नमस्कार मंडळी,
कालच्या सामना च्या अग्रलेखाविषयी एक नवा धागा सुरू केलेला पाहिला आणि सामना संकेतस्थळावर फेरफटका मारायचे ठरविले.. पाहतो तर आजचा अग्रलेख ज्यात काल तरूणाईच्या नावाने "गजर" होता, तर आज चक्क निरवानिरवीची भाषा आहे.. एखाद्या माणसाचा लढाईत पराभव झाला आहे आणि तो हताश होऊन "याच साठी केला होता का अट्टाहास?" असे विचारतो अशा ए़कंदर आविर्भावाचा हा अग्रलेख आहे.. मला वाटतं या वर चर्चा व्हावी कारण "मराठी माणसाने पाठीत खंजीर खुपसला" असे हा अग्रलेख म्हणतो.. याचबरोबर अग्रलेख लिहिणार्याने काही प्रश्नही विचारलेत, त्यातला मुख्य भाव "जर शिवसेना नसती तर मराठी माणसाचे हाल वाईट झाले असते!" हा आहे, काही अंशी हे खरे ही आहे. सामनाच्या पहिल्या पानावर कानेटकरांचे "इथे गवताला भाले फुटतात, पण दुहीची बीजे खडकावरही उगवतात.." हे वाक्य औरंगजेबाच्या फोटोसह प्रसिध्द केले आहे... आता मलाही काही प्रश्न पडतात.
१. महाराष्ट्रासाठी आत्तापर्यंत ज्या-ज्या गोष्टी शिवसेनेने केल्या असे ते म्हणतात, त्या फक्त आणि फक्त शिवसेनेने केल्या आहेत काय? त्यामध्ये इतर लोकांचा सहभाग नव्हताच काय? मराठी माणूस खरेच एवढा लीन-दीन आहे का की त्याला फक्त आणि फक्त शिवसेनाच तारणहार आहे?
२. मराठी माणसाला एवढा ही अधिकार या लोकशाहीने दिला नाही का की ते एका "त्यांच्यासाठी लढणार्या" पक्षाला "तू चुकतोयस/चुकलायस" हे सनदशीर मार्गाने सांगू शकेल?
३. युतीचा पराभव हा निवडणुकी पूर्वीच्या त्यांच्या चुकांचा परिणाम आहे -- यात तिकीट देण्यापासून कार्यक्षमतेपर्यंतच्या सर्व गोष्टी आल्या --हे या लोकांना कळत नाही काय? मग त्यासाठी तरूणाई आणि मराठी माणूसच दोषी कसा..?
असो.. मला स्वतःला शिवसेना एक पक्ष म्हणून त्यांच्या तथाकथित पराभवाबद्द्ल काहीही वाटत नाही, कारण सत्तेवर नसले तरी ते विरोधी पक्ष आहेतच आणि त्यातूनही ते काही चांगले घडवू शकतीलही, पण असे असताना "मराठी माणसाने पाठीत खंजीर खुपसला" हे वाचून थोडे वाईट वाटले म्हणून हा काथ्याकूट... :)
सामनाचा अग्रलेख इथे वाचता येईल
http://www.saamna.com/
वाचने
4961
प्रतिक्रिया
29
मिसळपाव
प्रतिक्रिया
एवढं मनावर घेऊ नका हो...
एकदम खरं !
In reply to एवढं मनावर घेऊ नका हो... by अमोल खरे
मराठी
In reply to एवढं मनावर घेऊ नका हो... by अमोल खरे
हम्म
खरतर ही
चालला तरी
In reply to खरतर ही by झकासराव
वैयक्तीक
ह्याचा अंदाज होताच
सामना अग्रलेख
चोराच्या उलट्या बोंबा.......
+१
In reply to चोराच्या उलट्या बोंबा....... by वेताळ
उध्दव
In reply to चोराच्या उलट्या बोंबा....... by वेताळ
शिवस्मारक बनविणे म्हणजे मुर्खपणा आहे
इथे बरखा
In reply to शिवस्मारक बनविणे म्हणजे मुर्खपणा आहे by आम्हाघरीधन
शिवस्मारक काय ...
In reply to शिवस्मारक बनविणे म्हणजे मुर्खपणा आहे by आम्हाघरीधन
मुळात सेनेची उभारणीच भावनिक मुद्द्यांवर आहे
In reply to शिवस्मारक काय ... by ३_१४ विक्षिप्त अदिती
वर व्यक्त केलेल्या मुद्द्यांवर त्यांचे विरोधक निवडणुका लढवतात..
In reply to मुळात सेनेची उभारणीच भावनिक मुद्द्यांवर आहे by आम्हाघरीधन
मला वाटत
In reply to वर व्यक्त केलेल्या मुद्द्यांवर त्यांचे विरोधक निवडणुका लढवतात.. by प्रसन्न केसकर
मला आजही
In reply to मुळात सेनेची उभारणीच भावनिक मुद्द्यांवर आहे by आम्हाघरीधन
पुतळे महत्वाचे नसतात.....
In reply to मला आजही by ३_१४ विक्षिप्त अदिती
+१
In reply to पुतळे महत्वाचे नसतात..... by प्रसन्न केसकर
सहमत
In reply to पुतळे महत्वाचे नसतात..... by प्रसन्न केसकर
पुतळा तयार तरी होऊ द्या....
In reply to सहमत by प्रभो
आकांड्तांड्व
निव्वळ फ्रस्टेशन...
उद्या
पराभव शिवसेनेचा नाही तर जनतेचा...... उद्धव ठाकरे
संघटनेत आवश्यक ते बदल करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं....
अजुन जरा वेळ गेल्यावर पाहु.
In reply to संघटनेत आवश्यक ते बदल करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.... by प्रसन्न केसकर