Skip to main content

एका तळ्यात होती .......

लेखक सुनील यांनी सोमवार, 12/10/2009 09:54 या दिवशी प्रकाशित केले.
कमळे फुले सुरेख ....... अलिबागजवळील कुरुळ हे गाव तेथिल कमळाच्या तळ्यासाठी प्रसिद्ध आहे. परवाच त्या परिसरात गेलो असता पाहिले, तर तळे कमळांनी भरून गेले होते. एरवी तुरळक असणारी कमळे अशी अचानक एवढ्या संख्येने फुलून यावीत, हा महाराष्ट्रातील संभाव्य राजकीय बदलाचा संकेत तर नव्हे? होत्या कुरुप वेड्या, म्हैशी तिथे अनेक! जगात इतरत्र काय चालले आहे याची यत्किंचितही पर्वा न करता पाण्यात डुंबणार्‍या ह्या म्हशी. जणू, कुणाचेही का सरकार येईना, आपल्याल्या काय फरक पडतोय, हेच दर्शवीत आहेत काय? छायाचित्रे - १) कमळे - कुरुळ, ता. अलिबाग, जि. रायगड. दिनांक १० ऑक्टोबर २००९ २) म्हशी - फणसाड, ता. मुरुड, जि. रायगड. दिनांक १० ऑक्टोबर २००९
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 4256
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

११ वी-१२ वी मधे असताना रेवदंड्याहून अलिबागला ये-जा करताना खूप वेळा ही कमळं पाहिली आहेत... आठवण झाली...

In reply to by सहज

असेच म्हणतो --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

In reply to by अवलिया

अगदी .. तरीपण अखिल भारतीय म्हैस समाजातर्फे सुनीलसेठचा निषेध! अदिती (कमळे कमळे किती गं निषेध करशील -- सौजन्य: .......)

पाण्यात कमळे आली म्हणून कमळ महाराष्ट्रावर राज्य करेल असे म्हणायचेय का तुम्हाला? पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत