Skip to main content

एका तळ्यात होती .......

लेखक सुनील यांनी सोमवार, 12/10/2009 09:54 या दिवशी प्रकाशित केले.
कमळे फुले सुरेख ....... अलिबागजवळील कुरुळ हे गाव तेथिल कमळाच्या तळ्यासाठी प्रसिद्ध आहे. परवाच त्या परिसरात गेलो असता पाहिले, तर तळे कमळांनी भरून गेले होते.

गूढ कथा: अगम्य आघात!!!

लेखक निमिष सोनार यांनी सोमवार, 12/10/2009 09:32 या दिवशी प्रकाशित केले.
दि: ९/९/२००९, ९:०० पियुष पार्क सुजय सूर्वे गाढ झोपेतून जागा झाला तेव्हा सकाळचे नऊ वाजले होते. खिडकीतून पाहिल्यावर कधी नव्हे तो सूर्य आज अगदी तेजस्वी दिसत होता. सुजय अगदी अभ्यासू आणि आज्ञाधारक मुलगा. तितकाच अंगापिंडाने मजबूत. रोजच्या दिनक्रमात व्यायामाला तो महत्त्व द्यायचा. यंदाचे बारावीचे वर्ष. पीसीएम ग्रुप निवडला होता त्याने. मॅथ्स त्याचा आवडता विषय. रोज सकाळी पाच वाजता उठून तो सहा वाजता सुरू होणार्‍या मॅथ्स च्या ट्युशन साठी तयार व्हायचा. ट्यूशनला जायला पप्पांनी घेवून दिलेली स्कूटी त्याला उपयोगी पडायची. बोचरी थंडी. बरेचदा धुके रस्ता व्यापून टाकायचे.

माझे 125 वर्षाचे आजोबा.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी सोमवार, 12/10/2009 09:25 या दिवशी प्रकाशित केले.
"कदाचीत माझे आजोबा आता मला माझ्या जीवनात मार्ग दाखवण्याच्या रुपात असतील,माझ्या स्मृतीच्या रुपात असतील किंवा आणखी काही रुपात असतील,हे खरंच मला सांगता येणार नाही." आज माझे आजोबा जीवंत असते तर ते 125 वर्षाचे असते.माझ्या दहाव्या वर्षी ते गेले.त्यावेळी ते साठ वर्षाचे होते.त्यावेळी माणसाला आयुर्मान कमीच असायचं. माझ्या आजोबांवर माझं खूप प्रेम होतं.आणि त्यांचं प्रेम आम्हा सर्व नातवंडावर होतं.माझे गोरेपान आजोबा स्वच्छ जांभळ्या रंगाचं सोवळं नेसून,वरून उघडे आणि खांद्यावरून कमरेकडे लोंबणारं त्यांचं जानवं, हातात ताम्हाण घेऊन गायत्री मंत्र मनातल्या मनात पुटपुटत संपलेल्या पुजेचं आचमन करून झालेलं ताम्हाणातल

याचे गाणे ऐकाच

लेखक अन्वय यांनी सोमवार, 12/10/2009 00:33 या दिवशी प्रकाशित केले.
हेमंत ब्रीजवासी या बालकाचे गाणे ऐकले. डोळ्यात पाणीच उभे राहिले. काय तयारी आहे त्याची. http://lilchamps2009.mypopkorn.com/videos/hemant-brijwasi-performance-o… तुम्ही पण ऐका

सुधारस

लेखक प्रभो यांनी सोमवार, 12/10/2009 00:05 या दिवशी प्रकाशित केले.
काल दिवसभर टंकाळा केल्याने रात्री स्वतः काहीतरी बनवून खायचा मूड आला.. बरेच दिवसात सुधारस खाल्ला नव्हता, बनवायला ही सोपा म्हणून बनवला आणी फस्त केला. त्याचीच ही पाकृ. कच्चा मालः १. अर्धी वाटी साखर २. ३-४ चमचे लिंबाचा रस ३. पाण्यात भिजवलेलं केशर अथवा जिलेबीचा रंग ४. वेलदोडे (३-४) ५. सुका मेवा (काजू, बदाम, बेदाणे आणी चारोळे) एका पातेल्यात साखर आणी समान पातळीत पाणी घ्या. त्याचा पाक बनवा.

फक्त तुझ्यासाठी...(परत कविताच!)

लेखक प्रभो यांनी रविवार, 11/10/2009 23:24 या दिवशी प्रकाशित केले.
काल तीला भेटणार होतो...पण ऑफिसमधे काम आल्याने बाईसाहेब काही भेटायला येउ शकल्या नाहीत...बसल्या बसल्या खालील कविता सुचली.. त्या दिवशी होती सकाळ कुंद ढगांनी भरलेली | ओले केस घेऊन न्हालेली तू बस साठी थांबलेली || वाटलं तुझ्या ओल्या केसातून फिरावं वारा बनून | काळजाची धकधक वाढली तुझ्या गालावरची खळी पाहून || तुझ्या त्या डोळ्यांच्या समुद्रात मारावी वाटतेय डुबकी | काढलेल्या तुझ्या आठवणींनी लागते का गं रोज उचकी || आजकाल तुझं दिसणं झालय आमवस्या पौर्णिमा | वेडा करतो गं तुझ्या गालावरचा तो कातील रक्तीमा || तू नसलीस जवळ की मन भटकतं माझं रानी-वनी | विश्वास ठेव माझ्यावर तूच बसलीय गं माझ्या मनी ||
काव्यरस

अमावस्या..

लेखक प्राजु यांनी रविवार, 11/10/2009 18:47 या दिवशी प्रकाशित केले.
काळोख भयाण किरकिर रानात रंगला आगळा खेळ चंद्राला शोधून चांदण्या थकल्या आलीया आवसेची वेळ सळसळ दाटली झाडांच्या पानांत वाराही बेभान झाला घुमघुमं घुमघुमं कडेकपारीत गारवा भरून गेला चुरचुरं पाऊल रानांत चाहूल रातीचा नूर हा न्यारा भिरभिरं पाकोळी होऊन गोंधळी काळोख जागवी सारा चमचमं चमचमं चुकार काजवा क्षणिक ठिगळ लावी लखलख प्रकाश रेखूनी उगाच रातीला भय तो दावी फ़ुंकूनी तांबडं क्षितिज रंगलं पहाट मंगल झाली दिसेल चांदवा आजच्या रातीला अवनी निवांत झाली - प्राजु
काव्यरस

साला खरोखर आपल्या DNA मध्येच लोच्या आहे...यार

लेखक दशानन यांनी रविवार, 11/10/2009 15:18 या दिवशी प्रकाशित केले.
३०० नक्षलवाद्यांचा जमावडा .. चार बाजूने हल्ला.. मर्यादित शस्त्रसाठा... ४० जणांच दल.. अंधाधुंद गोळीबार... सगळेच जखमी... मदतीसाठी हाक... पाच मिनिटावर असलेले हेलिकॉप्टर.. राजनेत्याच्या दिमाखतीमध्ये.. पाच तासाची तगमग... दलातले १७ जण ठार.... चार हेलिकॉप्टर.. आहेत म्हणे सेवेसाठी.. सगळेच निकामी.. १७ जीव गेले ... नेत्याची सभा पुर्ण झाली..

व्याकरण

लेखक श्रावण मोडक यांनी रविवार, 11/10/2009 12:25 या दिवशी प्रकाशित केले.
तू सांगितलंस म्हणून नात्यांचं व्याकरण समजून घेताना संबंधांच्या जाती लिहू लागले तेव्हा... तेव्हा म्हणालास, ‘’नाम, सर्वनाम, विशेषण आणि अव्ययाच्या या खेळात पडतेसच कशाला? नातं दोघांसाठी असतं, अन् व्याकरण नातं जोखणाऱ्यांसाठी. नात्याची जात एकच - नातं हीच" प्राधान्य ठरवण्याची वेळ आली तेव्हा हेच शब्द तुझा आधार ठरले कारण त्या प्राधान्यात नातं दोघांचंच होतं माझा आधारच काढून घेणारं! *** गेल्या अवकाळी पावसात आपण सावरलो होतो पुन्हा अवकाळी पाऊस आलाय... आता आवरून घ्यायचं आहे वाहून गेलेली स्वप्नं विसरण्याचा खटाटोप तरी करावाच लागेल, कारण पावसात भिजण्याचं एक स्वप्न त्यातलंच! तू भिजला असशील!
काव्यरस

सहस्रचंद्रदर्शन

लेखक प्रशांत उदय मनोहर यांनी रविवार, 11/10/2009 10:46 या दिवशी प्रकाशित केले.
खरडवहीतल्या देवाणघेवाणीतून हा विषय निघाला. पूर्वी माझ्या ब्लॉगवर याबद्दल माहिती दिली होती. त्यामुळे नवीन काही न टाकता तीच माहिती इथे सर्वांच्या सोयीसाठी देत आहे - हिंदू संस्कृतीत जन्मदिवस साजरा करण्याची प्रथा फार जुनी आहे. सांस्कृतिक देवाणघेवाणीमुळे जन्मदिवस साजरा करण्याची पाश्चात्य पद्धतही भारतात आता चांगलीच रूढ झाली आहे. तरी, निदान काही जन्मदिवस आपल्या संस्कृतीप्रमाणे साजरे करावेत अशी विचारधाराही अस्तित्वात आहे व त्यातून एकसष्ठी, पंचाहत्तरी, सहस्रचंद्रदर्शन, इत्यादि सोहळे लोकप्रिय झालेत. संस्कृतीचं जतन करणे ही बाब निश्चितच स्तुत्य आहे.