मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

व्याकरण

श्रावण मोडक · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
तू सांगितलंस म्हणून नात्यांचं व्याकरण समजून घेताना संबंधांच्या जाती लिहू लागले तेव्हा... तेव्हा म्हणालास, ‘’नाम, सर्वनाम, विशेषण आणि अव्ययाच्या या खेळात पडतेसच कशाला? नातं दोघांसाठी असतं, अन् व्याकरण नातं जोखणाऱ्यांसाठी. नात्याची जात एकच - नातं हीच" प्राधान्य ठरवण्याची वेळ आली तेव्हा हेच शब्द तुझा आधार ठरले कारण त्या प्राधान्यात नातं दोघांचंच होतं माझा आधारच काढून घेणारं! *** गेल्या अवकाळी पावसात आपण सावरलो होतो पुन्हा अवकाळी पाऊस आलाय... आता आवरून घ्यायचं आहे वाहून गेलेली स्वप्नं विसरण्याचा खटाटोप तरी करावाच लागेल, कारण पावसात भिजण्याचं एक स्वप्न त्यातलंच! तू भिजला असशील! मनसोक्त, नेहमीसारखाच मीही भिजले!! वेदनेच्या वर्षावात, मनसोक्त एकाकी प्रवासाची हुरहूर छातीत साठवून घेत! या दुःखाची जात मात्र आता मला शोधायची आहे नात्यांच्या जातीच्या तुझ्या व्याख्येत ती कुठं बसेल?
रचनाकाल: केव्हातरी, २००७

वाचने 10673 वाचनखूण प्रतिक्रिया 24

प्रभो Sun, 10/11/2009 - 12:41
पावसात भिजण्याचं एक स्वप्न त्यातलंच! तू भिजला असशील! मनसोक्त, नेहमीसारखाच मीही भिजले!! वेदनेच्या वर्षावात, मनसोक्त आवडलं....बाकी कवितेतलं काही कळत नाही म्हणून लहान तोंडी मोठा घास घेणार नाही.. --प्रभो

In reply to by नंदन

चित्रा Mon, 10/12/2009 - 08:50
'सिर्फ एहसास है ये रुहसे महसूस करो, प्यार को प्यार ही रेहने दो कोई नाम न दो' याच ओळींची आठवण झाली.

In reply to by नंदन

सुनील Mon, 10/12/2009 - 11:18
अजून एक गाणे आठवले - पथ जात धर्म किंवा नातेही ज्यां न ठावे ते जाणतात एक, प्रेमास प्रेम द्यावे हृदयात जागणार्‍या अति गूढ संभ्रमांचे तुटतील ना कधीही, हे बंध रेशमाचे Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

दशानन Sun, 10/11/2009 - 12:52
:) छान.. व्याकरणाचे व माझे का वाकडं आहे हे कविता वाचून पुन्हा समजले.... आम्ही वस्तूंना भेटतो व माणसांना सापडतो हा आमचा व्याकरण हत्या प्रयोग ;)

In reply to by सहज

व्याकरण पहिल्यापासुन तसं नावडतचं निखिल ================================ रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!

क्रान्ति Sun, 10/11/2009 - 14:19
नातं दोघांसाठी असतं, अन् व्याकरण नातं जोखणाऱ्यांसाठी. नात्याची जात एकच - नातं हीच" वा! शेवटच्या ओळीही मनात घर करणार्‍या! खूप आवडली कविता. नंदनच्या प्रतिसादातलंच गाणं आठवलं, "हाथ से छूके इसे रिश्तों का इल्जाम न दो!" क्रान्ति अग्निसखा

In reply to by क्रान्ति

सुबक ठेंगणी Mon, 10/12/2009 - 10:55
सुरेख कविता! "नातं दोघांसाठी असतं, अन् व्याकरण नातं जोखणाऱ्यांसाठी. नात्याची जात एकच - नातं हीच" अवांतर: नाती व्याकरणात बसवता येत नाहीत पण व्याकरणात असतात तशा fuzzy boundaries मात्र नात्यातही असतातच!

मनीषा Sun, 10/11/2009 - 16:41
खरच नात्याचं व्याकरण नसतच .. नात असतं किंवा नसतं .. सुंरेख कविता ..

विसोबा खेचर Sun, 10/11/2009 - 23:35
अरे श्रावण, तू कविता केव्हापासनं करायला लागलास? त्याही इतक्या छान?!
तू भिजला असशील! मनसोक्त, नेहमीसारखाच मीही भिजले!! वेदनेच्या वर्षावात, मनसोक्त एकाकी प्रवासाची हुरहूर छातीत साठवून घेत!
वा! क्या बात है... तात्या.

धनंजय Mon, 10/12/2009 - 05:08
नात्याची जात नातं हीच, आणि दु:खाची जात दु:ख हीच! (नंदन यांचा कवितेबद्दल शब्द "उभयान्वयी" आवडला.) दोन कडव्यात भावना कमालीची बदलून टाकणारी कविता आहे.

सुनील Mon, 10/12/2009 - 11:12
गेल्या अवकाळी पावसात आपण सावरलो होतो पुन्हा अवकाळी पाऊस आलाय... आता आवरून घ्यायचं आहे नात्यांत घडलेला हा फरक सुरेख रीतीने दाखवला आहे! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

सूहास Mon, 10/12/2009 - 18:14
@) ...काय मोडक आणी कविता..ऑफिसातल्या खिडकीतुन सुर्य पण दिसेना ..एक मिनिट हां...आई ग!! (काही नाही चिमटा काढुन पाहिला.) तू भिजला असशील! मनसोक्त, नेहमीसारखाच मीही भिजले!! वेदनेच्या वर्षावात, मनसोक्त एकाकी प्रवासाची हुरहूर छातीत साठवून घेत!>>> खल्लास..शब्दच संपले.. शेवटी कविता रुखरुख लावुन गेली.. मॅटर खतम १७६० लेख , ६१६२ वाचने , ० प्रतिसाद.. सू हा स...