(मिपावरील एका सदस्येचे "रिक्षावाल्या" बरोबर रिक्षा भाड्याबाबत आलेल्या अनुभवाचा धागा वाचला. तिथे माझीही अशाच धर्तीची प्रतिक्रिया लिहायला गेलो, तर असे आढळू लागले की, मूळ लेखापेक्षा माझी प्रतिक्रिया खूपच लांबलचक होऊ लागली आहे, तेव्हा ती तिथे न देता म्हटले चला या बाबीचा आपला असा एक स्वतंत्र धागा करू या... तो असा >>)
आम्ही कोल्हापूरकर मटण, मासे, चिकन (खाण्यामध्ये विशेषत:...) मध्ये भलतेच "हुशार", पण आमची ही हुशारी फक्त खाण्यात. खरेदीमधील खाचखळग्यात मला शून्य ज्ञान. मटण म्हणजे दुकानदार जे देतो ते मटण, मग ते बोकडाचे आहे की, मेंढ्याचे, की पालव्याचे इ. सूक्ष्मबाबींचे माझे अगाध अज्ञान.