एक कोडे
आधुनिक मानवाच्या काही श्रद्धा मला नेहेमी कोड्यात टाकतात. याचे मला कधी हसू
येते तर कधी त्यांची कीव करावीशी वाटते. उदाहरणच सांगायचे झाले तर मानवाची इतर
प्राणी जगतापासून स्वत:ला वेगळे ठेवण्याची धडपड... आधुनिक मनुष्यप्राणी स्वत:ला
इतर प्राण्यांपेक्षा श्रेष्ठ समजतो. या श्रेष्ठत्वाचे तो अनेक तर्हांनी समर्थन
करतो. हे श्रेष्ठत्व टिकवण्यासाठी अनेक भल्याबुर्या मार्गांचा अवलंब आजवर
त्याने केला आहे. माणसाचा 'विकास' पावलेला मेंदू हा या समर्थनाचा मुख्य आधार
आहे.
या विकास पावलेल्या मेंदूने प्रश्न सोडवले किती आणि निर्माण केले किती? असा जर
शोध घ्यायचा प्रयत्न केला तर प्रामाणिकपणे उत्तरे देणे अनेकांना कठीण जाईल.
उदाहरण जर घ्यायचे झाले तर धार्मिक तेढीचे घेता येईल. माणसाचा विकास पावलेला
मेंदू युद्ध, दहशतवाद, मूलतत्त्ववाद हे प्रश्न अजिबात हाताळू शकत नाही. आज
कुणालाही दुर्धर आजारांनी ग्रासलेले असले तर आधुनिक वैद्यकीय उपचार उपलब्ध
आहेत. पण ते वेळेवर मिळतील कि नाही याची खात्री देता येत नाही. आणि जर ते
मिळालेच तर ते उपचारच जीवावर उठतील का हे पण सांगता येणार नाही. मुंबईच्या
लोकल्सना बॉंब स्फ़ोटापासून कुणीही वाचवू शकत नाही किंवा एखाद्या विमानाचे अपहरण
होईल का हे पण कुणाला सांगता येणार नाही.
थोड्क्यात सांगायचे झाले तर आजवर सतावणार्या प्रश्नांची जुजबी आणि तात्पुरती
उत्तरे सापडली की माणसाचा विकास पावलेला मेंदू सुखावतो. हे प्रश्न ज्यांना कधिच
सतावणार नाहीत अशा अलिप्तपणे जगणार्या मनुष्येतर प्राण्यांना मात्र तॊ हीन
लेखतो. कारण मला वाटत की माणसाचं मनुष्यत्त्व प्रश्न निर्माण करण्यात अडकलं
आहे. आता हेच बघा ना, मनुष्येतर प्राण्यांचे मूळ प्रश्न - आहार निद्रा मैथुन -
हे त्यांच्या मेंदूचा विकास न पावल्याने सीमित राहिले आहेत.
आता मला हे सांगा आपल्या अस्तित्वाचे प्रश्न सीमित असणं हे लक्षण श्रेष्ठपणाचे
की भ्रष्टपणाचे? विकासाचे की अधोगतीचे? या प्रश्नाचे उत्तर ठाउक असून दिले
नाहीत तर तुमच्या डोक्याची शंभर शकले होऊन ती तुमच्याच पायाशी लोळू लागतील...
वाचने
3710
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त कोडे-माझी उत्तरे
ज्योतिषाल
In reply to मस्त कोडे-माझी उत्तरे by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
एबर्टीन तंत्र
In reply to ज्योतिषाल by युयुत्सु
ते आमच्या
In reply to एबर्टीन तंत्र by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रश्न
माणसाच्या
In reply to प्रश्न by प्रकाश घाटपांडे
आधुनिक
इतके बोलुन
In reply to आधुनिक by कानडाऊ योगेशु
मनुष्येतर
ह्म्म्म्म...
खरं आहे, एकलव्या . .
या
प्रश्न
तुका म्हणे ऊगी रहावे | जे जे होई ते ते पहावे ||
सुन्दर.......
In reply to तुका म्हणे ऊगी रहावे | जे जे होई ते ते पहावे || by हर्षद आनंदी
चांगली