Skip to main content

गीत: पहाटे पहाटे जवळ तू ये ना

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 15/06/2010 06:20 या दिवशी प्रकाशित केले.
पहाटे पहाटे जवळ तू ये ना
पहाटे पहाटे जवळ तू ये ना धुंदीत झोपतांना जागी तू हो ना पहाटे पहाटे मिठीत तू ये ना ||धृ|| थंडी गुलाबी न सोसणारी अशातच रात्र गेली न संपणारी अनुभूती वेगळी सारी, आली माझीया तना पहाटे पहाटे जवळ तू ये ना ||१|| आठवणी सार्‍या डोळ्यात जाग्या होवोनी झोप ही सुखाची डोळ्यात येवोनी स्वप्नात माझ्या तू येशी का पुन्हा पुन्हा पहाटे पहाटे जवळ तू ये ना ||२|| आठवून सारी रात झोपलेली उमगते गुढ काव्य मंतरल्या वेळी रोम रोम फुलले अंगी सुखावी तना पहाटे पहाटे जवळ तू
काव्यरस

(माडीवरचा तो हात!)

लेखक टारझन यांनी मंगळवार, 15/06/2010 01:39 या दिवशी प्रकाशित केले.
ह्या लेखाची प्रेरणा ही विकासरावांचा "(गाडीवरचा तो हात!)" हा खर्‍या अर्थाने हृद्य (म्हणजे कसा ते मी डोक्यावरी बरीच केसं उपटली तरी कळलं नाही असा माझा कयास आहे ) अनुभव आहे. त्यावरून जरी खालील अनुभव लिहीत असलो आणि म्हणून कंसात शिर्षक दिले असले तरी, ते विकासरावांच्या लेखाचे हे कृपया विडंबन समजू नये ही धमकी.

इंटर व्ह्यु

लेखक विनायक प्रभू यांनी सोमवार, 14/06/2010 23:27 या दिवशी प्रकाशित केले.
"येउ का आत सर?" या. बसा. "पंधरा दिवसांनी येतेय" चौदा. "आज तुमचे एच. आर. नाहीत का"? नाही. "भेटायची उत्सुकता होती". ते खंडाळ्याला गेले आहेत. "परत केंव्हा भेटतील". सांगता येणार नाही. एका खाजगी कंपनी ने 'रेन फॉरेस्ट' कापुन रिसॉर्ट बनवला. हे गेलेत झाडे लावायला. पंधरा दिवसात १०००० झाडे लावायचा संकल्प सोडला आहे त्यांनी. खंडाळ्याच्यावर सुमारे २००० फुटावर. "हम्म" तुम्ही इंटरव्ह्यु नंतर मला न भेटताच निघुन गेलात. "I was not myself. मॅरॅथॉन धावल्यासारखे झाले." असे काय झाले? मला पण खुप उत्सुकता आहे. "तुम्हाला रिपोर्ट आला नाही." He reports to none. फक्त जाताना एक बंद एनवलप देउन गेले.

आवडती English गाणी.

लेखक शानबा५१२ यांनी सोमवार, 14/06/2010 23:19 या दिवशी प्रकाशित केले.
जरी आपण मराठी असलो तरी दुस-या भाषेतील कलेतला,गाण्यातला वरचढपणा (superior ह्या अर्थाने) हा आपल्या मनाला भावतोच!!

असाही असतो 'अभिमान'?

लेखक अरुंधती यांनी सोमवार, 14/06/2010 21:57 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्यात अनेक वळणांवर काही मजेशीर लोक भेटतात. कित्येकदा त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील काही गमतीशीर गोष्टी आपले लक्ष वेधून घेतात, तर काही वेळा त्यांच्या वागण्या-बोलण्यातून आपली निखालस करमणूक होत राहते. आणि सर्वात मजेची गोष्ट म्हणजे अश्या व्यक्तींच्या गावीही नसते की त्यांच्या वागण्यातून उत्तम विनोदनिर्मिती होत आहे! असाच एका कुटुंबातील हा खराखुरा किस्सा. थोडा आंबटगोड आहे आणि थोडा कडूपण! तर हे पुण्याच्या मध्यवर्ती भागात राहाणारे कुटुंब म्हणायला पाचजणांचे.... पण त्यांच्या घरात, दहा बाय बाराच्या दोन खोल्यांमध्ये साधारण आठ ते दहा माणसे नांदत. शिवाय गावाकडून येणारा पै पाहुणाही असायचा सोबत.

माझं (कोकणातील) घर आणि परिसर :)

लेखक अस्मी यांनी सोमवार, 14/06/2010 17:20 या दिवशी प्रकाशित केले.
हे फोटोज आहेत माझ्या घराच्याइथले आणि माझ्या गावातले - मालघरमधले :) म्हणजेच कोकणातले.. चिपळूणपासून १३ km वर असलेलं माझं हे छोटंसं गाव चिपळूणहून गुहागरला जायच्या रस्त्यावर आहे. ही आमची नदी...तांबी नदी आणि धरण :) बागेत खूप फुलपाखरे असतात.

बरसात की रात!!

लेखक शशिकांत ओक यांनी सोमवार, 14/06/2010 16:45 या दिवशी प्रकाशित केले.
बरसात की रात!! जिंदगीभर नही भूलेगी वो .... आम्ही दोघेच...अंधाराच्या गाभाऱ्यात... भुरुभुरु पावसाची हलकीशी सर... ओलावलेल्या पानांची मंद सळसळ....गारव्याची झोंबाझोंबी... आनंदाची शिरशिरी... कोण बोलले... काय बोलले... याची तमा कोणाला... हळुवार आठवणींचे मोरपिस मनाला गोंजारून गेले... ती रात्र... ती जागा... ती ती... मनात कायमची घर करून गेली... आठवणीचे मनोरे चढत गेले...

मराठी माध्यम, इंग्रजी माध्यम कि कॉन्हेंन्ट

लेखक श्रीराजे यांनी सोमवार, 14/06/2010 15:20 या दिवशी प्रकाशित केले.
आताच शैलेश यांचा शाळेवरती लेख वाचला आणि आपणही आपली एक समस्या मांडावी असे वाटले. माझा मुलगा आता अडीच वर्षाचा होईल. तर आतापासुनच घरात बरीच चर्चा होत आहे कि त्याला कोणत्या शाळेत घालायचे ते. मराठी माध्यम, इंग्रजी माध्यम कि कॉन्हेंन्ट (कॉन्हेंन्ट - हे सुध्दा इंग्रजी माध्यमामध्ये येते असे वाटते.) या सर्व चर्चेमध्ये बरेच प्रश्न उपस्थित झाले ते खालिल प्रमाणे: १) या तीन्ही माध्यमांमध्ये कोणते फऱक आहेत आणि त्यांचा पुढील शिक्षणासाठी काही फरक पडतो का? २) कोणते माध्यम चांगले आहे. ३) इंग्रजी माध्यम आणि कॉन्हेंन्ट यात खुप फरक आहे का?

ओंगळ समस्त, आम्ही नंगे...

लेखक अर्धवट यांनी सोमवार, 14/06/2010 15:11 या दिवशी प्रकाशित केले.
कालच्या बातम्यांमधे सर्व वाहिन्यांवर भोपाळ दुर्घटनेवर माहिती ऐकली.. राजदीपला प्रत्यक्ष फील्डवर खुप कमी वेळा बघितला होता.. एकएक कहाणी बघुन मन सुन्न झालं.. खुप वेळ तळमळ चालली होती.... मानवी मनाचा काहीतरी गुण असावा खास.... सगळ्या जगातल्या पापापुण्यांचे खापर कुणाच्यातरी डोक्यावर एकदा फोडले कि मग आपण आपापले गटारजिणे जगायला मो़कळे.. बर ते खापर फोडायला प्रत्येकवेळेला कुणिनाकुणी सापडतोच आपल्याला....अ‍ॅन्डरसन वा राजीव गांधी वा ईतर कुणिही.... सकाळी जाग आल्यावर (अस नुसते म्हणायचे, खरी जाग येतच नाही.. एका झोपेतुन दुसर्‍या झोपेत....सारखा भ्रमप्रवास चालू) पण भोपाळ मनातुन जाईना.....