Skip to main content

री-टायर

लेखक विनायक प्रभू यांनी बुधवार, 12/08/2009 17:01 या दिवशी प्रकाशित केले.
"तु आता लुंगी घालत जाउ नकोस. लाँग शॉर्टस घालत जा. (कित्ती विरोधाभास) चालेल. लुंगी संभाळणे जरा अवघडच जाते मला.पण हे लाँग शॉर्ट्स म्हणजे काय? गुढग्यापर्यंतच्या हाफ पँटस म्हणजे लाँग शॉर्टस. बर बर. "जरा गाणे पण शिकुन घे" मी आणि गाणे? ते का बरे? "शास्त्रीय नको. जरा हलके फुलके असले तर पुरे. तसा तुझा आवाज काही वाईट नाही. गणपतीत तुझे ' नको देवराया' हे गाणे सर्वांना आवडते." बर बर. "जमल्यास गिटार पण शिकुन घे?" मी आणि गिटार? खुळावलीस काय? "काही नाही ,शिकल्यास सर्व काही येते?" अग, पण हे कशासाठी? तुझे काही रीटायर्मेंट प्लान आहेत की नाहीत. हो आहेत.

रणथंभोर राष्ट्रिय व्याघ्र प्रकल्प सहल

लेखक श्रीराम पेंडसे यांनी बुधवार, 12/08/2009 16:08 या दिवशी प्रकाशित केले.
रणथंभोर राष्ट्रिय व्याघ्र प्रकल्प सहल मी रोज सकाळी पर्वतीला जात असतो. जून महिन्यातल्या पहिल्या आठवड्यात तिथे "इन सर्च आउटडोअर्स" यासंस्थेच्या, ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोजीत केलेल्या सहलींचे परिपत्रक मिळाले. माझे मेहुणे बरीच अभयारण्ये हिंडून आले आहेत. त्यांच्याशी चर्चा केली. तेंव्हा ते म्हणाले की रणथंभोरला वाघ दिसण्याची शक्यता सर्वात जास्त आहे. जून २३ला इन सर्च आउटडोअर्सची रणथंभोरची सहल होती. तेंव्हा त्यांच्याबरोबर जायचे ठरवले. सहलमूल्य भरलं. आमचा १० जणांचा ग्रूप होता. ६ ज्येष्ठ नागरिक आणि उरलेले तरूण पिढीचे प्रतिनिधी असे आम्ही होतो. जायचा दिवस उजाडला. पुणे बस स्टेशनवर आलो.

एक कोडं

लेखक विमुक्त यांनी बुधवार, 12/08/2009 15:45 या दिवशी प्रकाशित केले.
एक नळ, ५ वेळा संपुर्ण फिरवला की पुर्ण उघडतो आणि त्यातुन १० l/min ह्या रेटनं पाणी पडतं... नळ उघडताना/बंद करताना पाण्याच्या प्रवाहा मधे होणारी वाढ/घट constant आहे... मला जर १० liter पाणी हवं आहे... मला नळ एका constant angular velocity नं उघडायचा आणि बंद करायचाय... तर ती constant angular velocity किती? ***** मिपावर कोडी टाकलीतर चालतील ना?*****

एक मराठी गाणे हवे आहे..

लेखक अरुण वडुलेकर यांनी बुधवार, 12/08/2009 14:00 या दिवशी प्रकाशित केले.
समस्त मिपाकरहो, नमस्कार मला " एकदा सार्‍या प्राण्यांची भरली होती सभा पोपट होता सभापति मधोमध उभा" हे गाणे (त्या गाण्याचा ओळी) हव्या आहेत. माझ्या नातीला हे गाणे शाळेच्या विविध गुणदर्शन कार्यक्रमांत म्हणायचे आहे. दुर्दैवाने मला हे गाणे पूर्णत: आठवत नाही. तेंव्हा विनंती ही की, ज्या कोणाला हे गाणे आठवत असेल त्यांनी कृपया ते मिपावर द्यावे किंवा मला व्यनिने पाठवावे. कळावे. अरुण वडुलेकर.

मुक्तचिंतन

लेखक राघव यांनी बुधवार, 12/08/2009 12:52 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्क्लेमर: धर्म या संकल्पनेबद्दल, मी, माझ्या अल्पमतीने, केलेला हा विचार आहे. एकामागून दुसरा विचार निघत जातो, प्रश्न पडत जातात अन त्यांचे उत्तर शोधण्याचा प्रवास सुरू होतो. त्यामुळे कदाचित थोडा विस्कळीतही वाटेल. मला गद्य लिहिणे काही तितकेसे सहज जमत नाही. मांडायचा प्रयत्न करतोय. चु.भु.द्या.घ्या. ---------------------------------------------------------------- धर्म. काय शब्द आहे हा नाही? जबर. काय व्युत्पत्ती याची तेही नक्की माहीत नाही. पण हा शब्द, त्यामागची संकल्पना अस्तित्वात यायचे मुळात कारणच काय असावे? जर धर्म या संकल्पनेशिवाय माणसे जगली असती तर कशी जगली असती?

भारतीय !

लेखक विशाल कुलकर्णी यांनी बुधवार, 12/08/2009 12:00 या दिवशी प्रकाशित केले.
हे जळणं आता रोजचंच आहे बंदुकीच्या गोळीशी आमचं नातं फार जवळचं आहे बंदुक माझ्याकडेही आहे पण चापावर बोटच येत नाही मी अगदी शांत आहे ..........कारण मी भारतीय आहे मी कधीचा शांतता मागतोय ते मात्र आर. डी. एक्स.

निर्मुलनवाल्यांचे निर्मुलन

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी बुधवार, 12/08/2009 10:40 या दिवशी प्रकाशित केले.
हॅहॅहॅ! अंनिस लई ट्याव ट्याव करती आहे काय? गेली कैक वर्षे साधा जादुटोणा विरोधी कायदा अजुन संमत होत नाही.त्याला अनेक पैलु आहेत. राजकीय, आर्थिक,सामाजिक,वैचारिक हितसंबंध त्यात गुंतलेले आहेत. असो शेवटी ती लोकशाही प्रक्रिया आहे. समाजात अंधश्रद्धा राहाव्यात अस कुणाही सुज्ञास वाटत नाही.या विचाराला चार्वाकापासुन परंपरा आहे.संतांनी देखील आपापल्या परीने मोठे योगदान कले आहे. तरी पण अंनिस हा नेहमी टीकेचा/चर्चेचा विषय असतो. तो असायलाही हवा. नाहीतर समाजमनाची स्पंदने कशी कळणार? वैचारिक उवांनी आमचे डोके नेहमीच खाजते. ते खाजवत खाजवत आम्ही वैचारिक रद्दी चाळत होतो.

अभ्यास बुडू नये म्हणून काय उपाययोजना करता येईल?

लेखक अमृतांजन यांनी बुधवार, 12/08/2009 07:07 या दिवशी प्रकाशित केले.
हा धागा "घोषित रुग्ण/एकुण संशयित रुग्ण: रेशोची वाढ/उतार व शाळकरी मुले" ह्या धाग्यातून निर्माण केला आहे. "....अशी शंका असेल तर शाळा अधिक काळ बंद करावी की नाही, ह्याचा विचार ईन्फॉर्म्ड डिसीजन असेल. शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला तर किती पालक मुलांना शाळेत पाठवायला तयार होतील ही शंकाच आहे. मुलांना घरी ठेवून घेतले तर त्यांचा अभ्यास बुडू नये म्हणून काय उपाययोजना करता येईल हे पहाणे योग्य ठरावे.