Skip to main content

मांसाशनाचा महिमा...

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी शुक्रवार, 23/04/2010 13:01 या दिवशी प्रकाशित केले.
केवळ नामोल्लेखानेच कुणाला मळमळ होईल तर कुणी उतावीळ होईल. जितके प्राण्यांचे प्रकार तितक्या मांसाशनाच्या पद्धती, त्याहून जास्त मांसासाठीच्या पाकसिद्धी. मांसाहारामुळे बुद्धी बद्ध होते हा सिद्धकांचा आरोप असतो. प्रत्यक्षात तसे घडतेच असे नाही. अर्थात खाण्याबरोबर पिण्याची सोय झाली तर पुढे बऱ्‍याच गोष्टींची गैरसोय देखील होतेच. बुद्धीचे प्रकरण गुद्दी पर्यँत वाढते,इतकी खाणाऱ्‍या पिणाऱ्‍यांना चढते! एकंदर काय तर मांसाशनाची मैत्री मदिरापानाशी जोडली गेल्याने सगळा जांगडगुत्ता झालाय. अशक्तपणात मांसाची आसक्ती ठेवल्याशिवाय शक्ती येत नाही किंवा क्षयरोगावर चिकनसूपासारखे पेय नाही अशी एक धारणा आढळते.

!! चोराळ्या!!

लेखक आंबोळी यांनी शुक्रवार, 23/04/2010 12:19 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा : !!चारोळ्या!! तुझी आठवण येते तेव्हा तु पाठवलेल्या खरडी वाचत बसतो तु येणार नाहीस माहित असतं मिरे खिश्यात टाकून मग स्वतःवरच हसतो.. ******************* मागणार्‍याची चंची कुठेतरी हरविली मागणारा व्याकुळतेने तडफड्ला चंची मागूनही नाही मिळाली मग मागणार्‍याने तंबाखू सोडली.. आपला आंबोळी

असाच व्हावा शेवट माझा......

लेखक झुम्बर यांनी शुक्रवार, 23/04/2010 10:39 या दिवशी प्रकाशित केले.
असा यावा मृत्यू मला की वेदनांनी सुखावून जावे आणि सुखानीही माझ्या कडे आता असूयेने पाहावे मी अशीच गुणगुणता गाणे श्वासांनी थांबून जावे लिहिता कविता मृत्यूने हळूच मजला कुशीत घ्यावे मी हुंगावे फुल सुगंधी आणि क्षणात राख व्हावे खाली ही असे पडावे जणू वेली वरुनी कुसुम गळावे जलाधीच्या वेगवान लाटेतुनी मृत्यूने घालावी साद कधी मी त्याच्यात विलीन व्हावे जणू मीच व्हावे मुग्ध नदी मुसळधार पावसात मजला दामिनीने करावे चिंब मी हासत हासत तिचे मनोरम बनावे प्रतिबिंब असाच व्हावा शेवट माझा थेट भिडवा मृत्यू मला आयुष्याने ठकावले बहु मृत्यूच इमानी अन असे भला अनुजा(स्वप्नजा)
काव्यरस

“ चंद्र हवा मज “ ! ! !

लेखक निरन्जन वहालेकर यांनी शुक्रवार, 23/04/2010 10:36 या दिवशी प्रकाशित केले.
“ चंद्र हवा मज “ ! ! ! “ किती करशी प्रेम मजसी “ ? प्रश्नं करी मज प्रेयसी. “ विशाल आकाशा येवढे, वा त्याहिपेक्षा जास्तच थोडे “ आम्हीहि वदलो लाडेलाडे “ ई s s श्य ! तुम बडे वो s s हो ! ! प्यार मे मगर सो-सो हो “ ! नाहीतर आतापर्यंत, घालूनी गवसणी गगनासी, आणुनिया चंद्रासी, दिधला असता नजराणा मज प्रेमळ हट्टा पायी “ बस ? इतकच ?
काव्यरस

!! चारोळ्या !!

लेखक मराठमोळा यांनी शुक्रवार, 23/04/2010 10:14 या दिवशी प्रकाशित केले.
हा आमचा एक प्रयत्न... आवडला तर सांगा, नाही आवड्ला तरी सांगा.. तुझी आठवण येते तेव्हा तु दिलेली प्रेमपत्रे वाचत बसतो तु येणार नाहीस माहित असतं डोळे पुसुन मग स्वतःवरच हसतो.. ******************* चिमण्याची चिमणी कुठेतरी हरविली चिमणा व्याकुळतेने तडफड्ला चिमणी शोधुनही नाही मिळाली मग चिमण्यानेही प्राण सोडला.. आपला मराठमोळा

दमलेले ढग

लेखक फ्रॅक्चर बंड्या यांनी शुक्रवार, 23/04/2010 09:43 या दिवशी प्रकाशित केले.
परवा माझ्या दारावर आला एक तहानलेला ढग उन्हामुळे रापलेला तहानेने व्याकुळलेला कापसाचा गोळा म्हणावे असे तर त्याच्याकडे काहीच नाही अन पाउस ह्याच्याकडेच लपला असावा असे तर मुळीच नाही मी त्याला पाणी दिले अन विचारले इतका का धावतो आहेस ? असे काय लपवतो आहेस ? तो बोलला विमान मागे लागले आहे .. पाउस शोधणारे ... पाउस मागणारे ... मी ठरवणार, मी कुठे बरसायचे ? कुणाला तरसवायचे !!! म्हणून धावतोय .. ज्यांनी निसर्गावर प्रेम केले, धरती अन आकाशावर प्रेम केले त्यांच्यासाठी ... http://binarybandya.blogspot.com/

मिपाचे मुखपृष्ठ व खादाडी सदर, एक निवेदन..

लेखक विसोबा खेचर यांनी शुक्रवार, 23/04/2010 09:01 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मायबाप मिपाकरहो, अदिती यांनी सुरू केलेल्या 'आजची स्त्रीची प्रतिमा' या धाग्यात मिपाच्या मुखपृष्ठाबद्दल, खादाडी सदराबद्दल अनेकांनी हिरिरीने आपले विचार मांडले व मते नोंदविली.. वास्तविक या धाग्याचा काही भाग हा 'आजची स्त्री व विविध माध्यमात तिचे होणारे दर्शन/प्रदर्शन' या संबंधी काही भाष्य करणारा होता, तोही पुसट अक्षरात! व बराचसा भाग हा चन्नम्मा या एका इतिहासकालीन कर्तृत्ववान स्त्रीवर होता.

समोर आता येते कशाला

लेखक पाषाणभेद यांनी शुक्रवार, 23/04/2010 06:07 या दिवशी प्रकाशित केले.
समोर आता येते कशाला
समोर आता येते कशाला ||धृ||
समोर आता येते कशाला, तिर नजरेचा मारतेस मला मदनबाण लागतो ग उरी, जखम खोलवरी ठाव नाही ग तुला ||
समोर आता येते कशाला ||१||
याद असतीस मनी राहूनीया दुरी काळीज धडधडता काय न कळे ग मला होईल वेडा असेच वाटे ग मला ||
समोर आता येते कशाला ||२||
वाटे संगती असावीस सदा, नयनी माझ्या न गाळावे आसवांना कितीदा तरी हसलो समोरी, तू ग उभी तरीही न कळावे का तुला ||
समोर आता येते कशाला ||३|| - पाषाण
काव्यरस