Skip to main content

भावसरगम- गाणी

लेखक नानबा यांनी शनिवार, 24/10/2009 21:27 या दिवशी प्रकाशित केले.
पंडित ह्रदयनाथ मंगेशकरांची "भावसरगम" या कार्यक्रमात त्यांनी सादर केलेली त्यांचीच गाणी कुणाकडे आहेत का?? कोणी Live Recording केले असेल तर मला मिळू शकतील का?? pratham.phadnis@gmail.com वर ई मेल करू शकाल का?? प्रथम फडणीस

गोष्ट छोटी डोंगरा एवढी

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी शनिवार, 24/10/2009 13:14 या दिवशी प्रकाशित केले.
"अहो मरणार्‍या शेतकर्‍याला एक लाख देता, त्यापेक्षा शेतकर्‍याला जगण्यासाठी पंधरा - विस हजार द्या". कसे वाटले वाक्य ? खरेतर हा आहे संवाद (डायलॉग) तो पण निळु फुलेंच्या तोंडी. चित्रपटाचे नाव 'गोष्ट छोटी डोंगरा एवढी'. ह्या आणी अशा अनेक शेतकर्‍याची सत्य परिस्थीती विशद करुन सांगणार्‍या संवादांनी आणी प्रसंगांनी भरलेला हा चित्रपट. शेतकर्‍याच्या खर्‍या अडचणी काय आहेत ? शेतकर्‍यावर आत्महत्या करायची वेळ का येते ?

का करावा जिवाचा आटापिटा? -- सामना २४ ऑक्टोबर २००९

लेखक सुहास यांनी शनिवार, 24/10/2009 12:46 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, कालच्या सामना च्या अग्रलेखाविषयी एक नवा धागा सुरू केलेला पाहिला आणि सामना संकेतस्थळावर फेरफटका मारायचे ठरविले.. पाहतो तर आजचा अग्रलेख ज्यात काल तरूणाईच्या नावाने "गजर" होता, तर आज चक्क निरवानिरवीची भाषा आहे.. एखाद्या माणसाचा लढाईत पराभव झाला आहे आणि तो हताश होऊन "याच साठी केला होता का अट्टाहास?" असे विचारतो अशा ए़कंदर आविर्भावाचा हा अग्रलेख आहे.. मला वाटतं या वर चर्चा व्हावी कारण "मराठी माणसाने पाठीत खंजीर खुपसला" असे हा अग्रलेख म्हणतो..

... देवाचं घर !

लेखक दशानन यांनी शनिवार, 24/10/2009 11:49 या दिवशी प्रकाशित केले.
माझा व देवाचा संबध तसा लहानपणापासून. माझी आई सांगते की मी लहान असताना देवघरातील गणपतीची छोटीशी सोन्याची मूर्तीच मला खेळायला हवी असे. उठता बसता माझ्याजवळ तीच मूर्ती. कोल्हापुरातील नागराज गल्लीमधला पीरबाबा असो की गावच्या दर्ग्याचा उरुस असो. मी तेथे हजर असे. कोल्हापुरातलं महालक्ष्मीचं मंदिर म्हणजे तर कोल्हापुरचं हृदय. माझं जवळजवळ सर्व लहानपण मंदिराच्या आजुबाजूलाच गेलं...बालवाडीपण मंदिराजवळच, पहिली ते सहावीपर्यंतची शाळापण जवळच. मंडळाचा गणपती असो किंवा पंचगंगेचा दीपोत्सव त्यांचा त्यांचा आनंद वेगळा होता. पण सगळंच त्या मंदिरापाशी एकवटलेलं होतं.

समृद्धीची रास, घरोघरी...

लेखक दिनेश५७ यांनी शनिवार, 24/10/2009 11:13 या दिवशी प्रकाशित केले.
धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज असे ऐन दिवाळीतले १२ ते १९ ऑक्टोबर दरम्यानचे आठ दिवस देशात `सोनियाचे दिन' होते... दिवाळीच्या दिवसांना सोन्याची झळाळी आली आणि मंदीचे सावट त्यात पुरते झाकोळून गेले. गेल्या वर्षीपर्यंत,दिवाळीच्या दिवसांची चाहूल लागताच, कामगारांच्या `बोनस'च्या बातम्यांनी वृत्तपत्रांचे रकाने भरून जायचे. यंदा त्या बातम्या दिसल्याच नाहीत... त्या बातम्यांची जागा नव्या बातम्यांनी घेतली. दिवस खरंच बदललेत काय? दिवाळीचे दिवस यंदा सोन्याच्या विक्रीच्या दृष्टीने खासच लक्षणीय राहिले. यंदा या दिवसात लोकांनी तब्बल ५६ टन सोने खरेदी केले.

विण्डोस ७

लेखक हैयो हैयैयो यांनी शनिवार, 24/10/2009 09:33 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या आफिसच्या तंत्रज्ञाने 'विण्डोस ७ बसवून देवू का' असे विचारले. त्याबद्दल मला जास्त माहिती नाही. विण्डोस ७ ही मायक्रोसाफ्ट ची नवी प्रणाली कशी आहे? आपापली मते मांडावीत. प्रणाली नवीन आहे, काही अनुभव असतील तर सांगावेत. तसेच त्यावर यूनिकोड दिसते का ते सांगावे. धन्यवाद.

मात्र रात्रीची गोष्ट भाग ७

लेखक दशानन यांनी शनिवार, 24/10/2009 09:11 या दिवशी प्रकाशित केले.
मात्र रात्रीची गोष्ट भाग ६ स्थळ - वेळ - पात्र - नेहेमीचेच. ( दिवाळी नंतर पहिल्यांदाच बसलो , खाजवणं चालू आहे डोकं... अशी अवस्था... !) मी - या. कशी झाली दिवाळी रं तुझी ? तो - लै भारी रं... मी - तुझ्यं थोबाड काय तरी येगळंच सांगत हाय ? काय झालं ? तो - नाय रं... दिवाळी... ते काय म्हणत्यात्...सरपराईझ .. सरप्राईज गिफ्ट नाय दिलं घरात म्हणून येन दिवाळीतच एकादाशी घडवली तीनं. मी - हा हा हा. तो - हसतो काय लेका.. तुझं लग्न होऊ दे मग आम्ही हसू... रावणासारखं !

अनंत माकड प्रमेय : एक विचार मंथन

लेखक मिसळभोक्ता यांनी शनिवार, 24/10/2009 05:24 या दिवशी प्रकाशित केले.
शक्याशक्यता प्रवादात (प्रॉबेबिलिटी थियरी), "अनंत माकड प्रमेय" नावाचे एक प्रमेय आहे. थोडक्यात सांगायचे तर हे प्रमेय असे: अनंत (म्हणजे इन्फायनाईट) माकडे टाईपरायटर बडवत बसलीत, तर शेक्सपीयरचे वाङ्मय टंकू शकतात. ह्याची सिद्धता तशी सोपी आहे. टाईपरायटरच्या कळा सांत (फायनाईट) आहेत, त्यामुळे माकडाने एक विशिष्ट कळ दाबण्याची शक्यता शून्यापेक्षा जास्त आहे. त्यामुळे शेक्सपियरच्या हॅम्लेट मधली अक्षरे एका माकडाने एकामागोमाग एक टंकित करण्याची शक्यता शून्यापेक्षा जास्त आहे.

विधानसभेचे "वैभव"

लेखक विकास यांनी शनिवार, 24/10/2009 04:45 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळमधली ही बातमी वाचून नि:शब्द होण्याची वेळ आली. खाली काही भाग देत आहे...
...असोशिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्मस्‌ (एडीआर) आणि नॅशनल इलेक्‍शन वॉच या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणाच्या माहीतीप्रमाणे, निवडून आलेल्या तब्बल पन्नास टक्के आमदारांवर गुन्हेगारी स्वरुपाचे आरोप आहेत आणि त्यांच्यावरील खटले सुरू आहेत अथवा प्रलंबित आहेत. शिवाय, निवडून आलेले तब्बल ६३ टक्के आमदार कोट्यधीश आहेत.