चमचे, डाव आणि पळ्या
(स्वगतः हल्लीच अमेरिकेत कमावलेले अनेक डॉलर भारताची इकॉनॉमी बूस्ट करण्यासाठी सत्पात्री, तेही एका हाताचे दुसर्या हातालाही न कळता दान दिले गेल्याची गोड बातमी सगळीकडे मधुर फुलांचा सुगंध जसा पसरल्याशिवाय राहत नाही तशी कर्णोकर्णी पसरली असावी. आणि सगळीकडून प्रेमळ हक्क दाखवणार्या लोकांनी या दानाविषयी माहिती काढून घ्यायला गराडा घातला. हक्काच्या लोकांनी आस्थेने चौकशी केल्याने झालेला आनंद जणू कमी आहे म्हणून की काय, पण आद्य माननीय मालक आणि आणीबाणीकार, तसेच फाटेमार, चपलाकार, आणि महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या आश्रमातील महिलांचे बंधु आणि तारणहार श्री. तात्या अभ्यंकर यांचे डाव, चमचे, आणि पळ्या असाच सन्मान लवकरच कोणालातरी जाहीर होईल अशी कुणकुण लागली आहे. तात्या सध्या मिसळपावावरून दूर आहेत म्हणून मिपाकरांना चैन पडत नव्हते. विरहाचे अतीव दु:ख होत होते. ते दु:ख दूर करण्यासाठी ही पदवीची कल्पना किती सुरेख आहे. हॉटेलासाठी चमचे, डाव आणि पळ्या यांचे अतूट नाते बघता या पदवी सुचणार्या मस्तकाचे आम्हाला फार कौतुक वाटले, आणि हा सन्मान प्राप्त करून घेण्याची एक प्रकारची ईर्षाही वाढली. अर्थात यासाठी तात्यांचे थोडे गुणवर्णन करावे लागणार. पण ते आम्ही आधीही थोडेफार करून पोर्टफोलिओ तयार केला आहे, पण त्याची याक्षणी मिसळपावकरांना आठवण करून देणे अतिशय महत्त्वाचे आहे. म्हणून वरील सन्मानासाठी योग्य ठरू शकेल असे, म्हणजे तात्यांचे आजवर आम्ही गुणवर्णन कसे केले आहे, तात्यांना मिसळपावाला अधिकाधिक आकर्षक करण्यात मदत कशी केली आहे, थोडक्यात चमचे, डाव आणि पळ्या हा सन्मान प्राप्त करण्याची आमचीच कशी लायकी आहे याविषयी आठवण करून देणारे निवेदन देणे भाग आहे.)
तात्यांचे गुणवर्णन कसे करावे? शब्दच सुचत नाहीत. मिसळपावावरील गुणीजनांना एका प्रेमळ धाग्याने बांधून ठेवणार्या या व्यक्तीचे नाव जरी काढले तरी लोकांची मने भरून येतात. पण थोडक्या शब्दांत वर्णन करता आले तर बघावे, म्हणून अगदी अलिकडेच निघालेल्या घासकडवी क्लासेसमधून जी अमूल्य शिकवणी मिळाली, त्याचा तातडीने, म्हणजे अगदी चोवीस एक तासांत वापर करून मध्यंतरी आम्ही एक कवितक काढले.
अलिकडे प्राजुताईंचे पुस्तक प्रसिद्ध केले अगदी तसेच एखादे कवितकांचे पुस्तकही पुढेमागे काढण्याचा विचार करून ठेवला आहे. पण प्राजुताईंचे पुस्तक जसे झाडांच्या थंड सावलीत, उसाच्या रसाचा आस्वाद घेत प्रसिद्ध झाले तसे न करता त्याचा प्रकाशन समारंभ प्राजुताईंपेक्षाही एकदम सरस ठिकाणी करू, जेथे उसाचा रस नाही, तर रक्तवारूणि वाहील. मग त्या आनंदाच्या सेलेब्रेशनसाठी अजून एक रक्तवारूणि आणि यमन, समोर असा अथांग पसरलेला काळाभोर खोल खोल समुद्र आणि जवळ आवडीचा पुरूष. बेबी सिटरची व्यवस्था करावी लागेल, पण हरकत नाही. नंतर कधीतरी जरा लोकांसाठी एखादी पार्टी वगैरे. त्यात यंगेज लोकांसाठी पप्पू कान्ट डान्स साला पासून ते कदाचित जुन्या खोडांना पालवी फुटावी म्हणून जॉय मुखर्जी, प्रदीपकुमार आणि विश्वजीत या तिघांवर चित्रित झालेल्या अफलातून गाण्यांचे सूर मनात शिरतील. किंवा मजरूहच्या दर्दभर्या गाण्यांनी बेचैन होऊ, कोणी सांगावे! पण ते असो.
तर त्या पुस्तकाची इच्छा मनात ठेवून कवितक काढले. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे - कवितक म्हणजे काही आरती नाही. प्रत्येक काव्यप्रकाराची म्हणून स्वतःची काही वैशिष्ट्ये असतात. हे लक्षात घेणे फार महत्त्वाचे आहे. आरती आणि कवितक यांत काही साम्ये आहेत, तर काही फरक. साम्य हे, की कवितक आणि आरती, म्हणजे गुणवर्णनच असते. निदान घासकडवी क्लासेसमध्ये असेच सूचित झाले होते. आठवून पहा - विशेषणे असणे अनिवार्य होते, क्रियापदे नसली तरी चालत होते. विशेषणे म्हणजेच गुणवर्णने नाही का? आणि फरक असे की जसे - आरती करताना देवाचे नाव त्यात घ्यावेच लागते. जसे "जय देव, जय देव, जय श्री शंकरा" प्रमाणे. पण कवितकांमध्ये त्याची गरज नाही. विशेषनाम असण्याची गरज नाही, सामान्य नाम चालते. आणि मग तात्यांचेच गुणवर्णन केले. कयास बरोबर ठरला, मिसळपावावरील काही गुणग्राहक वाचकांनी तात्यांचे केलेले अवगुंठित गुणवर्णन ओळखून सूज्ञपणे अनेक प्रतिसाद देऊन आम्हाला तृप्त केले, पण तरीही सन्मान देण्यासाठी परीक्षण करणार्या गुणग्राहकांची नजर तिथे पडली नसेल, अशा दु:खद भावनेने वावरत होतो, आपल्यात कवितेची ती जनुकेच कशी ती नाहीत याचे दु:ख करीत होतो. पण या नवीन पदवीच्या विचाराने आशा पल्लवित झाली आहे की पुढेमागे असा सन्मान मिळाला की मिसळपावच्या मुखपृष्ठावर आजच्या खादाडी सदराखाली आपलीही छबी दोन्ही हातात एकेक डाव, चमचे आणि पळ्यांसकट त्या दाक्षिणात्य सुंदर्यांच्या फोटोखाली का होईना, झळकू शकेल.
मिसळपावावरच्या मुखपृष्ठाचे कौतुक तर काय सांगावे, महाराजा! अशा अशा सुंदर, काळजाला हात घालणार्या तरूणींनी ते भूषित केले आहे आजवर की इतर लोकांनी त्याला खूप नावाजले, खूप नावाजले. पण सन्मान आणि पारिपोषिकांचे एकच आहे. ते असे नुसतेच नावाजले म्हणून दिले जात नाहीत, त्यासाठी लोकांच्या सातत्याने नजरेत भरावे लागते, परिसंवाद घडवून आणावे लागतात हे आम्ही नीट पाहिले आहे. तसाच एक परिसंवाद आम्हीही घडवून आणला. पण त्याकडेही तज्ञांचे दुर्लक्ष झाले असे आत्तापर्यंत वाटले. पण आता मात्र खरडवह्यांच्या संशोधनाअंती ही पदवी किंवा सन्मान आमच्यापासून फारसे लांब नाहीत अशी एक कुणकूण लागली आहे. शेवटी खर्या गुणग्राहकांचे लक्ष खर्या टॅलंटकडे जातेच! फक्त ते टॅलंट हल्लीच्या काळात जाहिरातबाजी करून अशा गुणग्राहकांपर्यंत आणावे लागते.
डोळे आजवर मिळालेल्या हक्काच्या माणसांनी केलेल्या सन्मानांनी पाणावले आहेत, मन भरून आले आहे, भैरवीचे सूर खुणावू लागले आहेत, आणि बाहेरचा गार वारा, हवेत आलेला ओलसरपणा, आणि नागमोडी चालत जाणारी वाट खुणवायला लागली आहे.
याद्या
4943
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
भैरवी ???
चित्रा @ हर बेस्ट =))
In reply to भैरवी ??? by मिसळभोक्ता
मिसळपावावरील गुणीजनांना एका प्रेमळ धाग्याने बांधून ठेवणारा
अग बाबौ...
चित्राताई
व्याधी
In reply to चित्राताई by मुक्तसुनीत
विसर
In reply to चित्राताई by मुक्तसुनीत
पुस्तक
सगळ्यांनी
राग मिपा
चित्राताई
धन्यवाद
In reply to चित्राताई by शुचि
नका जाऊ
In reply to धन्यवाद by चित्रा
माझं नाव घेतलेलं नसलं तरीही रहावत नाही.
In reply to चित्राताई by शुचि
तुमचा
In reply to माझं नाव घेतलेलं नसलं तरीही रहावत नाही. by ३_१४ विक्षिप्त अदिती
.... भैरवीचे
शेवटचा
चित्राताई
चित्रातै