Skip to main content

व्यर्थ न हो त्यांचे बलिदान....

लेखक प्रसन्न केसकर यांनी मंगळवार, 20/10/2009 14:37 या दिवशी प्रकाशित केले.
उद्या २१ ऑक्टोबर - पोलिस स्मृति दिन! तसे त्यात नवे काहीच नाही. नेमीची येतो मग पावसाळाच्या धर्तीवर दरवर्षीच पोलिस स्मृति दिन येतो अन जातो. उद्या सकाळी परत देशभरातील सर्व जिल्हा पोलिस मुख्यालयांच्या (कवायत मैदानांमधे) परेड ग्राऊंडवर निवडक पोलिस अधिकारी कर्मचारी शिस्तबद्ध रांगात उभे रहातील अन संचलन करतील. बिगुलांमधुन निघालेले लास्ट पोस्टचे सुर वातावरण कुंद, शोकार्त करत तरळतील अन काही जणांचे/जणींचे डोळे पाणावतील, प्रियजनांच्या आठवणीनं हुंदके फुटतील. कुणीतरी खड्या पहाडी आवाजात या वर्षी कामगिरीवर असताना धारातिर्थी पडलेल्या वीरांची नावे वाचेल अन शोकशस्त्रचा आदेश खड्या आवाजात घुमेल.

टायगर प्राँस्

लेखक गणपा यांनी मंगळवार, 20/10/2009 13:27 या दिवशी प्रकाशित केले.
आज जास्त काही प्रस्तावना न देता, सरळ मुद्यालाच हात घालतो. श्रिंप इन बोट : (बटर प्राँस् ) साहित्य : ताज्या टायगर प्राँस् (आकडा तुम्हीच ठरवा.) २ मोठे चमचे हिरव वाटण.

गंगाजल

लेखक विनायक प्रभू यांनी मंगळवार, 20/10/2009 13:24 या दिवशी प्रकाशित केले.
"आई गेली रे' भाउ म्हणाला. मी निर्विकार. " तु येणार आहेस का" बाबांच्या वेळी गेलो नव्हतो. माझ्या चेहेर्‍याकडे बघुन त्याने माझा रुकार ओळखला. हा जुळा भाउ माझा. जरा भोळसटच. आम्ही दोघेही सी.ए.

निरोप

लेखक कौतुक शिरोडकर यांनी मंगळवार, 20/10/2009 13:15 या दिवशी प्रकाशित केले.
पुन्हा सख्या नववधू होऊनी आली दिवाळी दाराशी इंद्रधनूचे रंग वेचुनी रेखिली रांगोळी मी खाशी इवल्या इवल्या पणतीतून स्पर्धा नभीच्या तार्‍यांशी गंध खमंग फराळातला.... प्रीत तोलतो हाताशी उल्हासाची पखरण भवती, आतिशबाजी आकाशी तुझी लक्ष्मी तुझ्या स्वागता उभी बावरी उंबर्‍याशी ..... ......... तुझ्याएवजी निरोप आला....... काळोखाच्या घनराशी मोरपिशी पदराने रोखते... जळता हुंदका ओठाशी विखुरलेल्या रंगावली या, कुणी मिळवले अभिरासी ? तव नामाची इवली पणती... ज्योत उडाली आकाशी अर्ध्यावरती डाव मोडता... प्रीत एकली उपवासी मिटले कुंकु.. फुटले कंकण...
काव्यरस

'खोका' वदून गेल्या, आता नडेन म्हणतो

लेखक llपुण्याचे पेशवेll यांनी मंगळवार, 20/10/2009 12:29 या दिवशी प्रकाशित केले.
दिवाळी नंतर आलेल्या विडंबनाच्या बहरात आमचेही एक कण्हेरीचे फूल. प्रेरणा: रंगाकाकांनी पाडलेले हे विडंबन . बाकी मात्रा-बित्रा नियमाप्रमाणे आधीच फाट्यावर मारल्याने त्यात सदर काव्य बसणार नाही याची काळजी घेतलेली आहे.
काव्यरस

दिवाळी २००९

लेखक गणपा यांनी मंगळवार, 20/10/2009 11:56 या दिवशी प्रकाशित केले.
म्हणतात ना दुखःवाटल्याने कमी होतं आणि आनंद वाटल्याने वाढतो.

आता काही लिहीन म्हणतो.

लेखक बाबुराव यांनी मंगळवार, 20/10/2009 11:43 या दिवशी प्रकाशित केले.
[मास्तर चतुरंग यांची प्रेरणा आणि मुळ लेखकाची क्षमा मागून] वाचन खूप झाले, आता लिहीन म्हणतो. आडून प्रतिसादाच्या गंभीर लिहीन म्हणतो पेन खिशातला हा मी काढणार आहे जे जे दिसेल ते ते सारे लिहीन म्हणतो. बरेच प्रतिसाद आहे मी उधळलेले या जागी आहेत विचार डोक्यात जे इथे लिहीन म्हणतो दिवाळी अंकातून मी निर्दोष आज सुटलो ? (लेख लिहिण्याचा कोणीच आग्रह केला नाही :( ) शब्द शब्द जमा करुन काही लिहीन म्हणतो सारेच सिद्धहस्त लेखक, ना साधा इथे कोणी नसलो मोठा तरिही आता लिहीन म्हणतो. ती टीका नव्हती सदस्य

दिवाळी किल्ला - किल्ले सिंधुदुर्ग !!

लेखक अमोल केळकर यांनी मंगळवार, 20/10/2009 10:47 या दिवशी प्रकाशित केले.
दिवाळी म्हणले की लहानमुलांना फटाके, नवीन कपडे, फराळाचे पदार्थ याचबरोबर उत्सूकता असते ती किल्ला बनवण्याची. आजच्या फ्लॅट संस्कृतीतही आपल्याकडे मातीचे किल्ले तयार केले जात आहेत हे विशेष. काही ठिकाणी ( पुणे , मुंबईकडे ) तयार किल्ले विकत घेण्याकडे कल ( काही अपवाद वगळता) वाढायला लागला आहे. जागेची उपलब्धता हे त्यामगचे मुख्य कारण असावे. पण तरीही तयार किल्ले बनवण्यातली मजा काही वेगळीच.दिवाळीत सांगलीला गेलो असता माझ्या भाच्यांनी ( चि. आदित्य ओगले, चि. श्रीराम ओगले) केलेला हा सिंधुदुर्ग किल्ला.