Skip to main content

तत्वज्ञान.....

लेखक उदय सप्रे यांनी शुक्रवार, 22/01/2010 09:23 या दिवशी प्रकाशित केले.
सप्रेम नमस्कार मंडळी ! जवळजवळ ७ वर्षे झाली असतील ( २७ जुलै २००३) एक कविता लिहायला सुरुवात केली , पण एक कडवे झाल्यावर काही सुचेचना.ती कविता आज एका मैत्रिणीचा "मैत्री" वर एस एम एस आला आणि त्याला उत्तर म्हणून ४ ओळी पाठवल्या तेंव्हा ती पूर्ण होण्याएव्हढे काही सुचले आहे , बघा आवडते का ते ! तत्वज्ञान..... बदलते ते वय बदलत नाही ती वय भावतो तो भाव भोवतो तो स्वभाव ! सतत बदलतो तो रंग अविचल रहातो तो श्रीरंग समजण्यासाठी वाढते ती संगती आणि मग जाणवते ती वि

गाजर संत्र्याचे सुप (ऑरेण्ज कॅरट सुप)

लेखक मितालि यांनी शुक्रवार, 22/01/2010 09:20 या दिवशी प्रकाशित केले.
साहीत्य: गाजर, संत्र्याचा रस, मीठ, मीरपुड, सजावटी साठी दही व कोथिंबीर कृती: कुकर मधे गाजर पाणी घालुन शिजवुन घ्या. थंड झाले की मिक्सर मधुन वाटुन घ्या. त्यात संत्र्याचा रस घाला. हे सुप दाटसर ठेवा. चवीनुसार मीठ घाला. मध्यम आचेवर एक उकळी येउ द्या. हे सुप दाटसर ठेवा.

आम्हाला मेट्रो हवी आहे- आमचे प्रश्न सोडवणारी

लेखक अमृतांजन यांनी शुक्रवार, 22/01/2010 06:42 या दिवशी प्रकाशित केले.
१. मेट्रोला जितका खर्च येईल तेव्हढ्या पैशात पी एम टी स्वतःची बस कंपनी काढू शकेल व त्यातून शहराला लागणाऱ्या सगळ्या प्रकारच्या गाड्या तयार करु शकेल. त्यासाठी टाटा किंवा इतर कंपन्यांशी सहकार्य करार करता येईल २. मेट्रो स्टेशन पर्यंत नागरीकांनी कसे पोहोचायचे? गाडीने?, स्कुटरने? ते वाहन कुठे ठेवायचे? ३. उतरण्याच्या ठिकाणाहून इच्छीत स्थळी कसे जायचे? रिक्षाने? बसने? ४. मेट्रोला जितका खर्च येइल त्या पैशात किती बसेस विकत घेता येतील? ५. पुढील १०-१५ वर्षात जितकी लोकसंख्या वाढणार आहे ती कुठे वसणार आहे? सध्याच्या पुण्यात नाही. मग त्या वाढणाऱ्या लोकसंख्येसाठी सध्याच्या पुण्यात मेट्रो का? ६.

दख्खनच्या राणीच्या बसून कूशीत ...

लेखक मराठे यांनी शुक्रवार, 22/01/2010 02:47 या दिवशी प्रकाशित केले.
दख्खनच्या राणीच्या बसून कूशीत शेकडो पिले ही चालली खुशीत ही कविता कधीतरी शाळेत ऐकली होती. ... पूर्ण कविता कोणाकडे आहे का?

या गूढ सावल्यांनी..

लेखक प्राजु यांनी गुरुवार, 21/01/2010 21:22 या दिवशी प्रकाशित केले.
या गूढ सावल्यांनी सांज फ़ाकीत आहे जणू चांदणे मला हे अजमावीत आहे ते वाहता तराणे, स्वर कापराच त्याचा वार्‍यास सय कुणाची, ही सतावीत आहे ओढून पापण्यांचा पडदा अलगद थोडा हळुच लोचनी या कोण डोकावीत आहे? 'होईल सर्व काही, जे आपणा हवे ते' अंदाज हा तुझा की सांग भाकीत आहे? अंधार हा विषारी, विळखा भयाण त्याचा हातात ज्योत इवली, वाट दावीत आहे हा श्वास कोंडताना, मजला कळून आले कि आयुष्य दार माझे, ठोठावीत आहे - प्राजु

कातरवेळ

लेखक प्रसन्न केसकर यांनी गुरुवार, 21/01/2010 14:05 या दिवशी प्रकाशित केले.
सर्दी-खोकल्याचा त्रास होत असल्याने त्या शुक्रवारी मी जरा लवकरच घरी आलो होतो अन इंग्रजी चित्रपटाची सीडी लावुन बसलो होतो. कुशीत गोटु झोपला होता. अन रात्री अकरा वाजण्याच्या सुमाराला फोन घणघणला. सहसा माझ्या कार्यालयीन कामाचे फोन भ्रमणध्वनीवरच येतात त्यामुळे लॅन्डलाइनवरचा फोन बहिणीचा किंवा भावाचा असेल असा अंदाज करत मी उचलला. "अरे आईला संध्याकाळपासुन चक्कर येतीये. डॉक्टरकडे जाऊन आलो आम्ही तर ब्लडप्रेशर जास्त होतं. त्यांनी ब्लडप्रेशरची गोळी घ्यायला सांगीतल होत अन ती गोळी तासाभरापुर्वी घेतली तरी अजुन चक्कर येतेच आहे," ठाण्याहुन बहिण बोलत होती.

"महाराष्ट्रा मधे बाकिच्यांना taxi परमिट न देण्याचा निर्णय नैतिक अधोगतिचा आहे काय ?"

लेखक बट्ट्याबोळ यांनी बुधवार, 20/01/2010 21:30 या दिवशी प्रकाशित केले.
http://timesofindia.indiatimes.com/pollslist/2238809.cms वरिल पोल मधे तुमच मत द्या .. पोल असा आहे : "महाराष्ट्रा मधे बाकिच्यांना taxi परमिट न देण्याचा निर्णय नैतिक अधोगतिचा आहे काय ?" नाही म्हणून उत्तर द्यावे !!

(कुठे भास होतो मला 'कोंकणाचा')

लेखक चतुरंग यांनी बुधवार, 20/01/2010 21:12 या दिवशी प्रकाशित केले.
ज्ञानेश यांची अप्रतीम गजल 'कुठे भास होतो तुझ्या कंकणांचा' वाचली आणि सगळे भास खरे वाटायला लागले! ;) कुठे भास होतो मला 'कोंकणा'चा, 'रिया' रोज स्वप्नी बुलावे कुठे... हजारो दिशांनी मला हाक येते, कलत्रास सोडून जावे कुठे? 'पमी'ची, 'निशे'ची, 'नितू'ची, कधीची जरी लाख आलीत आमंत्रणे.. रमेनेच ज्याला असे वात अणला, अशा दादल्याने पहावे कुठे? तसे झाकले खूप काही परंतु, तरी राहिले खूप झाकायचे मिळाले तिला फोन माझे अरेरे, कळेना अता मी लपावे कुठे? लपावे जरासे अशी रूम नाही.. करी तात वेडा पहारा खडा असे बंधुही ज्या मुलीचा घिसाडी..
काव्यरस