राम राम मंडळी,
आपण नेहमीच शिणेमे पाहतो, त्याचा बरावाईट काय असेल तो शेवट पाहतो आणि घरी येतो.. त्यानंतर त्या कथेचं पुढे काय झालं असेल याचा विचार सहसा करत नाही. माझ्या मात्र मनात पुढील कथेबद्दल, त्यातील पात्रांबद्दल पुढे काय झालं असेल या बद्दल उत्सुकता असते.
आता शोलेचंच उदाहरण घ्या आणि द्या पाहू आपापल्या कल्पनाविलासाप्रमाणे खालील प्रश्नांची उत्तरे - :)
१) गब्बरला पोलिसांनी पकडल्यावर, जय मेल्यावर पुढे वीरू आणि बसंती कुठे स्थायिक झाले असतील?
२) वीरूने चोर्यामार्या सोडल्या असतील का?