पालक पनीर कोफ्ता करी
कोफ्त्यासाठी साहित्य : पालक दोन गड्ड्या, दोन हिरव्या मिरच्या, ७-८ पाकळ्या लसूण, तीन टेबलस्पून कॉर्नफ्लोअर, मीठ चवीनुसार, पनीर - १५० ग्रॅम, तळणासाठी तेल.
ग्रेव्हिसाठी साहित्य : आलं १ इंच, लसूण ५-६ पाकळ्या, दोन हिरव्या मिरच्या, २ कप टोमॅटो प्युरी, ३ टेबल स्पून तेल, चार हिरवे वेलदोडे, सहा लवंगा, एक तमालपत्र, १ टेबल स्पून लाल तिखट, १ टी स्पून गरम मसाला, मीठ चवीनुसार, १ टी स्पून कसुरी मेथी, फ्रेश क्रीम १/२ कप
कृती :-- एका पातेल्यात टोमॅटो बुडतील एवढे पाणी घेऊन उकळावे. त्या उकळत्या पाण्यात टोमॅटो घालून १० ते १५ मिनिटे उकळावे. ग़ॅस बंद करून १० मिनिटे तसेच ठेवावे. नंतर टोमॅटोची साले काढून मिक्सरमध्ये फिरवून त्याची प्युरी करून घ्यावी.
 |
| From Drop Box |
">
आलं, लसूण पेस्ट करून घ्यावी. हिरवी मिरची बारीक चिरून घ्यावी.
पालकाची पाने काढून स्वछ धुवून घ्यावीत. दुस-या पातेल्यात पाणी उकळून त्यात पालकाची पाने घालावीत. २ ते ३ मिनिटे तशीच ठेवून नंतर एका चाळणीत काढून घ्यावीत. त्यावर लग़ेचच गार पाणी घालावे म्हणजे पानांचा रंग तसाच राहतो. पाणी निथळल्यावर पालक बारीक चिरून घ्यावा. लसूण बारीक चिरून घ्यावा. नंतर एका बाउलमधे चिरलेला पालक घेउन त्यात चिरलेली मिरची, चिरलेला लसूण आणि कॉर्नफ्लोअर घालून मळून घ्यावे. त्याचे एकसारखे भाग करून घ्यावे.
पनीर किसून त्यात चवीपुरते मीठ घालून मळून घ्यावे. त्याचे छोटे गोळे करून घ्यावे.
पालकाची पारी करुन त्यात पनिरचा गोळा घालून बंद करावे.
अशाप्रकारे तयार झालेले कोफ्ते तळून एका प्लेटमधे ठेवावेत.
नंतर एका कढईत तेल गरम करुन त्यात तमालपत्र, वेलदोडे आणि लवंगा घालाव्यात. नंतर आलं, लसूण पेस्ट घालून परतून घ्यावे. चिरलेली हिरवी मिरची घालून परतावे.
नंतर त्यात टोमॅटोची प्युरी घालावी. लाल तिखट घालावे. गरम मसाला, मीठ आणि एक कप पाणी घालून ढवळून १० मिनिटे उकळावे.
गॅस बंद करुन कसुरी मेथी घालून १० मिनिटे तसेच ठेवावे. नंतर त्यात क्रीम घालावे. ग्रेव्ही तयार झाली.
वाढायच्या वेळी बाउलमधे आधी ग्रेव्ही घालावी. कोफ्ते दोन भाग करून घालावे. कोफ्ते घातल्यानंतर पुन्हा गरम करू नये.
(पाककृती- सौ.ज्योती पळसुले. फोटो- चिंतामणी पळसुले.)
वा वा, लज्जतदार ,चविष्ट
चिंतामणीराव... अहो पनिर पाकृ
वाह एकदम हिरवीगार पाकॄ. ज ह ब
फोटो
लाजवाब डिश दिसतेय.. नक्की
In reply to लाजवाब डिश दिसतेय.. नक्की by मितान
लाजवाब डिश दिसतेय.. नक्की
वा वा श्रावण सोमवारचा उपवास सोडताना
छान
पाकृ आणि फोटो दोन्ही जबरा!!!!
In reply to पाकृ आणि फोटो दोन्ही जबरा!!!! by गणपा
हेच
In reply to हेच by स्वाती दिनेश
+२
In reply to पाकृ आणि फोटो दोन्ही जबरा!!!! by गणपा
सहमत आहे
वा!!
In reply to वा!! by बहुगुणी
टोमॅटो प्युरीचा रंग
मस्त!!
मस्त, छान,
अव्वल!!!!!!!! पण पालकातले
उत्तम
काय बोलु?
सह्ही!
पाकृ साठी खूप मेहनत घेतलेली
मस्त...
पालक पनीर चा वेगळा प्रकार
ओ काका लय भारी पाककृती
प्रकाटाआ