ग्रीष्मोत्सव साजरा!
वसंतोत्सव
नंतर ...
वसंताने खो दिल्यावर ग्रीष्म चक्र उभे ठाकते.ग्रीष्म हा अवघडलेल्या अवस्थेसारखाच भासतो.
गावाचा पिंपळ आणि इतर क्षणिका
पिंपळाने सोडले
गावाच्या पाऱ्याला.
फ्लैट मध्ये आला
मनी प्लांट झाला.
(२)
वाळूचे मनोरे
वार्यात उडाले.
भग्न स्वप्नाची
अधुरी कहाणी.
(३)
कल्पनेला मिळेना
साथ शब्दांची.
कोरीच राहिली
वही कवितेची.
(४)
पुरोगामी प्रतिक्रिया पाहिल्यानंतर
काटा रुते कुणाला
हा दैव योग आहे.
भाला रुते कितींना
हा मोदी योग आहे.
काव्यरस
रूटीन..
विषयच कंटाळवाणा असल्याने लेख कंटाळवाणा वाटू शकतो.
मी खूप वर्षांपूर्वी रिटायर झाले. रिटायर व्हायला काही महिने असताना माझे सहकर्मचारी मला विचारायचे की तू रिटायर झाल्यावर वेळ कसा घालवणार? काय करणार? यावर मी उत्तर द्यायची की आधी काही काळ मला वेळ जात नाही म्हणून बोअर तरी होऊ द्या. मग बघू काय करायचं आणि कसा वेळ घालवायचा ते!
रिटायर झाले आणि मनातून बरंच लिखाण करायचं राहिलं होतं ते हातावेगळं केलं. लिहिल्यामुळं खूप बरं वाटलं. मग घरी रिकामं बसणं सुरू झालं. हळुहळू लक्षात यायला लागलं की, आपल्याला पूर्वीसारखं काही स्फुरत नाहीयै. प्रतिभा आटलीय. काही लिहिताच येत नाहीयै.
सुख म्हणजे काय असतं?
आजचं जग सुखी आहे का? असा प्रश्न तुम्हांला कोणी विचारला तर तुमचं उत्तर काय असेल? काही क्षणभर विचार करतील. काही जण काही आठवतंय का म्हणून स्मृतीचे कोपरे कोरत राहतील. काही तर्काचे किनारे धरून पुढे सरकतील. काही अनुमानाचे प्रवाह धरून वाहतील. काही निष्कर्षाच्या काठावर उभे राहून पैलतीरावर दिसणाऱ्या उत्तरांच्या धूसर आकृत्यांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करतील. काही काहीही करणार नाहीत. काही प्रश्नच बनून राहतील किंवा आणखी काही...
खरंतर हा प्रश्नच एक यक्षप्रश्न आहे. याचं उत्तर मिळणं अश्यक्य नसलं, तरी अवघड नक्कीच आहे. कुणी म्हणेल, आजचं काय विचारता, जग कधी सुखी होतं हो?
आरिगातो टोक्यो !
आरिगातो टोक्यो !
मार्गरेट मीड नावाची अमेरिकन मानववंशशास्त्रज्ञ (anthropologist) होती. तिचं खूप गाजलेलं विधान होतं की मानवाच्या उत्क्रांतीचा सर्वात महत्वाचा टप्पा - आगीच्या किंवा चाकाच्या शोधापेक्षाही जास्त - माणसाच्या "मनुष्यत्वाचा" पहिला पडाव होता ते म्हणजे पहिल्या तुटलेल्या मांडीच्या हाडाचं (fractured femur) बरं होणं. मांडीचं हाड हे शरीरातलं सर्वांत मोठं हाड. ते तुटलं तर माणूस हालचाल करू शकणार नाही आणि अर्थातच तो माणूस भक्षकांसाठी सोपं भक्ष्य बनेल. बाकी कुठल्याही वन्य जीवांचा कळप अश्या कमजोर प्राण्यांना मागे ठेवून बाकी धडधाकट सदस्यांना घेऊन पुढे जातो.
विस्कळखाईत कोसळताना
रेणुबंध होतील खिळखिळे
खळकन् फुटतील ठाशीव साचे
हादरून जातील स्तंभही
तर्काच्या भक्कम इमल्यांचे
गाभ्यातून जर्जर पृथ्वीच्या
लाव्हारस येईल उधाणून
अगणित जीवांचा कोलाहल
उरेल भवतालाला कोंदून
विस्कळखाईत कोसळताना
असेच काही घडेल? किंवा,
विज्ञानाचे ज्ञात नियम मग
वागतील वेगळेच तेव्हा?
काव्यरस
मिसळपाव