Skip to main content

टारझण मला खास वाटत नाहीत

लेखक बाबुराव यांनी मंगळवार, 16/03/2010 09:51 या दिवशी प्रकाशित केले.
शुद्धलेखनाच्या कक्षा ओलांडून तू मिसळपावच्या कुशीत शिरलास. [योग्यता नसतांना] याचे लेखन मोड, त्याचे तंगडे मोड, शब्दार्थापेक्षा इथं चिन्ह, तिथं चिन्ह, मिसळपावच्या बोकांडी हा उभा. वेळ जात नाय म्हणून यांच्या लेखनाच्या लाटावर लाटा, संकेतस्थळाचा भरतो नुस्ताच डाटा. दुर्लक्ष हाच एकमेव उपाय कारण वेळ आली आहे, याला करण्याची टाटा.
काव्यरस

पाईल्स कुठे आहेत?

लेखक नितिनकरमरकर यांनी मंगळवार, 16/03/2010 08:57 या दिवशी प्रकाशित केले.
मी सध्या कामानिमित्ते इंदोनेशियात जाकार्ताला रहातो. रोजच्या संभाशणासाठी इंग्लिशचा इतका प्रॉब्लेम येत नाही पण काही काही गोष्टीत मात्र फारच पंचाईत होते. त्याचाच हा एक छोटासा विनोदी किस्सा. इथे येऊन २ महिने झाले आणि अचानकच मूळव्याधीचा त्रास चालू झाला. *** "मोड" येणे म्हणजे काय त्रास असतो ते जो या अनुभवातून गेला आहे त्यालाच समजेल. आणि मी तर "पहिलटकरीण" होतो! आधी खरेतर असा त्रास कधी झाला नव्हता. इथल्या खाण्या मुळे असेल (*** साठी पु. ल. - रावसाहेब वाचा अथवा ऐका). भरपूर हिरव्या मिरच्या, लसूण असतो इथल्या भाज्यांमध्ये आणि ८-१० दिवसातून एकदा फणसा ची भाजी! यामुळे असावे.

गुढीपाडवा, आणि सामाजिक जबाबदारी

लेखक इंटरनेटस्नेही यांनी मंगळवार, 16/03/2010 02:26 या दिवशी प्रकाशित केले.
गुढीपाडवा, आणि सामाजिक जबाबदारी आपण सर्व गुढीपाडवा, दिवाळी, होळी अशा एक ना अनेक सणांच्या वेळांना शुभेच्छापर पत्र, एस.एम.एस. पाठवीत असतो. माझ्या मते, अशा संदेश सोबतच, आपला संदेश्याच्या शेवटी एक तळटीप म्हणून आपण: १. 'विजेचा काटकसरीने वापर करा.', २. 'वाहन चालविताना फोनचा वापर करू नका.', ३. 'अंधविश्वासाला बळी पडू नका.' ४. 'हुंड्याची मागणी करणे बेकायदा आहे.' अश स्वरूपाचे सामाजिक संदेश टाकल्यास, दीर्घ कालावधीने का होईना, निदान काही लोकांच्या वागण्यात अंशतः तरी फरक पडेल. माझ्या आशावादाला समर्थन मिळते कारण, बहुतांश लोक असे शुभेच्छापर संदेश आल्यावर तेच पुढे पाठवत असतात.

माया की माया

लेखक मराठे यांनी मंगळवार, 16/03/2010 00:27 या दिवशी प्रकाशित केले.
निर्लज्जपणाची हद्द! "पुतळा उभारणीवर टीका करणार्यांना मी विचारते की, जिवंत माणसांचे पुतळे उभारू नयेत असं कुठल्या पुस्तकात लिहिलेय?" - इती (जिवंतपणी स्वतःचा पुतळा स्वतःच उभारणारी) मायावती आपल्या देशात करदात्याच्या पैशाचा अपव्यय कधी आणि कसा होतो ह्याचं आणखी एक उदाहरण. मायावतीचा २०० कोटींचा हार .नुसता राग राग होतोय. तिकडे कुठल्यातरी गावात जेवण आणि कपडे मिळणार म्हणून चेंगराचेंगरीत लहान मुलं मरतात आणी इथे हे !!!

म्हणतात...अंनिस प्रणित विधेयकाचे बारा वाजले?

लेखक शशिकांत ओक यांनी सोमवार, 15/03/2010 23:23 या दिवशी प्रकाशित केले.
म्हणतात...अंनिस प्रणित विधेयकाचे बारा वाजले? अंनिस वाल्यांच्या एका व्याख्येप्रमाणे, "उत्कटपणे कृतीशील झालेली विवेकशक्ती" म्हणजे 'श्रद्धा' - ती ज्याची जागृत झालेली तो पंढरीचा वारकरी हा सश्रद्ध आणि "मूल्य विवेक उन्नत करते" ती 'श्रद्धा' या दुसऱ्या व्याख्येनुसार समतेच्या लढ्याच्या विविध आघाड्यांवर वारसंप्रदायाने पुढाकार न घेतल्याच्या आरोपामुळे वारकरी संप्रदाय अंधश्रद्धा जोपासतो ...नक्की काय?... ...निवाडा करताना भलेभले गोंधळलेले... ...

संतू..

लेखक प्राजु यांनी सोमवार, 15/03/2010 23:12 या दिवशी प्रकाशित केले.
"आत्त्या.. मी काय कराय णाई..! भांडी आपोआप खाली पडल्यात.." हे असलं बोलणं म्हणजे नक्कीच संतू. कराय णाई, बगाय णाई, दिसाय णाई.. अशी क्रियापदांची धिरडी हा संतूच करू जाणे.. संतू!! खरं नाव चंद्रकांत ढवणे(ढवने). याची मोठी बहीण माझ्या मामाकडे कामाला होती. मामाकडेच लहानपणापासून राहिलेली तिथेच वाढलेली. आमचं बिर्‍हाड जेव्हा इचलकरंजीहून कोल्हापूरला हललं तेव्हा माझ्या आईच्या मागे लागून हीने याला आमच्यासोबत कोल्हापूरला पाठवून दिला. "तुमच्या घरी कामाल राहुदे.. तिथे काहीतरी शिकेल आणि र्‍हाईल.." असं म्हणून तिने त्याला आमच्यासोबत पाठवून दिलं.

प्राचीन साहित्यातील वसंतोत्सव

लेखक अरुंधती यांनी सोमवार, 15/03/2010 23:00 या दिवशी प्रकाशित केले.
वसंत ऋतू म्हटल्यावर त्याची सांगड बहरलेले आम्रतरु, फुललेले पलाशवृक्ष, शीतल वारे, कोकिळगान, रंगोत्सव व गंधोत्सवाशी घातली जाते. शिशिराच्या कडाक्याच्या थंडीनंतर वसंत ऋतू अवतरतो तेच झाडांच्या निष्पर्ण फांद्यांवर हिरवी, कोवळी, लुसलुशीत पालवी पांघरून! कवी, प्रेमी, कलासक्त, रसिक जनांसाठी वसंतोत्सव म्हणजे साक्षात पर्वणीच! होळी, वसंतपंचमी व शिवरात्री हे तिन्ही उत्सव ह्याच काळात येतात. आपले पूर्वज हा वसंत ऋतूचा उत्सव कसा साजरा करायचे ह्याचीही अतिशय रोचक वर्णने प्राचीन साहित्यात वाचायला मिळतात. पौराणिक कथांच्या अनुसारे वसंत हा कामदेवाचा पुत्र!

(आज अचानक गाठ पडे)

लेखक चतुरंग यांनी सोमवार, 15/03/2010 21:35 या दिवशी प्रकाशित केले.
सक्काळी सक्काळी ग्रासस्टांझाजचे अफलातून इडंबन, त्यावरच्या मुसुंच्या एक्सपर्ट कमेंट्स आणि मग मिभोकाकांचे नाडी शब्द न आणता करायच्या विडंबनाचे आव्हान असा तीनकलमी मसुदा पुढे असल्यावर देरी किस बात की?
काव्यरस

एक टुमदार गाव - माझे माधवनगर - भाग - २.

लेखक शशिकांत ओक यांनी सोमवार, 15/03/2010 20:48 या दिवशी प्रकाशित केले.
एक टुमदार गाव माझे माधवनगर - सन १९६० ते १९७० दसकातील आठवणी भाग - २.
मागेवळून पाहता कधी आठवतात मजेशीर गोष्टी ... बुधवार पेठेत स्वर्गात न्यायाला विमान येणार म्हणून पत्रके वाटून मोठी तयारी केलेले श्रद्धाळू जाखोटिया... त्यांचा भसाड्या नाकाचा राजा... रेल्वे स्टेशनच्या पलिकडील सुंदर विठ्ठल मंदिरात हभप वासुदेवराव जोशींची टाळ मृदुंगाच्या तालावर होणारी हरिपाठाच्या अभंगांवरील कीर्तने... त्यानंतर नातू शेठजींचे ‘इष्टी’ कथन... त्यात बालगंधर्वांचे भजन गायन... ६७ सालातील भुकंपानंतरची रात्र... चोरट्यांच्या बंदोबस्तासाठी रात्री 2 ते 4 गस्त घालण्याची कामगिरी...