Skip to main content

माझी पण एक (पाडीव) कविता (काव्यरस - टिंगल)

लेखक युयुत्सु यांनी गुरुवार, 20/08/2009 09:40 या दिवशी प्रकाशित केले.
बळेच शब्दा वेठीस धरूनी भाव नाना वाकवितो असामान्य वा असो अमान्य बसुनी कविता कवि वितो बुध्दीची मम झेप नवी ही नेते बरं का दिगंतरी पाहून तिजला भरेल धडकी प्रिय मित्रा तव हृदंतरी ग्रहगोलांची अगणित सूत्रे अणुरेणूंची पण तशीच ती विश्वाच्या व्यापाहून भयंकर जीवघेण्या त्या मात्रांची रे प्रिय मित्रा हितगुज करण्या मार्ग नवा मी अनुसरला झटापटीने कविता करता शुद्ध कशाची नुरे मजला व्याकरणाची फिकीर नसे पण प्रासासाठी व्याकुळता काकुळतीने पणास लावी पणजोबांचे(*) पुण्य आता * माझे पणजोबा कै. विठ्ठल सीताराम गुर्जर हे मराठीतले जुन्या पिढीतील नामवंत साहित्यिक होते. कै. राम गणेश गडकर्‍यांचे ते जीवश्च कंठश्च मित्र.

माझी गाथा .....!

लेखक विशाल कुलकर्णी यांनी गुरुवार, 20/08/2009 09:40 या दिवशी प्रकाशित केले.
लपवणे ते झाले सुरू, माझेच माझी यातना राम न उरला काही, आरंभीच संपली कथा ! नसे अभंग नामयाचा, नच विरहिणी मीरेची साकळली वेदना सारी, मी रचितो माझी गाथा ! विसरल्या सार्‍या श्रुती, अश्रुत भिजल्या आर्या जखमा सार्‍या ओल्या, मी घोकतो जुन्याच संथा ! ना स्मरे मंत्र आता, ना आठवते मज हरिनाम वेदनांचे हे वेद माझे, विसरल्या त्या जून प्रथा ! हे भोग मम प्राक्तनीचे, नकोत पळवाटा नव्या संपते जिथे दु:ख जुने, जन्मा येते नवी व्यथा ! विशाल.

आमच्या गावचा पोळा

लेखक अनामिक यांनी गुरुवार, 20/08/2009 09:27 या दिवशी प्रकाशित केले.
फोटो जालावरून साभार आज श्रावणी अमावस्या, म्हणजे पोळा. घरच्या बैलांची पुजा करून त्यांच्या कामाबद्दल त्यांना धन्यवाद द्यायचा दिवस. महाराष्ट्रातल्या संपुर्ण ग्रामीण भागात आजही आनंदाने साजरा होणारा सण. हा सण येतोही अगदी श्रावण महिण्याच्या शेवटी, जेव्हा शेतातली पेरणीची कामे संपलेली असतात. शेतकर्‍याच्या डोक्यावरचा भार बैलांच्या मदतीने पुर्ण हलका झालेला असतो.

आठवते का सारे सारे?

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 20/08/2009 09:22 या दिवशी प्रकाशित केले.
आस्वाद घ्या!
आठवते का सारे सारे?
आठवते का सारे सारे? आठव ते सारे || ध्रु ||

मावळतीचा सुर्य लाल गुलाबी उगवतीचा चंद्र अन पहिली चांदणी ते शांत गंधीत वारे आठवते का सारे सारे? || १ ||

खडक मोठा ओहोटीतला तेथेच बसायचा असे हट्ट आपूला फेसाळत्या लाटांतले गोरे पान पाऊले आठवते का सारे सारे? || २ ||

Social Cohesion and Human Nature या बर्ट्राण्ड रसेलच्या निबंधाचा स्वैर अनुवाद

लेखक युयुत्सु यांनी गुरुवार, 20/08/2009 08:20 या दिवशी प्रकाशित केले.
Social Cohesion and Human Nature या बर्ट्राण्ड रसेलच्या निबंधाचा स्वैर अनुवाद टीप - निसर्गाचे नियम समाजाच्या नियमांपेक्षा नेहमीच श्रेष्ठ असतात. निसर्गाला दडपायचे असेल तर माणसाला फार मोठी किंमत मोजावी लागेल. हा या रसेलच्या निबंधातील गर्भित इशारा मला खूप भावला म्हणून मी त्याचा अनुवाद करायचा प्रयत्न केला आहे. हा निबंध वाचताना आजच्या संदर्भांच्या अनुषंगाने काही विचार डोक्यात आले ते तळटीपा म्हणून दिले आहेत. या टीपा मूळ निबंधात नाहीत. - राजीव उपाध्ये मानवासहित सर्व समाजप्रिय प्राण्यामध्ये सहकार आणि एकी या पायाभूत प्रेरणा आहेत.

बैलपोळ्याच्या शुभेच्छा !!

लेखक लिखाळ यांनी गुरुवार, 20/08/2009 01:05 या दिवशी प्रकाशित केले.
रामराम मंडळी ! आज बैलपोळा ! सर्व नवरोंबांसाठी आज धुणी-भांडी, केर-वारे या पासून विश्रांतीचा दिवस. मस्त पुरणपोळी खाऊन लोळत पडण्याचा दिवस ;) समस्तांना बैलपोळ्याच्या शुभेच्छा :) आज आपण दिवस कसा घालवणार ते (सांगण्यासारखे असेल ;) तर) सांगा. आणि बैलपोळ्याला बैलाला सजवतात तर आपण काही खास नट्टापट्टा केला असेल तर ते सुद्धा सांगावे :) --लिखाळोबा

खरड वही

लेखक गोगट्यांचा समीर यांनी बुधवार, 19/08/2009 23:41 या दिवशी प्रकाशित केले.
बहुतेक हा प्रश्न माझ्यासारख्या नवोदितांना पडत असेल ,आणि मला नेमके कुठे लिहायचे ते न कळल्याने इथे लिहित आहे.. दुसर्‍यांच्या खरड वहीत आपण कधी लिहु शकतो , बरेच दिवस ही सुविधा चालु होत नाही का ? आणि ती कधी चालु केली जाते ?

मनातली शाळा

लेखक हृषीकेश पतकी यांनी बुधवार, 19/08/2009 22:31 या दिवशी प्रकाशित केले.
अडगळीच्या खोलीमधलं दप्तर आजही जेव्हा दिसतं | मन पुन्हा तरूण होऊन बाकांवरती जाऊन बसतं || प्रार्थनेचा शब्द अन शब्द माझ्या कानामध्ये घुमतो | गोल करून डबा खायला मग आठवणींचा मेळा जमतो || या सगळ्यात लाल खुणांनी गच्च भरलेली माझी वही | अपूर्णचा शेरा आणि बाई तुमची शिल्लक सही || रोजच्या अगदी त्याच चुका आणि हातांवरले व्रण | वहीत घट्ट मिटून घेतलेत आयुष्यातले कोवळे क्षण || पण या सगळ्या शिदोरीवरंच बाई आता रोज जगतो | चुकलोच कधी तर तुमच्यासारखं स्वतःलाच रागवून बघतो || इवल्याश्या या रोपट्याची तुम्ही इतकी वाढ केली आहे | हमखास हातचा

मी व १५० लेख !

लेखक दशानन यांनी बुधवार, 19/08/2009 14:22 या दिवशी प्रकाशित केले.
जेव्हा मिपा चालू झाले तेव्हा पासून आजपर्यंत आपण काय काय लिहले हे पाहू हा विचार करताना दोन दिवसात मला स्वतःलाच नवल वाटले की मी मिपावर जवळ जवळ १५० च्यावर लेख / कथा /अनुभव /कविता /विडंबने /चर्चा लिहल्या.... बाप रे ! शालेय जिवनात कधीही धड बसून एक पान व्यवस्थीत लिहलेले आठवत नाही व येथे येवढे लेखन.... माझी सफरचे मी वीस भाग व बाहुबली हॉस्टेलचे दिवस चे मी सात भाग असे दोन मोठे अनुभव लेखन मी केले... मी आधी मनोगतवर हलके फुलके लिहण्याचा प्रयत्न केला होता पण माझ्या लेखामधील अशुध्द भाषा व हिंदी शब्द ह्यामुळे मला तेथे नेहमीच खडे बोल वाचावे लागत ;) पण मिपावर माझे शुध्द-अशुध्द..