Skip to main content

ज्युरी

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी रविवार, 14/03/2010 14:18 या दिवशी प्रकाशित केले.
पुर्वि न्यायदाना साठी न्यायाधिश साहेबांच्या व्यतिरिक्त ज्युरी असायचे..ति नेमकी पध्धत काय होति?...ति भारतात कधि पर्यंत चालु होति..ति कधि व का बंद झाली.?..या वर कुणी जाणकार माहिति देवु शकेल का?

)तुझ्या रेशमी केसांनी(

लेखक राजेश घासकडवी यांनी रविवार, 14/03/2010 14:11 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्या रेशमी केसांनी : एक सुडंबन विजुभाऊंनी विघडवलेलं सुघडवण्याचा माझा प्रयत्न. मूळ विडंबनाशी एकनिष्ठ राहाण्यासाठी यमक, वृत्त, कवितेचा स्वर व बरेचसे शब्द तेच ठेवलेले आहेत.
काव्यरस

कालाय तस्मै नमः ||

लेखक जयवी यांनी रविवार, 14/03/2010 14:04 या दिवशी प्रकाशित केले.
जसा जसा काळ पुढे सरकतोय, तसं तसं जग बदलतंय.....फार बदलतंय. मूलभूत गरजा सुद्धा बदलल्या आहेत. आधी अन्न, वस्त्र, निवारा ह्या तीन गोष्टी असल्या तरी आयुष्य निभत होतं. ह्या शिवाय जे काही हवं असायचं, त्या होत्या सुख सुविधा !! आता मात्र सगळंच बदललंय. अन्न, वस्त्र, निवाऱ्याखेरीज अजूनही खूप गोष्टी हव्या असतात जगायला आणि त्यांना सुख सुविधा म्हणून चालणार नाही.....त्या ही गरजाच झाल्या आहेत. इंटरनेट ही अशीच माणसानं स्वत:साठी निर्माण केलेली गरज. आधी कॉम्प्युटर्स नव्हते तेव्हा ही आयुष्य चालत होतंच की. पण आता जरा नेट बंद झालं की जीव अगदी कासावीस होतो. नेट बंद झालं की एकदम out of touch वाटतं.

सौंदर्यामधुन नित्य ती चालते

लेखक प्रशांत उदय मनोहर यांनी रविवार, 14/03/2010 13:52 या दिवशी प्रकाशित केले.
लॉर्ड बायरन् यांची "शी वॉक्स इन् ब्यूटी" ही कविता इंटरनेटवर मिळाली. आणि स्वैर अनुवाद करण्याची हुक्की पुन्हा आली. यात प्रत्येक ओळीसाठी बाराक्षरी छंद (६+६) वापरला असून शेवटल्या अक्षरांच्या आकार-इकार-उकारांमध्ये मूळ कवितेनुसार (१२१२१२; ३४३४३४; ५६५६५६) यमकांची मांडणी करण्याचा प्रयत्न केला आहे.

बाळाजी विश्वनाथ भट यांची मुत्सद्देगीरी

लेखक नितिनकरमरकर यांनी रविवार, 14/03/2010 13:43 या दिवशी प्रकाशित केले.
बाळाजी विश्वनाथ भट "पेशवे" होण्या पूर्वीची ही कथा आहे. नक्की काळ माहीत नाही परंतू संभाजी महाराजांच्या महानिर्वाणानंतर ही घटना घडली असावी. कदाचीत राजाराम महाराजांच्याही म्रुत्युनंतर असावी. औरंगजेबाचे प्रचंड सैन्य महाराष्टात धुमाकूळ घालत होते. जवळ्जवळ सर्व किल्ल्यांना वेढे होते किंवा ते मुगलांच्या ताब्यात तरी होते. बरयाच वेळा मराठे स्वता: किल्ला मुगलांच्या ताब्यात देत असत आणि थोड्या दिवसांनी परत जिंकून घेत असत! असाच सिंहगडाला वेढा पडला होता. मुगलांचा किल्ला घेण्याचा उत्साह फारच होता! एक एक वेढा वर्ष वर्ष चालत असे. किल्ल्याला तशी फारशी तोशिश लागत नव्हती.

प्रति तानाजी, प्रति बाजिप्रभू

लेखक नितिनकरमरकर यांनी रविवार, 14/03/2010 11:39 या दिवशी प्रकाशित केले.
सरसेनापती नेताजी पालकर यांना प्रति शिवाजी म्हणत असत हे सर्वांना माहीत आहे परंतू प्रति तानाजी आणि प्रति बाजिप्रभू फारसे कोणाला माहीत नाहीत म्हणून हा खटाटोप! तानाजी मालूसरे यांनी रात्रीच्या अंधारात कडा चढून जाऊन किल्ले सिंहगड सर केला होता त्याचप्रमाणे कानोजी (का कान्होजी) यांनी किल्ले पन्हाळा सर केला होता. आनंदराव मकाजी आणि कानोजी हे दोघे पन्हाळा सर करावयाला गेले होते. सिद्दी जोहर ला पन्हाळा द्यावा लागला हे शल्य शिवरायांना सारखे सलत होते! त्यामूळे ही मोहीम हाती घेण्यात आली होती.

विं दा करंदीकर यांचे निधन

लेखक डॉ.प्रसाद दाढे यांनी रविवार, 14/03/2010 10:59 या दिवशी प्रकाशित केले.
ज्येष्ठ कवि व ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित विं दा करंदीकर यांचे मुंबईत भाभा रूग्णालयात निधन झाले.. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो..

विंदा

लेखक विकास यांनी रविवार, 14/03/2010 10:52 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ताच सकाळ आणि म.टा. मधे वाचले की ज्ञानपिठ पारीतोषिक विजेते ९२ वर्षीय विंदा करंदीकर यांचे मुंबईत भाभा इस्पितळात निधन झाले. "देणार्‍याने देत जावे-घेणार्‍याने घेत जावे" असे म्हणणार्‍या विद्वान साहीत्यिकाने जसे स्वतःच्या लेखणीने भरभरून दिले तसेच स्वतःला ज्ञानपिठ मिळाल्यावर त्या बक्षिसातील रोख रक्कमही जनकार्यासाठी परत केली होती हे आठवले... विंदांच्या स्मृतीस विनम्र आदरांजली.

गमन !!

लेखक टारझन यांनी रविवार, 14/03/2010 09:44 या दिवशी प्रकाशित केले.
णमस्कार्स लोक्स ,,, येस .. "गमन" म्हणजे मिपावर डावीकडे मार्गदर्शक रकाण्यातला लॉग आउटचं बटण नव्हे... गमण .. म्हणजे "गमनं" च ! आज मिसळपाव होमपेज वरचा फोटू आणि तात्यानं केलेलं वर्णन पाहिलं आणि एक किस्सा आठवला . बारावी नंतर काही सरकारी कागदपत्रांच्या कामासाठी मला गणेशपेठ मधे जावं लागे. अर्थात त्या काळी ऑटो फिटो चे खर्च परवडत नसायचे .. बस ने जाण्या ऐवजी एखाद वडापाव चापता येईल म्हणुन बसने ही जाणे टाळायचोच ! कॉर्पोरेशन ला उतरलं की पदयात्रा. वाटेत पुण्याचा "फोरास रोड" लागत असे. त्या वयात ह्या गोष्टींच भलतंच आकर्षण असे. पण तिकडे जाणे कधी स्वप्नातही आणले नव्हतं. एक कुतुहलवजा आकर्षण मात्र असायचं ..