Skip to main content

कविते, हे तर तुझेच देणे..!

लेखक प्राजु यांनी सोमवार, 08/02/2010 22:41 या दिवशी प्रकाशित केले.
रात्र काळी, चंद्र भाळी तरूण चांदणी नवी नव्हाळी नशा आगळी, सूर पाघळी सळसळणार्‍या रानोमाळी पिसे जीवाला, वेड मनाला झुळझुळ वारा, गंध ओला कोण काजवा, उगा हासला तीट लावतो अंधाराला नक्षत्रांच्या सहस्र माळा धरेच्या गळा, साज आगळा पहाट वेळा, धुक्याची कळा रंग केशरी, या आभाळा गारठलेली, धरा ल्यायली शुभ्र धुक्याच्या, गर्द शाली सूर्यकणांची मैफ़ल सजली क्षितिजावरच्या, भव्य महाली पहाट लेणे, रूप देखणे, किलबिल गाणे, नवे उखाणे शब्द रंगणे, मनी गुंफ़णे कविते, हे तर तुझेच देणे..! - प्राजु
काव्यरस

(धोका)

लेखक चतुरंग यांनी सोमवार, 08/02/2010 21:52 या दिवशी प्रकाशित केले.
क्रांतीताईंच्या सुंदर गजलेत असं काही वाचलं की पुन्हा एकदा जुन्या दिवसांशी 'धोका' झाल्याची जाणीव प्रबळ होते आणि मग.... पृष्ठ वरचे, 'खास मेनू' अन सलोखा बायडी आभास नुसता, रोज धोका! बंद केली 'डायराने' सर्व दारे आयडी आला कसा, नसता झरोका? बारश्याला मीच 'मामा', कर्म माझे? सोडला हातातला प्रत्येक मोका! सोबती संपादकत्त्वाचा उबारा, आणि शिल्लक मेंबरांचा मंद ठोका बास आता सोंग हे वैचारिकांचे कंड 'चतुरंगास' सुटला हा अनोखा! -चतुरंग
काव्यरस

श्री लिपीतील मजकूर कसा पाहावा?

लेखक चिंतातुर जंतू यांनी सोमवार, 08/02/2010 17:46 या दिवशी प्रकाशित केले.
श्री लिपी ही देवनागरी लिहिण्याची प्रणाली वापरून लिहिलेला काही मराठी मजकूर मजकडे आहे. परंतु मजपाशी श्री लिपीची प्रणाली नाही. एकही दमडी न खर्चता ही शिंची लिपी वाचण्यासाठी काही उपाय आहे का? अवश्य सांगावा. अग्रिम धन्यवाद. - चिंतातुर जंतू :S

उमेद

लेखक विजुभाऊ यांनी सोमवार, 08/02/2010 13:42 या दिवशी प्रकाशित केले.
बेगॉन/ डायझोन्/टीक२० सगळे एकदम वापरुन पाहिले कितीही झटकले तरी झुरळ काही मरत नाही जीव तुटता तुटता पुनर्जन्म होतो हात पाय हलत रहतात अधुनमधुन पंख फडफडतो जातो जातो वाटते पण जीव काही जात नाही कितीही झटकले तरी काही झुरळ मरत नाही तु काहीही कर पोसलेला नेता आहे मी इथल्या सगळया समाजाच्या नामर्दगानीवर कुरतडत राहीन अंधारात तुलाच. जगत राहीन तुझ्या उष्ट्यावर आणि माज करेन त्यावरच. तूच शेवटी हरणार आहेस मी असाच आहे शतकांपासुन तु ही असाच आहेस शतकांपासुन सोशीक आणि सहनशील निवडणूका वगैरे जन्तुनशाकाना आम्ही दाद देत नाही. हे सांगितल्यावाचुन ते रहात नाही या उपायांनी काही होत नाही, आमची जाड कातडी कशालाच दाद देत नाही ह
काव्यरस

शाहरुख खान आणि पाकिस्तान

लेखक पुरणपोळी यांनी सोमवार, 08/02/2010 12:32 या दिवशी प्रकाशित केले.
आपले सर्वाचे (पक्षि: मिडिआ, करण जोहर, आणि भोळेभाबडे चाहते (पक्षि: मला काय त्याचे टाईप जनता)) लाडके, आदरणिय, प्रातः स्मरणिय, अभिनय सम्राट श्री. शाहरुख खान यांच्या मते पाकिस्तान हा उत्तम शेजारि आहे, आणि पाकिस्तानी खेळाडुंचे भारतात स्वागत आहे. शाहरुख वरिल वक्तव्याचे अभिव्यक्ति स्वातन्त्र्य म्हणून समर्थन करीत आहे. वरवर किंवा खोलखोल कसेहि पाहा माझ्या मते वरिल वाक्य हा समस्त देशाचा आणि मुख्यतः अतिरेकि हल्ल्यात बळि पडलेल्यांच्या कुटुंबियांचा अपमान आहे. शाहरुख हा छुपा/खुला पाक समर्‍थक आहे असे वाटल्यास चुक काय?

व्हॅलेन्ताईन डे

लेखक विजुभाऊ यांनी सोमवार, 08/02/2010 12:08 या दिवशी प्रकाशित केले.
व्हॅलेन्ताईन डे ज्या संत व्हॅलेन्ताईन च्या स्मृती साठी उजवला जातो त्या संत व्हॅलेन्ताईनचे कार्य कायाहे याची कोणाला माहिती आहे का?

राणी वै-याची रात्र आहे

लेखक शरद जयकर यांनी सोमवार, 08/02/2010 10:47 या दिवशी प्रकाशित केले.
राणी वै-याची रात्र आहे...जागी रहा ! फक्त जागीच नव्हे..जागृत रहा..... सरस्वतीच्या मंदिरात सर्वासमोर जाळली गेलेली रिंकू... भर रस्त्यात चाकूच्या घावांनी तडफडणारी अमृता... टाहो फोडून आकांताने सांगताहेत राणी वै-याची रात्र आहे..जागी रहा... तथाकथित पौरुषाचा डंका पिटणारे भ्याड महाभाग खरतर अधमच.. खून, बलात्कार, जळीत..
काव्यरस

प्रत्येकानी वाचावेच असे.....

लेखक विजुभाऊ यांनी सोमवार, 08/02/2010 10:38 या दिवशी प्रकाशित केले.
नुसार संपूर्ण लेख इथे कोपी पेष्ट करून इथे टाकावा असे वाटते पण मिपाच्या पॉलीसीनुसारते शक्य नाही म्हणून हा दुवा इथे देत आहे. आवर्जून वाचावे असे काही http://72.78.249.125/esakal/20100208/5087969775112240764.htm या लोकांची इच्छाशक्तीला लाख सलाम ........ हॅट्स ऑफ

< मोफत मोफत मोफत >

लेखक युयुत्सु यांनी सोमवार, 08/02/2010 10:04 या दिवशी प्रकाशित केले.
दिनांक ८.२.२०१० ते १५.२.२०१० या कालावधीमध्ये माझ्या ब्लॉगच्या वाचकाना त्यांच्या जन्मपत्रिकेचे एबर्टीन तंत्राने मोफत इंग्लिश्मध्ये विश्लेषण करून मिळेल. इच्छुकानी खालिल माहिती मला इमेलने (upadhye.rajeev@gmail.com) कळवावी. नाव जन्म तारीख जन्मस्थळ जन्मवेळ एका इच्छुकास एकाच जन्मतारखेचे विश्लेषण करून मिळेल याची कृपया नोंद घ्यावी. http://rajeev-upadhye.blogspot.com/

बेबी बॅक रिब्ज

लेखक स्वाती२ यांनी सोमवार, 08/02/2010 05:55 या दिवशी प्रकाशित केले.
आज सुपर बोल. पुन्हा एकदा पार्टी टाइम. आमच्याकडे सुपर बोल पार्टी म्हणजे बेबी बॅक रिब्ज. एरवी सोयिस्करपणे इतर कामे विसरणारा लेक रिब्जचे सोपस्कार मात्र आठवणीने पार पाडतो. एक आठवडा आधी फ्रीज वरच्या ग्रोसरी लिस्ट मधे बोल्ड अक्षरात बेबी बॅक रिब्ज अ‍ॅड होतात. फ्री़जर उघडून आईने रिब्ज आणल्यात याचे खात्री केली जाते. शुक्रवारी सकाळी शाळेला जाताना फ्रीजर मधल्या रिब्ज थॉ करायला फ्रीज मधे ठेव म्हणून परत एकदा आईला आठवण करुन देण्यात येते. शनिवारी रिब्ज कितपत थॉ झाल्यात हे पुन्हा एकदा बघितल जातं. आता गाडी वळते बार्बेक्यू सॉस कडे. इथे बार्बेक्यू सॉस म्हणजे अगदी जिव्हाळ्याचा विषय.