Skip to main content

“ चंद्र हवा मज “ ! ! !

लेखक निरन्जन वहालेकर यांनी शुक्रवार, 23/04/2010 या दिवशी प्रकाशित केले.
“ चंद्र हवा मज “ ! ! ! “ किती करशी प्रेम मजसी “ ? प्रश्नं करी मज प्रेयसी. “ विशाल आकाशा येवढे, वा त्याहिपेक्षा जास्तच थोडे “ आम्हीहि वदलो लाडेलाडे “ ई s s श्य ! तुम बडे वो s s हो ! ! प्यार मे मगर सो-सो हो “ ! नाहीतर आतापर्यंत, घालूनी गवसणी गगनासी, आणुनिया चंद्रासी, दिधला असता नजराणा मज प्रेमळ हट्टा पायी “ बस ? इतकच ? येतोच बघ जाऊन आम्ही “ येतो घेऊन चंद्रासी सत्वरी धरी थोडी सबुरी, आमच्या प्रेमापायी. पोहोचलो काही वेळातच, दौडत दौडत वेडांत, प्रियतमा विचारी लाडांत “ कुठे आहे चंद्रमा ”? टोपी होती शिरावर, फेकुनीया ती सत्वर, दाविला चंद्रमा, जणू पुनवेचा, तुळतुळीत ! चमकता ! ! टोपीखाली लपलेला! ! ! निरंजन वहाळेकर
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1037
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया