३ फेब्रुवारी २०१० रोजी राज ठाकरे यांची डोंबिवली येथे सभा झाली. सभा नेहमीसारखीच सॉलिड झाली. मराठीचा नेहमीचा मुद्दा तर होताच, पण त्याबरोबरच सध्या गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात जे काही प्रकार चालू आहेत त्याचाही उत्तम समाचार घेतलाय.
टॅक्सी परवान्यांचा इश्यु, त्यावरून मुख्यमंत्र्यांनी केलेलं घुमजाव याबद्दल राज बोललेच, पण त्याचबरोबर ह्याप्रकारानंतर विधानसभेत विरोधी पक्षाबरोबरच राष्ट्रवादींनीही झाल्या प्रकाराचा विरोध केल्याबद्दल राजनी त्यांचं अभिनंदनही केलं. राज जे नेहमी सांगत आलेले आहेत, की जे चांगलं असेल त्याचं कौतुक करूच मग तो रायव्हल पक्ष का असेना, त्याचं पुन्हा एकदा प्रत्यंतर आल.