Skip to main content

फ़ुलझडी..........!!!!

लेखक गंगाधर मुटे यांनी मंगळवार, 24/08/2010 12:09 या दिवशी प्रकाशित केले.
फ़ुलझडी..........!!!! तो.... चार शिष्य,चार चेले, चार चमचे मागेपुढे चालायला, उदोउदो करायला कायम आपल्या दावणीला बांधून स्वत:च स्वत:विषयी लिहिलेले पोवाडे गाऊन घेतो त्यांचेकडून आणि एवढ्या शिदोरीच्या बळावर वाढवू पाहतो.... आपल्या श्रेष्ठत्वाच्या कक्षा......!! ते.... ते भक्तही तल्लीन होतात लोळवून घेत स्वत:ला त्याच्या चरणावर वारंवार त्याच्या पायाच्या धुळीचा मस्तकाच्या मध्यभागी टिळा लावत... होतात बेभान जणुकाही त्या चरणाखेरीज अन्य सर्वकाही निस्तेज,निष्प्रभ अशी स्वत:चीच मनसमजावणी करत... सदासर्वकाळ....!! क्षणिक का होईना पण चित्तवेधक ठरत असतेच फ़ुलझडी..........!!!! . .

ई स्टाप मराठी साहित्य

लेखक आप्पा यांनी मंगळवार, 24/08/2010 11:54 या दिवशी प्रकाशित केले.
इ_स्टाप एक ई साहित्य प्रकाशन हे अंक मराठी साहित्याला वाहीलेले असुन त्यांचा प्रयत्न नविन लेखकांचे साहित्य जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न आहे. सदर अंक रेणुका रेपाळ-खटावकर, सुप्रीया जोशी-जाधव व सुनिल सामंत (esahity@gmail.com) चालवतात. सदर प्रयत्नात एक खारीचा वाटा म्हणुन हे साहीत्य www.vishwasanchar.com येथे हि प्रसीध्द केले जाईल. सदर प्रयत्नांना आपले ही सहकार्य असावे.

कोथिंबीरीच्या वड्या

लेखक श्रद्धा. यांनी मंगळवार, 24/08/2010 11:20 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य :- चिरलेली कोथिंबीर एक मोठी वाटी, हरबर्‍याच्या डाळीचे पीठ १ मोठी वाटी, धने जिरे पुड १/१ मोठा चमचा,चवीप्रमाणे मीठ, फ़ोडणीचे साहित्य, आले मिरची पेस्ट १ चमचा, तेल.
From

सफर - किल्ले तोरणा

लेखक येडाखुळा यांनी मंगळवार, 24/08/2010 11:17 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्रहो, गेल्या शनिवारी मी किल्ले तोरणा येथे जाऊन आलो. एकदम मस्त ट्रेक झाला माझ्या जुन्या मित्राबरोबर.. तोरण्याची माहिती सर्वांना असेलच तरीही जुजबी ओळख करून देतो. शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी हा गड घेतला. कानद खोर्यातला हा सर्वात उंच किल्ला. ( आणि कदाचित पुणे जिल्ह्यातला सुद्धा..चू.भू.देणे घेणे ) पूर्वी हा किल्ला आदिलशाही अंमलाखाली होता आणि अगदीच दुर्लक्षित अवस्थेत होता. म्हणजे राजांच्या ताब्यात आल्यावरच याचं भाग्य उजळलं असं समजायला काही हरकत नाही. अतिशय उंच आणि बेलाग किल्ला आहे हा.

रक्षा हेच बंधन

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी मंगळवार, 24/08/2010 09:08 या दिवशी प्रकाशित केले.
एखाद्या व्यक्तिचं रक्षण करायचं म्हटलं की रक्षणकर्त्याला चांगलं चुंगलं अन्न भक्षण करुन बॉडी कमवावी लागते. परंतु आजच्या सुप्परफास्ट युगात बहुतेक तरुण बंधूराजांचं फास्टीँगच होत असतं. तरीही येनकन प्रकारे जगातील सगळेच बांधव जर बॉडी बिल्डर झाले तर सर्वांचा भगिनीवर्ग सुरक्षित राहील अन् आरक्षितही! एखाद्या बहिणीकडून औक्षण करवून घेतले की तिचे रक्षण करणे भावाचे कर्तव्यच असते. आजकाल बहुतेक कुटुंबे ही त्रिकोणी राहण्यातच समाधान मानतात. अशा कुटुंबातील एकल भावांना बहिणीँचा हट्ट, मस्करी, रुसवे फुगवे काय डीव्हीडी लावून दाखवायचे? येत्या काही दशकात हेही करावे लागेल की काय कोण जाणे?

मिपा टॉप २५

लेखक मिसळभोक्ता यांनी मंगळवार, 24/08/2010 03:48 या दिवशी प्रकाशित केले.
मिपा टॉप २५ मधील सर्वांनाच वाढदिवसाच्या शुभेच्छा. मुख्य म्हणजे सर्वोच्च पंचवीसांत दोन-दोनदा सहभाग असणारे अदिती, आणि सुधीर काळे ह्यांना ह्यापी बर्डे देखील !!! प्रथम क्रमांकावर असलेल्या चोता दोन ह्यांना गोल्ड मेडल जाहीर करण्यात येते आहे. त्यांनी त्यांच्या ब्यांकेचा अकाउंट नंबर आणि पिन पाठवावा.