Skip to main content

बैल

लेखक विनायक प्रभू यांनी शुक्रवार, 25/06/2010 07:56 या दिवशी प्रकाशित केले.
अहो काय म्हणतोय ते बघाल का? "काय"? ट्रिप ला जातोय. " जाउ दे की" पंधरा हजार मागतोय. "ठीक आहे. देउन टाक" कुठे ते विचारा की? "बर. विचारतो. कुठे"? वर्गातले मित्र आणि मैत्रीणी पण बरोबर आहेत. "ठीक आहे. त्याचे काय? रिझल्ट लागला आहे. मोकळे आहेत. करु दे की काय हवे ते." ज्युनियर मित्र आणि मैत्रीणी आणि पण बरोबर आहेत. "हो का.? बर बर." अहो, दोन प्रोफेसर्स पण बरोबर आहेत. "वा वा वा. चांगले आहे की." अहो ते सर्व खजुराहो ला चालले आहेत. दोन दिवस राहाणार आहेत. "मग त्यात तुला प्रॉब्लेम काय आहे? नविन शिक्षण पद्धतीचा भाग आहे तो. त्याला एक इंग्रजी शब्द आहे खास. तुला सांगितला तर नाही कळायचा.

(रुल)

लेखक केसुरंगा यांनी शुक्रवार, 25/06/2010 02:36 या दिवशी प्रकाशित केले.
अवलियांनी टाकलेल्या रुळांवरुन बर्‍याच विडंबन गाड्या गेलेल्या बघितल्या आणि आम्हाला मात्र आमच्या घरातला 'रुल' आठवला! ;) रिमोट हातात घेवून आम्ही भांडायचो ती एका बटणावर हात ठेवायची अन् मी दुस-या बटणावर हात ठेवायचो टिव्ही बघत चरत असतांना बडबडत असतांना असंच संध्याकाळभर भांडायचो एकमेकांना हलकेच धमकावुन सांगायचो एचबीओ चॅनेलवरुन शेवटी 'तसल्या' शोची वेळ निघुन गेली मी मात्र मारत आहे त्याच रिमोटवरुन हवरटासारख्या चकरा... चॅनेल टु चॅनेल. -केसुरंगा
काव्यरस

मूळ

लेखक केशवसुमार यांनी शुक्रवार, 25/06/2010 00:24 या दिवशी प्रकाशित केले.
आज बरेच वेळाने मिपावर आलो आणि बघतो तर काय विडंबनाचा पाऊस... सगळी विडंबने वाचता वाचता एका स्थळावर आमचा मूळापासून केलेला बंदोबस्त आठवला प्रतिसादाला प्रतिसाद देत आम्ही खेचायचो तो एका मुद्यावर पाय ठेवायचा अन् मी दुस-या मुद्यावर पाय ठेवायचो काड्या करत खरडत असतांना 'जीबोल'त असतांना सहज जालावरचा टिआरपी ही संभाळायचो एकमेकांना हलकेच व्यनितुन सांगायचो संपादकांनी कंटाळून कधीतरी त्याचा आयडि बंद केला मी मात्र अजून आहे त्याच स्थळावर नसबंदी केल्यासारखा वाचनमात्र... धागा टु धागा.

बालकविता - मोठ्यांचे ऐका

लेखक शुचि यांनी शुक्रवार, 25/06/2010 00:21 या दिवशी प्रकाशित केले.
एक होती मासोळी, सुळसुळ पोहतसे जळी चमचम मऊ पोट करी,वर्ख मिरवे सोनेरी ||१|| आई तिची सांगे तिला,जपून नेहमी रहायाला जळात असे गळ टाकूनी,दुष्ट माणूस किनार्‍यावरी ||२|| मासोळी होती उचापती,भारी होती करामती तमा आईच्या बोलांची,नसे करीतसे कधीच ती ||३|| शिंपल्यातल्या मोत्यांशी, इतर सुंदर माशांशी लव्हाळांशी बेडकांशी, मस्ती करावी मनमुरादशी ||४|| सुळसुळत पळत सुटावे,आईचे कोणी ऐकावे आईने धपाटले तर्,मुळ्ळी फुगा करुन बसावे ||५|| मग एका काळ्या दिवशी, जाळ्यात सापडे मासोळी कोळी तिला पकडून न्याहाळी, त्यालाही मग दया येई ||६|| इतकी सुंदर जलराणीसम, मासोळी ही सोनेरी जर दिला नजराणा मी राजाला,मिळेल भरपूर द्रव्य मजला
काव्यरस

खूळ ( पैलवानकीचं )

लेखक अडगळ यांनी शुक्रवार, 25/06/2010 00:17 या दिवशी प्रकाशित केले.
पायात पाय घालून आम्ही पाडायचो. कधी एकेरी पट काढायचो , कधी लांगेत बोटे घालायचो. लंगोट घालताना, माती मळताना, थंडाई गिळताना असंच आयुष्यभर लोळायचं , एकमेकांना हलकेच बजावून सांगायचो. गादी वरच्या नुरा खेळून कधी त्याच्या दारात बी गाडी आली, मी मात्र मारत आहे त्याच पेठांत चकरा , ही तालीम ते ती तालीम

भूल

लेखक श्रावण मोडक यांनी गुरुवार, 24/06/2010 23:59 या दिवशी प्रकाशित केले.
सारेच सुटलेत, हे पाहिल्यावर दिवसभराचा कंटाळा काढून टाकताना हे काही तरी होत गेलं... नंतर कळलं, कविता झाली. नात्यातील प्रश्नांचे कंगोरे एकेक करून उकलून घेताना, काही सिद्धांत ती मांडायची, अन् नेमकी विरुद्ध मूल्ये माझी समीकरणाची मांडणी करून, प्रमेयांची भूल विरून जाताना, सारीच गणिते सोडवायची, असे एकमेकांना हलकेच बजावून सांगायचो उभयान्वयी अर्थांचे सूत्र चालवत आपले गणित सोडवून ती गेली, मी मात्र झोके खात राहिलो शब्दांच्या जाती आणि संख्यांच्या किंमतीत
काव्यरस

(रूळ)

लेखक राजेश घासकडवी यांनी गुरुवार, 24/06/2010 23:25 या दिवशी प्रकाशित केले.
नाव खरं तर तितकंसं योग्य नाही कारण खालच्या रचनेत रूळ कुठेच येत नाहीत. पण प्रेरणा रूळ या कवितेवरून घेतली आहे ना (इतर वीसेक लोकांप्रमाणे!), म्हणून कंसात त्याच कवितेचं नाव दिलंय. काय म्हणता, मूळ रचनेचा दुवा कुठे आहे? बस्स काय, इतक्या विडंबनांत तुम्हाला सापडत नाही का? सालं सगळंच आयतं हवं आजकाल... डोक्याला डोकं लावून आम्ही बसायचो ती माझ्या उवा घ्यायची मी तिच्या उवांनी केस भरायचो डोकं खाजवत गप्पा मारत असताना कधी विचारही करायचो एकमेकांचं डोकं खाजवून द्यायचो लायसॉल लावून कधीतरी तिची केस सुधरून गेली मी मात्र बनलो आहे एकदम अभिजात विचारजंत...डोकं खाजवून खाजवून
काव्यरस

योगशास्त्र

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी गुरुवार, 24/06/2010 22:43 या दिवशी प्रकाशित केले.
सनातन वैदिक जीवन शैलीचाअमेरिकेत प्रभाव वाढत आहे त्याचे एक अंग योगशास्त्र व yogi Elena Brower यांच्या मार्ग दर्षना खाली न्यू यॉर्क मधल्या टाईम स्केअर चौकात लोकांनी सामुदायीक योगा केले त्याची चित्रे .................................................................. One of the noisiest, most crowded places in the planet became the center of tranquility and relaxation on Monday, June 21. Celebrating the start of summer, one of the world's largest yoga classes took place in the Crossroads of the World, Times Square, New York City. Billed as a celebration of the summer solstice, hundreds took part