Skip to main content

पॅलेस, कोर्टकेस, सुवर्णमोहोरा आणि मी

लेखक अरुंधती यांनी शनिवार, 07/08/2010 18:00 या दिवशी प्रकाशित केले.
"आल्या का गं मॅडम?'' कोर्टरूमच्या आतून माझ्या मैत्रिणीने खुणेनेच विचारलं. माझी मुंडी तिसर्‍यांदा नकारार्थी हालताना बघून तिने चेहरा वाकडा केला आणि कोर्टरूमच्या पुढील बाजूची तिची खड्या पारशाची पोझ घेत पुन्हा एकदा आमच्या दाव्याचा क्रमांक साधारण कधी, किती वाजता येईल याची तेथील लिपिकास विचारणा करू लागली. वेळ दुपारची. दिवस पावसाळ्याचे. कोर्टाच्या ब्रिटिशकालीन दगडी इमारतीत असलेल्या कोर्टरूम्समध्ये ओलसर दमट हवेबरोबर पावसाळी आभाळामुळे आज जरा जास्तच अंधार दाटला होता. मधूनच सतावणार्‍या, गुणगुणणार्‍या माशांना संथ लयीत गरगरणारे पंखे अजिबात उडवून लावू न शकल्याने त्या मला आजही नेहमीसारख्याच छळत होत्या.

पालक पनीर कोफ्ता करी

लेखक चिंतामणी यांनी शनिवार, 07/08/2010 17:42 या दिवशी प्रकाशित केले.
पालक पनीर कोफ्ता करी कोफ्त्यासाठी साहित्य : पालक दोन गड्ड्या, दोन हिरव्या मिरच्या, ७-८ पाकळ्या लसूण, तीन टेबलस्पून कॉर्नफ्लोअर, मीठ चवीनुसार, पनीर - १५० ग्रॅम, तळणासाठी तेल.

हा दारूच्या 'फुल'पात्रांचा दोष असावा

लेखक केशवसुमार यांनी शनिवार, 07/08/2010 17:39 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा पुन्हा एकदा हा शब्दांच्या गुणसुत्रांचा दोष असावा हा दारूच्या 'फुल'पात्रांचा दोष असावा पेगलिपीचा अर्थ कसा कोणा समजावा कधीतरी दारूची भाषा तिला कळावी कधीतरी मज पेग तिने ही मग मागावा ग्लास-क्वार्टर ह्या दोन्हीही मापामध्ये पीण्याचा सारांश कसा सांगा बसवावा किती पेग मी पिऊन झाले तरी न मजला कधीच हा तळ या पिंपाचा ना लागावा उगाच चर्चा पील्यावर केली माझ्याशी चुकले माझे अखेर हा निष्कर्ष निघावा उद्या सकाळी उतार्‍यास ही घ्यावी थोडी मेंदूमधला मुंग्यांचा दंगा थांबावा आज गटारी मुहुर्त उत्तम आहे "केश्या" एक आयडीया, घरीच

गण: वंदन करीतो गजाननास

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 07/08/2010 17:07 या दिवशी प्रकाशित केले.
गण: वंदन करीतो गजाननास यावे गणास गणपती आज नमन करीतो आम्ही तुम्हास रसीक जमले तुमचा भास होवूद्या गौळणवग खास वंदन करीतो गजाननास ||धृ|| कार्यारंभी वंदन करूनी गणास आळवी शुभशकूनी हाती घेतली डफतुणतूणी द्यावा आशिर्वाद आम्हास वंदन करीतो गजाननास ||१|| सरस्वतीचे लेणं लिहूनी गान मंदिरी गाणं गावूनी नम्र होवूनी तिजला वंदूनी विनवितो बुद्धी देवीस वंदन करीतो गजाननास ||२|| कला आमची रसीका दाखवाया भाग्यवंत पुण्यवंत आम्ही ठराया लवकर येवूनी आम्हास पावा गणात नित भजतो तुम्हास वंदन करीतो
काव्यरस

तरुणीशिक्षणनाटिका

लेखक शरद यांनी शनिवार, 07/08/2010 15:46 या दिवशी प्रकाशित केले.
(प्राचीन कवींच्या काव्यातील काही आल्हाददायक भाग द्यावा असे काही मिपाकरांनी सांगितल्यावरून एक नमुना ) प्राचीन कवींनी बहुतांशी धार्मिक लेखनच केले असले तरी तेवढेच केले असे म्हणावयाचे कारण नाही. पांडवप्रताप म्हटला तर धार्मिक ग्रंथ आहे, म्हटला तर मनोरंजक कथासंग्रह आहे. त्यातील जवळजवळ सार्‍या गोष्टी फ़ॅन्टसी या सदरातच मोडतील. आज एका मनोरंजक काव्याचा परिचय करून घेऊ. "बिल्हणचरित्र" या संस्कृत ग्रंथाचे "विठ्ठल" या वामन पंडिताच्या काळातील कवीने केलेले भाषांतर आज बघू. कथा अशी.

कराचीच्या 'डॉन'ने प्रसिद्ध केलेले माझे पत्र

लेखक सुधीर काळे यांनी शनिवार, 07/08/2010 14:55 या दिवशी प्रकाशित केले.
कराचीच्या 'डॉन'ने प्रसिद्ध केलेले माझे पत्र 'मिपा'करांनो, कराचीहून प्रकाशित होणार्‍या 'डॉन' या आंग्ल वृत्तपत्राला मी एक पत्र पाठविले होते. साधारणपणे टीकात्मक पत्रे छापली जात नाहींत, पण या पत्राला हिरवा झेंडा मिळाला. मूळ संपादकीयाचे आणि माझ्या पत्राचे दुवे दिले आहेत आणि मजकूर स्पष्ट असल्यामुळे कांहीं अवांतर किंवा अधिक लिहिण्याचे टाळले आहे.

पुणेकरांनो जागरुकता कशी आणु शकतो?

लेखक आप्पा यांनी शनिवार, 07/08/2010 14:18 या दिवशी प्रकाशित केले.
आजच सकाळी एका अंत्यसंस्काराला जाऊन आलो. वय अंदाजे २७ ते २८ एका २ वर्ष वयाच्या मुलाची माता. कारण स्वाईन फ्लु. या वर्षी गेल्या वर्षासारखी जागरुकता कोठेही दिसत नाही. असे का? काय करू शकतो आपण यासाठी. मनात खिन्नता आहे.

ग्रिल्ड कॉर्न सॅन्डविच

लेखक सविता यांनी शनिवार, 07/08/2010 13:22 या दिवशी प्रकाशित केले.
शनिवार..आरामात उशिरा उठावे, चहा कॉफी आटपली की काटाकिर्र ला धडकावे असे गेले ५-६ आठवडे सुरू होते. म्हटलं या वेळी जरा वेगळं काहीतरी करू. नव-याचा आवडता पदार्थ. कॉर्न सॅन्डविच. होतो पण १५-२० मिनिटात. तर साहित्य खालीलप्रमाणे: (३-४ माणसांकरता) ३-४ वाट्या कॉर्न/स्वीट कॉर्न २-३ कांदे २-३ टोमॅटो थोडी कोथिंबीर पावभाजी मसाला, गरम मसाला किंवा तुमच्याकडे उपलब्ध असलेला कुठलाही मसाला..

प्राक्तन

लेखक अवलिया यांनी शनिवार, 07/08/2010 12:44 या दिवशी प्रकाशित केले.
थोडं अंतर राहिलय आता...