Skip to main content

ताप

लेखक मितभाषी यांनी रविवार, 01/08/2010 16:32 या दिवशी प्रकाशित केले.
तुम्हाला वाजते का थंडी. आणि कळपाची भीती. का भरलाय तुम्हाला ताप. तोंड दाबुन बुक्क्याचा मार. शब्दांना नसते दु:ख. फक्त ओझे वाहणारे आपण. सवत आनली म्हणे. ग्यानबाची बायको हरवली. आता जास्त विचारत नाही. कारण तुमच्याकडे उत्तर नाही. राम रावण युध्द होणार अनिरुध्द मिशा पिळणार मी झाडावर लपणार ।। निश्चित ।। ही कविता संपादकांना अडचणीत तर नाही ना आणनार?????????? . . . कविवर्य भावसार.

मैत्री चिरायु होवो..a.k.a Long Live Friendship

लेखक कानडाऊ योगेशु यांनी रविवार, 01/08/2010 16:03 या दिवशी प्रकाशित केले.
मैत्री चिरायु होवो..Long Live Friendship. येथील माझ्या सर्व मित्र मैत्रिंणींसाठी... --------------------------------------- नको सम्राटपट मजला नको इंद्रपद देवा.. मित्राचा हात सदा.. खांद्यावरती रहावा... नको स्वर्गीय अमृत मजला नको पंचपक्वान गोडधोड मित्रासोबत खाता लागे शिळी भाकर मजला गोड.. नको अफाट पैसा मजला.. नको गाडीबंगला काही... मैत्रीची लाभो श्रीमंती सदैव मजला.. बाकी मागणे काही नाही.. नको मानमरातब मजला.. मिरवणुकीची गर्दी नको ती.. डोळे मिटता न्यावे मजला.. मित्रांनी वाजतगाजत खांद्यावरती... Happy Friendhisp Day to All.! ---------योगेश जोशी.

सूर्य...

लेखक मदनबाण यांनी रविवार, 01/08/2010 15:50 या दिवशी प्रकाशित केले.
कॅमेरा :--- निकॉन पी-१०० (हौशी फोटुग्राफर) ;) मदनबाण.....

अशीही एक भटकंती

लेखक सुनिल पाटकर यांनी रविवार, 01/08/2010 14:30 या दिवशी प्रकाशित केले.
सोनलीकोंडला आम्ही सकाळी ८ वा पोहचलो. आंबिवली गणी आदिवासी वाडीवर चालत जायला तेथून रस्ता होता.गावातील एका घराच्या अंगणात आम्ही दुचाकी उभी केली.गावक-यांनी दाखवल्यानुसार आम्ही गणीचा रस्ता धरला.माझा मित्र सामाजिक कार्यकर्ता होता,त्यांनी आणि मी गणीवर जाण्याचा बेत आखला.सकाळी बिस्किटे व चहा एवढ्याच आहारावर मी घरच्या बाहेर पडलो.गणीला जाण्याचा मार्ग काट्याकुट्यातून ,डोंगरातून होता.पहिल्याच पाऊलवाटेवर सापाचे दर्शन झाले.वाटेवर मोरांची पीसे पडलेली दिसत होती.

अनुभवींनी मार्गदर्शन करावे.

लेखक शानबा५१२ यांनी रविवार, 01/08/2010 14:09 या दिवशी प्रकाशित केले.
आज आम्ही पण एक नंबर घेउन 'मैत्रीचा प्रस्ताव' मांडणार आहोत्,नकार येणार नाही............पण आलाच तर रात्री धुडगुस घालणार हे नक्की! पण खरच असा धुडगुस नाही घालायचा आम्हाला,उगाच मित्रांना आज त्रास नको.मी ज्या व्यक्तीला आज मैत्रीसाठी विचारणार आहे,त्या व्यक्तीला मी फक्त ३-४ दीवसच भेटलो आहे(४ महीन्यांपुर्वी).आम्ही त्या दीवसांत खुप बोललो पण त्यांनंतर मी 'हीच्याशी जवळीक वाढ्वली तर परीक्षेत १२ वाजतील' म्हणुन तिच्याशी कायमचा संपर्क मोडुन टाकला.(संपर्क ठेवायला नंबर नव्हताच ती गोष्ट वेगळी!) आज तिला मैत्रीसाठी विचारायच आहे.बोलण फोनवर होईल.'मी कोण' हे थोडक्यात सांगुन होईल. पण सुरवात कशी व काय करावी?? व नंतर बो
काव्यरस

एक दिवस मैत्रीचा..

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी रविवार, 01/08/2010 13:47 या दिवशी प्रकाशित केले.
ऑगस्टचा पहिला रविवार असो किंवा कॉलेजचा पहिला दिवस, पावसाळ्यात नव्या मैत्रीचे नवे दिवस सुरु होतात. कारण ते दिवस नवे असतात, ते वर्ष नवे असते अन् तो अभ्यासक्रमही नवाच असतो. कॉलेज कँपस नवनव्या मैतरांनी फुलून येते. तिथूनच मग मैत्रीचे नवे जग सुरू होते. नव्याने मनांची चाचपणी केली जाते. काही लगेचच जुळतात, काही वेळ घेतात तर काही मने नुसतीच छळतात, प्रसंगी जळतातसुद्धा! एकंदर आठवणीत राहते ती कॉलेजचीच मैत्री. त्या वयात जाण आलेली असते. भल्याबुऱ्‍यांची समज कळत जाते. अपने-पराये देखील ओळखता येत असतात. हीच मैत्री जीवनभर सोबतीला येते.

काही बाही...

लेखक अवलिया यांनी रविवार, 01/08/2010 13:18 या दिवशी प्रकाशित केले.
कधी कधी एखादं पुस्तक समोर असलं तरी अथपासुन इतिपर्यत वाचुन होत नाही. कारणं अनेक असतात. अशा वेळेस आमचे परममित्र बिकाशेट यांच्या सारखं कुठलंही पान काढुन वाचायचं ही पद्धत मी अवलंबतो. काल असंच झालं. एक पुस्तक काढलं आणि मधूनच वाचायला सुरवात केली. अर्ध मुर्ध पान झालं की जा पुढे नाही तर मागे. असं करता करता काही वाक्य समोर आली. बिकाशेटनी आवडलेलं काही.. असं कधीतरी लिहिलं होतं. म्हटलं आपण पण लिहावं. आता हे तुम्हाला आवडेल की नाही माहित नाही.

हे म्हणजे कै च्या कैच

लेखक Nile यांनी रविवार, 01/08/2010 12:30 या दिवशी प्रकाशित केले.
तुम्ही लोकांनी पार वैताग आणला आहे राव. हो तुम्हीच! अरे इथे मिसळपाववर छळता ते पुरे नाही का? सुखाने जगु द्या की एखाद्याला... असे दचकु नका, आज सकाळी उठल्या उठल्या माझ्या मनात आलेले प्रामाणिक विचार वर लिहले आहेत. खरं तर सकाळी उठण्याचे कारणच वरील विचार आहेत, अन तुम्ही दचकला तसेच मला दचकवुन उठवण्यास कारणीभुतही हेच विचार. तर झाले आहे काय, तुम्ही लोक (जसे कोणाही एका मिपा कराला इथे सतत छळता तसेच) मला ही छळत आहात, पण माझ्या स्वप्नात. हसु नका! प्रकरण गंभीर आहे. अहो झोपेचं पार खोबरं झालंय हो. आजचच उदाहरण घ्यायचं तर मला चक्क संपादक मंडळाचा व्यनी आला हो!