मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सुधारस

प्रभो · · पाककृती
काल दिवसभर टंकाळा केल्याने रात्री स्वतः काहीतरी बनवून खायचा मूड आला.. बरेच दिवसात सुधारस खाल्ला नव्हता, बनवायला ही सोपा म्हणून बनवला आणी फस्त केला. त्याचीच ही पाकृ. कच्चा मालः १. अर्धी वाटी साखर २. ३-४ चमचे लिंबाचा रस ३. पाण्यात भिजवलेलं केशर अथवा जिलेबीचा रंग ४. वेलदोडे (३-४) ५. सुका मेवा (काजू, बदाम, बेदाणे आणी चारोळे) Image removed. एका पातेल्यात साखर आणी समान पातळीत पाणी घ्या. त्याचा पाक बनवा. साखर विरघळत आल्यावर त्यात वेलदोडे टाका. Image removed. पाक थोडा घट्ट झाल्यावर थंड व्हायला ठेवा.त्यात पाण्यात भिजवलेले केशर / रंग घाला. थोडा थंड झाला की त्यात ३-४ चमचे लिंबाचा रस घालून ढवळा. Image removed. त्यात सुका मेवा टाका. आणी थंड होऊ द्या. Image removed. वाढायच्या वेळेस बाउल मधे काढा आणी सर्व करा. Image removed. ह्यासोबत मी बनवलं होतं बॉईल्ड स्वीट कॉर्न. यासाठी स्वीट कॉर्न उकडून घ्या. एका पातेल्यात थोडीशी फोडणी करा. त्यात थोडे शेंगदाणे भाजा. त्यात स्वीट कॉर्न टाका. वरून धणेपूड, तिखट मीठ भुरभुरवा. एका बाउल मधे काढून सर्व करा. सर्व करताना वरुन थोडं लिंबू पिळा. Image removed. हे माझं जेवणाचं ताट. सुधारस , बॉईल्ड स्वीट कॉर्न आणी पोळी (पोळी भाजी केंद्रातली) Image removed.

वाचन 7378 प्रतिक्रिया 0