... भारत भिका सावकार नावाच्या कुणीतरी परवा कधीतरी आत्महत्या केली.
दारूच्या नशेतच त्यानं स्वत:ला संपवलं, असं त्या बातमीत म्हटलं होतं. काय कारण असेल त्याच्या आत्महत्येमागचं?
कर्जबाजारीपणा?... बेकारी?... कौटुंबिक कलह?... की नुसती व्यसनाधीनता?...
... भारत भिका सावकार हा त्या दिवशी आत्महत्या करणारा एकटा नव्हता.
त्याच्या आधीच्या आठवड्यात, विदर्भात एका दिवशी, जवळपास दर तासाला एक आत्महत्या झाली होती...
तरीही, एकाच वर्तमानपत्राच्या डाव्या पानावर, एका न दिसणा-या कोपर्यात, भारत भिका सावकारच्या आत्महत्येची बातमी छापून आली होती...
भारत भिका सावकार हा कुणी प्रसिद्ध, नामवंत माणूस नसेल.