Skip to main content

तत्वज्ञान.....

तत्वज्ञान.....

Published on 22/01/2010 - 09:23 प्रकाशित मुखपृष्ठ
सप्रेम नमस्कार मंडळी ! जवळजवळ ७ वर्षे झाली असतील ( २७ जुलै २००३) एक कविता लिहायला सुरुवात केली , पण एक कडवे झाल्यावर काही सुचेचना.ती कविता आज एका मैत्रिणीचा "मैत्री" वर एस एम एस आला आणि त्याला उत्तर म्हणून ४ ओळी पाठवल्या तेंव्हा ती पूर्ण होण्याएव्हढे काही सुचले आहे , बघा आवडते का ते ! तत्वज्ञान..... बदलते ते वय बदलत नाही ती वय भावतो तो भाव भोवतो तो स्वभाव ! सतत बदलतो तो रंग अविचल रहातो तो श्रीरंग समजण्यासाठी वाढते ती संगती आणि मग जाणवते ती विसंगती ! ऐकावासा वाटतो तो सूर गायल्यावर होतो तो भेसूर वहात जाते ती लय वहावत नेतो तो प्रलय ! ती/तो आयुष्यात येणं तो योगायोग ती/तो आयुष्यातून जाणं तो योग?! ति/त्या ला पहाताच हृदयात येते ती कळ ति/त्या च्या पर्यंत पोचत नाही ती कळकळ ! ती/तो येताच उठतात ते तरंग ती/तो नसतां कण्हते ते अंतरंग ! ति/त्या च्यासाठी बांधावं ते घर ति/त्या च्या मुळे येते ती घरघर ! ति/त्या च्याकडे असते ती कला आम्ही करतो त्या कला ! आम्ही करतो प्रेम तो व्यापार जग दाखवून देतं तो व्यवहार ! तन जख्मी करतं ते शस्त्र मन भळभळतं ते शास्त्र ! अकस्मात् जडते ते प्रेम आजीवन दृढ रहाते ते सप्रेम !
लेखनविषय:

याद्या 1171
प्रतिक्रिया 1

हम्म! छान आहे. वेगळी धाटणीची आहे. आवडली. - प्राजक्ता http://www.praaju.com/