Skip to main content

अंतरीच्या कळा

लेखक नेहमी आनंदी यांनी शुक्रवार, 30/10/2009 11:16 या दिवशी प्रकाशित केले.
नभी आसवांचे तळे दाटलेले मुक्यानेच डोळ्यात पाणावलेले निघालाच त्या आठवांचा फुलोरा कधी साठताना मनी टोचलेले . असे मीलनाने खुशीच्या महाली तरी अंतरीच्या कळा सोसलेले ,, सुखाची करू कामना मी कितीही नशीबात दुःख असे साचलेले न चिता मनी ना जिवाची खुशाली तुला आज मी प्राण हे वाहलेले प्रसन्ना जीके

राजच्या आडून....

लेखक भोचक यांनी शुक्रवार, 30/10/2009 10:42 या दिवशी प्रकाशित केले.
मागे मी माझ्या 'राज ठाकरे आणि प्रसारमाध्यमे' या लेखात हिंदी भाषक प्रदेशातील माध्यमे आणि लोक राजच्या आंदोलनाकडे आणि तद्अनुषांगिक उद्भवलेल्या प्रश्नांकडे कसे पहातात हे लिहिले होते. आता झी न्यूजचा प्रमुख अँकर पुण्यप्रसून वाजपेयी नई दुनियात प्रसिद्ध झालेल्या या लेखात कसे तारे तोडले आहेत ते वाचा. या मंडळींनी राज ठाकरे, बाळासाहेब ठाकरे यांच्यावर राजकीय टीका जरूर करावी, त्याला काही हरकत नाही.

शक्ती दे! युक्ती दे! (बुद्धीही दे!!)

लेखक दिनेश५७ यांनी शुक्रवार, 30/10/2009 09:38 या दिवशी प्रकाशित केले.
राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या आरोग्य, वीज, पाणी, महागाई, बेरोजगारांच्या समस्या सोडवण्यासाठी शक्ती व युक्ती मिळावी असे श्री विठ्ठल चरणी साकडे घातले आहे, असे राज्याचे (काळजीवाहू) उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. पंढरपूरमध्ये कार्तिकी एकादशीनिमित्त उपमुख्यमंत्री श्री.भुजबळ व त्यांच्या पत्नी सौ.मीनाताई यांच्या हस्ते गुरुवारी पहाटे शासकीय महापूजा करण्यात आली.

जर - तर

लेखक टुकुल यांनी शुक्रवार, 30/10/2009 09:36 या दिवशी प्रकाशित केले.
काही वर्षापुर्वी दुसर्‍या नोकरीतल्या हापिसात बसुन संगणकाशी जुंपलेलो असताना योगेश नि आवाज दिला, "अरे तुझा फोन आहे" मोबाइल असताना मला हापिसात कोन फोन करेल विचार करत मि फोन उचलला.. "हेलो" "मिल्या, शिवा बोलतोय" "*** तु मोबाइलवर फोन का नाही केलास?" "अरे सहज, बघत होतो कि तु नक्की ऑफिसमधेच असतोस कि इकडे तिकडे टवाळक्या करतोस" "झाली का खात्रि? बोल आता" "चल येतोस का घरी, मि निघत आहे आता" "अरे नाही यार, आज थोडा उशीरच होइल, तु हो पुढे" "चल ठीक आहे.. सॉरी यार" "कशाबद्द्ल?" "काही नाही.. सॉरी " "ये येड**, नीट बोलशील का?" " काही नाही रे, सोड.. बर तुला एक मेल केली आहे..

<काहीच्या काही ...> अर्थातच कैच्या कै

लेखक प्रभो यांनी शुक्रवार, 30/10/2009 00:07 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा आभास कविता कि पास कविता *त्यास कविता मिळालेली | हे शिडशीडीत ना फटफटीत ना धडधडीत साध्य कसे ? अर्थ गर्भ पोरी खिसा कशी जाळी गूढ कधी काळी घे जाणोनी | शब्दांचा कंटाळा अर्थांचा घोटाळा नि*धाचा पाचोळा फार झाला | तो श्वास, नि: श्वास लसणाचा वास सार बाजू त्यांस आज तूही | मागणी प्रमाणे प्रेम प्रसवावे मूढ प्रेमीस रे कोणी सांगा | चलनात नाणे मद्य आणि खाणे 'बार' ' बार' करणे एक सत्य | पाहिजे तनू जे पाहता स्तब्ध करी नाद लुब्ध समोरच्यास | आम्हा व्यथा फार नको पुन्हा भार जगू क्षण चार एकट्याने | जो घेई अर्जंटं होई डॉक्टरी पेशंट तो इंटेलिजंटं होई
काव्यरस

काहीच्या काही ...

लेखक मनीषा यांनी गुरुवार, 29/10/2009 22:08 या दिवशी प्रकाशित केले.
आभास कविता कि र्‍हास कविता व्यत्यास कविता वाचलेली | हे कडकडीत ना फडफडीत ना जळजळीत काव्य कसे ? अर्थ गर्भ ओळी मती कशी जाळी गूढ कधी काळी घे जाणोनी | शब्दांचा कंटाळा अर्थांचा घोटाळा काव्याचा पाचोळा फार झाला | तो श्वास, नि: श्वास फुलपंखी रास सार बाजू त्यांस आज तूही | मागणी प्रमाणे काव्य प्रसवावे

चाळीशी

लेखक विकास यांनी गुरुवार, 29/10/2009 21:15 या दिवशी प्रकाशित केले.
"A mere forty years ago, beach volleyball was just beginning. No bureaucrat would have invented it, and that's what freedom is all about."
Newt Gingrich (अमेरीकन राजकारणी नव्वदच्या दशकातील रीपब्लीकन सभापती)
आज हे वरील वाक्य आठवायचे कारण जरा "स्पेश्शल" आहे. ज्या एका जाळ्यात गुंतत तुम्ही आम्ही आज केवळ मराठी संकेतस्थळांपुरतेच नाही तर दिवसातील अनेक गोष्टी करत असतो, त्याच्या शिवाय जगणे अशक्यच, ज्याने जगात वैचारीक मुक्तपणा (freedom)आणला... अशा एका तंत्रज्ञानाचा "औपचारीक" चाळीसावा वाढदिवस आहे.

पात्रानी मच्छी

लेखक गणपा यांनी गुरुवार, 29/10/2009 20:35 या दिवशी प्रकाशित केले.
सहजरावांची प्रेरणा उधार ;) त्यांच्या म्हणन्या नुसार आम्ही आरश्यात पाहीले व सुटलेले पोट आणि फ्व्वाक्कन बाहेर आलेले कुल्ले पाहुन आम्हाला आमचीच लाज वाटली. त्यांनी दिलेल्या कृतीत थोडी पारशी भर टाकली . तर ही कृती खास आपल्या सहजरावांना समर्पीत.... साहीत्यः १ मोठा मासा. (पापलेट असल्यास उत्तम.) नाहीच मिळाला तर मोठ्या माश्याच्या तुकड्या. पापलेट आमच्या नशीबी कुठे :( त्या मुळे लोकल माश्यावर (क्रोकर ) प्रयोग केला. हळद, मीठ, लिंबाचा रस चटणी साठी.

"एक्स्पोर्ट सरप्लस"

लेखक सुधीर काळे यांनी गुरुवार, 29/10/2009 15:23 या दिवशी प्रकाशित केले.
"एक्स्पोर्ट सरप्लस" दहा-पंधरा वर्षांपूर्वी भारतात एकादा माल "एक्स्पोर्ट सरप्लस आहे" असे सांगणे म्हणजे अप्रत्य़क्षपणे त्या मालाच्या प्रतीबद्दल (qualityबद्दल) ग्वाही देण्याचाच एक भाग होता.