Skip to main content

भक्षक ....!

लेखक विशाल कुलकर्णी यांनी सोमवार, 14/12/2009 16:26 या दिवशी प्रकाशित केले.
******************************************************************** "ए रम्या, कशापायी भाव खातुस? सांग की काय झालं हुतं त्ये? " गोपाळनं रम्याच्या पाठीत एक दणका घातला. तसा सगळ्यांनीच गलका केला. संज्या, नान्या, पाठकाचा औध्या, म्हटलच तर कुलकर्ण्याचा जन्या.... सगळेच रम्याच्या मागे लागले. "सांग ना बे, कशाला भाव खातो फुकटचा?" "आरं... आरं... वाईच, चा तरी पिऊ देशीला का न्हायी?" रम्यानं चहाचा कप संपवला. मिशीला लागलेले चहाचे कण उलट्या मुठीने निपटून काढले. औध्याकडनं तंबाखु मागुन घेतली. चुना लावून व्यवस्थीत चोळली. कचरा काढून टाकत भुकटी ओठांच्या कोपर्‍यात सरकवली.

सिंहगड माझ्या नजरेने....

लेखक दशानन यांनी सोमवार, 14/12/2009 12:25 या दिवशी प्रकाशित केले.
रवीवारचा सुस्त दिवस सार्थक लावावा ह्या विचाराने आपली यामाहा घेऊन सरळ सिंहगडचा रस्ता पकडला, सकाळ सकाळी १० वाजता. रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवळ पाहून मन आनंदीत झाले. मस्तपैकी इकडे तिकडे बघत कधी चढ संपवून गडावर पोहचलो ते समजलेच नाही. महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा गड दिसतो कसा ह्यांची मनात खुप हुरहुर लागून राहिली होती व गडावर पोहचतात चारीबाजूची गर्दी पाहताच मन निराशेने भरले. जसे एखाद्या पिकनिक स्पॉटचे वातावरण असते तसेच वातावरण गडावर ही दिसत होते, चारचाकी-दुचाकी गाड्यांचे ताफेच्या ताफे उभे होते.

मदत हवी आहे...

लेखक समिधा यांनी सोमवार, 14/12/2009 10:52 या दिवशी प्रकाशित केले.
अमेरीकेत तुरटीचा खडा मिळतो का? मिळत असेल तर कुठल्या दुकानात आणी कुठल्या नावाने मिळतो?

खमंग खिचडी

लेखक जानकी यांनी रविवार, 13/12/2009 22:46 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः चार माणसांसाठी: २ वाटया शिजवलेला पांढरा भात (आदल्या रात्रीचा अथवा सकाळी शिजवून उरलेला असला तरी चालेल) १ वाटी तुरीची शिजवलेली साधी फिकी डाळ (सकाळची उरलेली आमटी वा वरण असल्यास आधिक बरे) २ काडया कढीपत्ता १ पळी नारळाचा चव १ मूठ कच्चे शेंगदाणे सकाळच्या जेवणातील उरलेली (पातळ भाजी सोडून) कोणतीही फळभाजी (ऐच्छिक) २ टे. स्पून जिरं लांब चिरलेला १ मध्यम कांदा (ऐच्छिक) पाव वाटी निवडलेली कोथिंबीर अर्धी वाटी तेल १ टी स्पून मोहोरी प्रमाणात हिंग, हळद, लाल तिखट व मीठ १ टे. स्पून सांबार मसाला कृती: १ पळी तेल कढईत तेल तापवून घ्यावे.

तेलंगणकांड भाग दोन-चंद्रशेखर रावांचे उपोषण आणि इतर प्रश्न

लेखक क्लिंटन यांनी रविवार, 13/12/2009 16:47 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वीचे लेखन भाग १: भाषावार प्रांतरचनेचा इतिहास नमस्कार मंडळी, मागील भागात आपण भारतात भाषावार प्रांतरचना कशी झाली याचा इतिहास बघितला.

तेलंगणकांड भाग एक-- भाषावार प्रांतरचनेचा इतिहास

लेखक क्लिंटन यांनी रविवार, 13/12/2009 16:38 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, गेल्या आठवडयात तेलंगण राष्ट्रसमितीचे अध्यक्ष के.चंद्रशेखर राव यांनी स्वतंत्र तेलंगण राज्यासाठी उपोषण केले आणि त्यांचा उपोषणात मृत्यू झाला तर हिंसाचाराचा आगडोंब उसळेल अशी भिती केंद्र सरकारला वाटली आणि रातोरात नव्या तेलंगण राज्याच्या निर्मितीची घोषणा केंद्र सरकारने केली. या निर्णयाच्या इतर पैलूंचा विचार करण्यापूर्वी भारतातील प्रांत रचना कशी बदलत गेली याचा थोडक्यात परामर्श घेऊ. ब्रिटिश काळात राज्यकारभाराची सोय हा एक मोठा मुद्दा राज्यांची रचना करताना होता.

जन्मोजन्मी

लेखक हेरंब यांनी रविवार, 13/12/2009 11:43 या दिवशी प्रकाशित केले.
प्रत्येक माणसाला पुनर्जन्माबद्दल कुतुहल असतेच. मीही त्याला अपवाद नाही. मुले मोठी झाल्यावर, मी जेंव्हा निरवानिरवीच्या गोष्टी सुरू केल्या,. तेंव्हा एकदा माझी मुलगी मला म्हणाली होती,' बाबा, तुला मरायची एवढी घाई का ?" त्यावर मी उत्तर दिले की मला पलिकडे काय आहे हे जाणून घेण्याची फार उत्सुकता आहे. त्यातून मी आता माझ्या जबाबदार्‍यांतून मोकळा झालो आहे. आणि स्वतः मेल्याशिवाय सत्य काय आहे हे कसे कळणार? पण आत्महत्या हा मार्ग काही योग्य वाटत नव्हता. अचानक जिवंतपणीच ते जाणून घेण्याची एक संधी उपलब्ध झाली. नुकत्याच एका वाहिनीवर तुमचा पूर्वीचा जन्म जाणून घेण्याविषयी एक कार्यक्रम सुरू झाला.

......आणि मग

लेखक मन यांनी शनिवार, 12/12/2009 22:49 या दिवशी प्रकाशित केले.
......आणि मग शुभ कार्याची तुझ्या उडेल लगिन घाई,येइल तुझ्या वसंत आयुष्यी- पहाटपालवी तिच्या अवखळ ,अल्लड, सोनपावलांनी. तिच्या ओल्-स्वभावी बनेल माझी पुत्री. जोडुन नाती ,रचुन नवी प्रेमबंधनं घर बनविल ती प्रेमनिवास. येताच माहेर आल्हाद आठवणी,जोडिल ती -घडवील सासर तशाच साठवणी ..... लागेल लळा,जुळतील मने ,नर्म प्रसन्न दर्शानाची तिच्या सवय होइल . रामप्रहरी दोघांचा सुहास्य दिनारंभ होइल. दिस जातिल, स्वर एक होतिल. सासु-सुनेची स्पर्धा न राहता माय्-लेकिची मेणमउ माया बनेल . चौघांच्या आपला मित्र मैफिली जमतील.

अहो पाव्हनं, अंमळ घ्या विसावा ,

लेखक सागरलहरी यांनी शनिवार, 12/12/2009 20:08 या दिवशी प्रकाशित केले.
सूत्रधार :- सळसळ नागावानी डौलदार चाल हिची झळझळ सोन्यावानी झळकते काया हिची .. खाण रुपाची, नार गुणाची , कुण्या गावची, कुण्या रावाची, कुण्या नावाची, ही नार कोण ... गुलाब मोगरा शेवंतीला , तुझा चेहरा हाय भारी रूप देखणं, चतुर बोलणं , लाखा मधे तू भारी नटी : मी नार लई भारी , गार होती बघणारी माझी कीरत ही न्यारी , माझी प्रीत तुम्हावरी---- अहो पाव्हनं ... अहो पाव्हनं ... अहो पाव्हनं, अंमळ घ्या विसावा , विडा हातून, माझ्या हा घ्यावा .. बघा सांज, ही येई दाटून , हूर हूर, मनात भरून, अश्या वेळी, कशाला दुरावा विडा हातून, माझ्या हा घ्यावा .. शिणगार, माझा हा पहावा, संगतीत , शीण घालवावा, चंद्रापार, म
काव्यरस