने सांगितले. लग्न केले. लग्न कसले बोडक्याचे. १७ वर्षाचा जाच झाला. प्रत्येक गोष्टीत उलटच डोक चालत. लग्न जेम

फुलांच्या देशात ......

लेखक विशाल कुलकर्णी यांनी बुधवार, 05/08/2009 11:29 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या कंपनीचे (फुग्रो) हेडऑफीस लायशेंडॅम (Leichendam) हॉलंड इथे असल्याने दरवर्षी किमान दोन तरी चकरा होतातच हॉलंडच्या. यावेळी कालच्या मे महिन्यात परत एक दौरा झाला. यावेळी वुरबर्ग येथे राहण्याची सोय केली होती कंपनीने. इथे आलो की इथली फुले कॅमेर्‍यात पकडणे हा माझा छंद असतो. या वेळी ठरवले होते की नेहेमीच ट्युलीप्स च्या मागे लागतो, (मग सिझन असो वा नसो, मी आपला ट्युलीप्स शोधत फिरतो वेळ मिळेल तसा) या वेळेस त्या वाटेला जायचे नाही. मग इतर फुलांच्या मागे लागलो.

आंतरराष्ट्रीय बीयर दिवस

लेखक सुनील यांनी बुधवार, 05/08/2009 10:48 या दिवशी प्रकाशित केले.
आज आंतरराष्ट्रीय बीयर दिवस आहे, हे मिपाकरांच्या ध्यानात आलेले दिसत नाही! असो, सध्या कार्यबाहुल्यामुळे वेळ नाही, परंतु सविस्तर लेखासाठी जागा राखून ठेवत आहे!!

महाबळेश्वर ते कास... चालत...

लेखक विमुक्त यांनी बुधवार, 05/08/2009 10:39 या दिवशी प्रकाशित केले.
माझा मित्र यशदीप साताऱ्याचा. त्यामुळं मी बऱ्याचदा साताऱ्याला जात असतो. साताऱ्याच्या आसपास भरपूर भटकून झालयं. अजिंक्यतारा, यवतेश्वर, कास, बामणोली, जरंडा, नांदगीरी (कल्याणगड), सूळपाणी, मेरुलींग, पाटेश्वर, माहुली असं बरचंस भटकलोय. पण कासची मजा वेगळीच. केवढं ते पठार!!! मस्त बेभान वारा असतो; आणि गर्दी, गोंधळ अजीबात नसल्यामुळं फारच निवांतपणा जाणवतो. पाऊस संपत आल्यावर बारीक-बारीक रंगीबेरंगी गवतफुलं बघतानातर जणू जमीनीवर रंगीत गालीछा अंथरल्या सारखं वाटतं. असंच एकदा कासच्या पठारावर असताना... यशदीप: पश्या...