Skip to main content

मैफल ...! (रस : सोमरस )

मैफल ...! (रस : सोमरस )

Published on 29/10/2009 - 11:51 प्रकाशित मुखपृष्ठ
कालची संध्याकाळ दोन प्रतिभावंत माबोकरांसमवेत घालवण्याची संधी मिळाली. श्री. गिरीश कुलकर्णी आणि श्री. जयंत कुलकर्णी उर्फ 'जयन्ता५२' ! जयंतदा मनोगतवरही असतात. फेसाळणार्‍या बिअरच्या सोबतीने गिरीशजींच्या कवितांबरोबरच जयंतदांच्या गझला आणि अनुभवांचा खजिना उलगडत गेला. क्षणभर असं वाटुन गेलं... " हुजूर .., पिलाने की बाते करते है ! कंबख्त..! हम तो बातोंसे नशा पाते है! " त्या दोन प्रतिभावंताचा खजिना खोदता - खोदता माझ्या हाती माझंच काही सटर फटर सामान आलं..... खुब जमेगी जब... मिल बैठेंगे दिवाने तीन दोन तुझे..., दोन त्याचे... एखाद दुसरे माझेही सीन...! गुणगुणणारी, गुंगवणारी तुझी रंगेल कविता आणि... फेसाळलेल्या बिअरचे मस्तावलेले टीन ...! तुझी कविता .... किती हळुवार आणि तरीही घनगर्द...! किती सावरलं तरी भान विसरायला लावते... तुझी गझल अन तिचा तो मखमली दर्द ! आता नकोच त्या जखमा अन नस्ते झांगडगुत्ते, नकोच..., पिसुन-पिसुन कंटाळलेले... आळसावलेले हुकुमाचे पत्ते ! चल...... मिळुन सोडवू.... तुझ्या बोलक्या कवितेतले अबोल गुंते ! अरे हट...! कालची बिअर मला चढलीच नाही... तुझी गझलच एवढी जालीम होती... ती क्षुद्र वारुणी मला बाधलीच नाही ! विशाल.
लेखनविषय:

याद्या 1401
प्रतिक्रिया 3

कालची बिअर मला चढलीच नाही... तुझी गझलच एवढी जालीम होती... ती क्षुद्र वारुणी मला बाधलीच नाही
हे मस्त.
छान कविता.

मस्त रे.... फोन करणार होतास ना काल??? का केला नाहीस??? --प्रभो ---------------------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

अरे काल जयंतदांच्या गझला त्यांच्याच तोंडुन ऐकताना भान विसरलो आणि फोन करायचं ध्यानातच राहीलं नाही बघ. माफ कर :)] सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"