Skip to main content

हापिसातली कविता

लेखक विजुभाऊ यांनी गुरुवार, 29/10/2009 14:54 या दिवशी प्रकाशित केले.
क्लायन्ट शी बोलताना चेहेर्‍यावरचे उसने हसू सांडत जाते. वीकएंडचे प्लॅनिंग गंडत जाते तेवढ्यात ती बातमी येते. कोणी एक आपल्यातलाच रोजच्या पहाण्यातला एक मेल धाडतो तुमचे सहकार्य मिळाले म्हणूनच मी इथवर पोहोचलो. अन्यथा होतोच काय मी?
काव्यरस

इशारा

लेखक कौतुक शिरोडकर यांनी गुरुवार, 29/10/2009 12:43 या दिवशी प्रकाशित केले.
न ठावे सख्या, तू कुठे गुंतलेला... तुझ्या चाहुली जीव आतूरलेला कधी वाटते की तुला जाणते मी जरी चेहरा तो, नसे पाहिलेला 'असावा असा तो शिलेदार माझा' कितीदा तुला मी मनी रेखलेला इथे रोज नाती नवी गुंफताना उरी भास वेडा, पुन्हा जागलेला कसा तू कुठे भेटशी... कोण जाणे...? कसे ओळखावे... मना राजसाला ? म्हणे... तू विधात्या, असे योजलेले जरा दे इशारा... दिशा वेधलेला
काव्यरस

बलुतं

लेखक कौतुक शिरोडकर यांनी गुरुवार, 29/10/2009 12:39 या दिवशी प्रकाशित केले.
तसा अनेकांनी प्रयत्न केला माझ्या हिंस्त्र मनाला आवर घालण्याचा, नसलेल्या हाडाचा फायदा उचलणार्‍या जिभेला वळण लावण्याचा, षडरिपूंनी पोखरलेल्या देहाला चांगुलपणाचा छंद लावण्याचा, पण वेदनांची बलुतं वाटण्याचा उद्योग जन्मसिद्ध अधिकारासारखाच... या प्रवृत्तीचे मूळ शोधण्यासाठी ग्रंथसंपदा चाळण्याची गरज नाही.... जन्मदात्रीला असह्य वेदना देऊनच जन्माला आलोय मी... तुमच्यासारखाच... म्हणून तर .... वेदनांची बलुतं वाटण्याचा उद्योग जन्मसिद्ध अधिकारासारखाच... जसा माझा तसाच तुमचाही..........
काव्यरस

...आणि गावसकर पेटला!

लेखक फारएन्ड यांनी गुरुवार, 29/10/2009 12:13 या दिवशी प्रकाशित केले.
आज हे आठवण्याचे कारण म्हणजे क्रिकइन्फो च्या एका सदरात प्रत्येक तारखेला आधीच्या काही वर्षात काय झाले याची अत्यंत वाचनीय माहिती येते - त्यात या सिरीज बद्दल वाचले आणि क्रिकेट (टीव्हीवर दाखवू लागले आणि) पाहू लागलो तेव्हा अगदी सुरूवातीला पाहिलेल्या या सिरीज बद्दल च्या बर्‍याच गोष्टी आठवल्या. १९८३ च्या वर्ल्ड कप मधे भारताकडून वेस्ट इंडिज चा संघ हरला. लॉईड ने राजीनामा दिला होता, पण तो बहुधा स्वीकारला गेला नाही. हा संघ एकूणच प्रचंड डिवचला गेला होता.

डेव्हीड शेफर्ड बाद.... :(

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी गुरुवार, 29/10/2009 12:04 या दिवशी प्रकाशित केले.
डेव्हीड शेफर्ड क्रिकेटमधील दरारा असणारा आणि एक लोकप्रिय पंच. क्रिकेट अकरा खेळाडूंचे असते पण पंचाचे पारडे इकडे
devid 9
तिकडे झुकले की क्रिकेटचे विजय,पराभवाचे समीकरण बदलून जाते.

मैफल ...! (रस : सोमरस )

लेखक विशाल कुलकर्णी यांनी गुरुवार, 29/10/2009 11:51 या दिवशी प्रकाशित केले.
कालची संध्याकाळ दोन प्रतिभावंत माबोकरांसमवेत घालवण्याची संधी मिळाली. श्री. गिरीश कुलकर्णी आणि श्री. जयंत कुलकर्णी उर्फ 'जयन्ता५२' ! जयंतदा मनोगतवरही असतात. फेसाळणार्‍या बिअरच्या सोबतीने गिरीशजींच्या कवितांबरोबरच जयंतदांच्या गझला आणि अनुभवांचा खजिना उलगडत गेला. क्षणभर असं वाटुन गेलं... " हुजूर .., पिलाने की बाते करते है ! कंबख्त..! हम तो बातोंसे नशा पाते है! " त्या दोन प्रतिभावंताचा खजिना खोदता - खोदता माझ्या हाती माझंच काही सटर फटर सामान आलं.....

बुधवारची कविता: (आभाळ)

लेखक llपुण्याचे पेशवेll यांनी गुरुवार, 29/10/2009 11:42 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा संस्थळ सुप्रसिद्ध, ना वैचारिक हव्यास, दोन बायांच हास्य, आणि शत्रू मात्र फार हाणामार्‍या भरपूर, लोकशाहीचा मात्र भास, ना अपेक्षा सभ्यपणाची, बोर्डावर चपलांची रास इकडून हाकलून सोडून पुन्हा जुन्याच आयडीचा फार्स ही एवढीच मांडवली दगडू, आंडू,राव पुरेशी आहे परतायला रचना: २९/१०/२००९
काव्यरस

आभाळ

लेखक नेहमी आनंदी यांनी गुरुवार, 29/10/2009 11:21 या दिवशी प्रकाशित केले.
घरकूल छोटस, ना महालाचा हव्यास, दोन पिलांच हास्य, आणि तू मात्र खास, प्रेम भरपूर आणि रागाचा नुसता भास, ना आकांक्षा चंद्र सूर्याची, तुझ्या सावलीचा ध्यास, उंच आकाशी फिरून पुन्हा धरतीवरच घ्यावा श्वास,, हे एवढ आभाळ तुझ्या माझ्या स्वप्नांना पुरेस आहे . प्रसन्ना जीके.२३/४/२००८
काव्यरस

एच्च्. मंगेशकरांचा भ्रमनिरास

लेखक भडकमकर मास्तर यांनी गुरुवार, 29/10/2009 10:03 या दिवशी प्रकाशित केले.
नुकताच महाराष्ट्र टाईम्सच्या दिवाळी अंकामध्ये बाळासाहेबांनी लिहिलेला एक लेख वाचला. लेखाचा विषय आहे , " सा रे ग म प ..रिअ‍ॅलिटी शो"... मंगेशकरांचा हा लेख मुळातूनच वाचण्यासारखा आहे..... खूप मजेदार आहे. लेखातले काही मुद्दे असे, १.स्टेज शो करणार्‍या निवडक गायकांमधून महागायक निवडायच्या या पर्वाची आयडिआ बाळासाहेबांची होती. .. (पर्वानंतर यातल्या सर्व कलाकारांच्या गाण्यांचा एक आल्बम चॅनल काढणार असे आश्वासन चॅनलने दिले होते , परंतु चॅनल आता त्याकडे लक्ष न देता पुढच्या कार्यक्रमाच्या तयारीला लागले सुद्धा....

अनारकली चिकन

लेखक निमीत्त मात्र यांनी गुरुवार, 29/10/2009 01:43 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, इथे मिळणारे ६,००० रुपयांचे अनारकली चिकन कुणी खाऊन बघीतले आहे का? मिपा म्हणजे खाद्यप्रेमींची पंढरी असल्याने कुणीतरी खवैय्याने हे खाऊन बघीतले असेलच. कुणी ट्राय केले असल्यास कृपया कळवावे कसे वाटले ते.