Skip to main content

(तंगड्यावर तंगडे)

लेखक सुनील यांनी शुक्रवार, 06/08/2010 21:36 या दिवशी प्रकाशित केले.
मडळी, श्रावणापूर्वीचा हा शेवटचा वीकांत, तंगड्यावर तंगड्या खाऊन साजरा करू. कसे? चित्र जालावरून साभार

शेवटी

लेखक डॉ.कैलास यांनी शुक्रवार, 06/08/2010 21:15 या दिवशी प्रकाशित केले.
शेवटी वाटते व्हावे न केव्हा,तेच झाले शेवटी सांत्वनाला माझिया,शत्रूच आले शेवटी हाव केली त्या क्षणी,काही मला ना लाभले निर्विकारी जाहलो,सारे मिळाले शेवटी लोक दगडासारखे,कोमल हृदय माझे इथे लाख मी सांभाळले पण्,वार झाले शेवटी भिस्त माझी खास होती,ज्या कुणा मित्रांवरी लोटुनी मज संकटी,तेही पळाले शेवटी देतसे व्याख्यान दारुबंदि वरती जे कुणी, पाहिले त्यांच्याच मी,हातात प्याले शेवटी भार मी वाहून ज्यांचा,दुखविले खांदे सदा तेच मम खांदेकरी होण्यास आले शेवटी जन्म गेला हा तुझा '' कैलास '' पुष्पांच्या सवे घेतले(स) हातात का बंदूक भाले शेवट

मिपा कि मिपाकर..

लेखक मृण्मयी दीक्षित यांनी शुक्रवार, 06/08/2010 20:39 या दिवशी प्रकाशित केले.
मिपा कि मिपाकर.. सरळ मुद्या म्हणजे नक्की मिपा काय आहे? नव्या-नवोदित व जुन्या-प्रस्थापित जनांनी एका वादकाप्रमाणे केलेली लेखनाची जुगलबंदी. किंवा प्रस्थापित वा नवोदितांनी केलेली- लिहिलेली एकेरी सरगम. मिपावरच्या लेखनापेक्षा त्यावरील खोचक - बोचक गमतीशीर वा विवादास्पद वा हास्यास्पद प्रतिक्रिया वाचण्यात लोकांना रस वाटतो. हि देखील चांगली बाब आहे. कधी कधी होते असे जो नवोदित, नवोदित म्हणण्यापेक्षा नवीन मिपाकर काही नवे साहित्य लिहिण्याचा प्रयत्न करतो त्यावर अशा टिप्पण्या होतात कि त्याला निराशा वाटते. व पुढील लेख लिहिण्यास थोडे असंबद्ध वाटते. असुरक्षितता वाटते.

प्रिटी वूमनचे धर्मांतर

लेखक सुनील यांनी शुक्रवार, 06/08/2010 19:58 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या लाडक्या प्रिटी वूमनने धर्मांतर केले असून तिला आता यापुढे हिंदू म्हणून ओळखले जावे, अशी अपेक्षा आहे. बातमीचा दुवा सदर प्रिटी वूमनचा राजकुमार यापूर्वीच बौद्धधर्मिय झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. कॅशियस क्लेचा महंमद अली होतो. पाकिस्तानी क्रिकेटपटू युसुफ योहाना मुस्लिमधर्म स्वीकारतो. आमचे लाडके गझलसम्राट सुरेश भटदेखिल आयुष्याच्या अखेरीस बुद्धाला शरण जातात. अश्या ह्या थोरा-मोठ्यांच्या धर्मांतरामागे नक्की काय प्रेरणा असाव्यात? खरोखरच वेगळी जाणीव की केवळ प्रसिद्धीचा शौक?

हा शब्दांच्या गुणसुत्रांचा दोष असावा

लेखक अनिरुद्ध अभ्यंकर यांनी शुक्रवार, 06/08/2010 19:26 या दिवशी प्रकाशित केले.
हा शब्दांच्या गुणसुत्रांचा दोष असावा स्वप्नलिपीचा अर्थ कसा कोणा समजावा कधीतरी झाडांची भाषा मला कळावी कधीतरी मज अबोल चाफाही उमजावा जन्म-मरण ह्या दोन मितीच्या प्रतलामध्ये जगण्याचा सारांश कसा सांगा बसवावा युगे बदलली काळ बदलला अरे विठ्ठला एक आयडी ट्विटरवर तूही उघडावा किती खोल मी अजून जावे मनात माझ्या कधीतरी तळ मला अता त्याचा लागावा उगाच चर्चा मी तेव्हा केली माझ्याशी चुकले माझे अखेर हा निष्कर्ष निघावा अता एकदा संपावी काव्याची वेणा मेंदूमधला शब्दांचा दंगा थांबावा

वडा...

लेखक जासुश यांनी शुक्रवार, 06/08/2010 18:21 या दिवशी प्रकाशित केले.
जवळ जवळ सर्वाना वडा बनवता येतो तरीही रेसिपी टाकत आहे. आज टाइप करण्याचा हुरूप आला आहे म्हणून समजा..जेवण बनवणे टाइप करण्यापेक्षा जास्त सोपे आहे असे मला वाटते. असो पा कृ आणि फोटो...देत आहे..चांगल्या प्रतिक्रिया कळवा.. :) उकडलेले बटाटे - ६एक कोथिंबीर-खूप कढीपत्ता-८एक पाने लसूण-६ पाकळ्या आले-१/२ इंच हिरवी मिरची ४- पेस्ट करून तेल-१ पळी जिरे-मोहरी हळद मिठ तिखट-१/४ चमचा बेसन कृती १.कढईत तेल घालून जिरे,मोहरी,हिरवी मिरची,कधिपत्ता,लसूण,आले एक एक शीजले की क्रमवार घाला.

मिपाकरांनो, आपली मदत हवी आहे

लेखक सर्वसाक्षी यांनी शुक्रवार, 06/08/2010 17:51 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकरांनो, आपली मदत हवी आहे. एका व्यावसायिक संस्थेने कॉक्स अ‍ॅण्ड किंग्ज च्या प्रायोजनाने मुंबईत नोकरी करणार्‍या व व्यवसायाने वा नोकरीत प्रकाशचित्रण क्षेत्रात नसलेल्या हौशी प्रकाशचित्रकारांसाठी एक स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेत अर्थातच गुणवत्तेवर आधारित अशा मान्यवर परिक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या चित्रांना परितोषिक दिले जाईल व एक पारितोषिक सर्वाधिक मते मिळविणार्‍या चित्रास दिले जाईल. काल मतदान सुरू झाले. एकुण मतदान पाहता असे लक्षात आले की केवळ नित्याच्या संपर्कातील परिचितांकडुन शे-पन्नास मते सहज मिळतील मात्र भरघोस मते हवी असतील तर हातपाय हलवावे लागतील.

सावजी मटण

लेखक रश्मि दाते यांनी शुक्रवार, 06/08/2010 17:13 या दिवशी प्रकाशित केले.
जागु ताई चे ग्रिन चिकन पाहुन श्रावण जवळ येत अस्ल्यचे आथवले.आमच्या नागपुरचे खास सावजी मट्ण मटण १ किलो सुके खोबरे १ १/२ वाटी किसुन तिळ्,जीरे,खसखस्,काळा मसाला, प्रत्येकी २ चमचे धणे १/४ वाटी लवग ४ वेलदोडे ४ मिरे ६-७ दालचिनी २ तमालपत्र २ हळ्द १ १/२ चम्चा लाल तीखट आवडीनुसार (१/३ वाटी) आल्-लशुण पेस्ट १/४ वाटी कादे ६+२ कोथिबीर १ जुडी कच्चि पपई पेस्ट २ चमचे मिट चवी प्रमाणे तेल २ वाटया आधि मटण धुवुन निथळ्त थेवावे व त्याला १/२ आले लशुणाचि पेस्ट लावुन १/२ तास राहु द्या खोबरे,तिळ्,खस्-खस्,जिरे,धणे,गरम मसाल्याचे सर्व पदार्थ कोरडे भाजुन घ्यावे आणी १/४ कोथिबिर घालुन वाटावे ६कान्दा बारीक चिरुन घ्यावा,

healthy सॅंडविच

लेखक जासुश यांनी शुक्रवार, 06/08/2010 16:16 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य लागेल तसे अंदाजे घ्या. तसे केल्यास सॅंडविच चांगले बनते. बटाटे - ५ एक टोमॅटो-१ कोथिंबीर-थोडीशी कांदा-१ हिरवी मिरची-४ तेल-१ पळी जिरे-मोहरी हळद मिठ बटर. ब्रेड कृती कढईत तेल घालून जिरे,मोहरी,हिरवी मिरची,कांदा,टोमॅटो एक एक शीजले की क्रमवार घाला. मग हळद घाला.मग उकडलेले, मश केलेले बटाटे घाला. मिठ घाला. ४ मिनिट वाफ काढा. कोथिंबीर घालून मिक्स करा. व भाजी गार होऊ द्या. होल वीट ब्रेड घ्या. त्याला बटर लावा. मग चटणी लावा. मग भाजी लावा.