Skip to main content

मिपा टॉप २५

लेखक मिसळभोक्ता यांनी मंगळवार, 24/08/2010 03:48 या दिवशी प्रकाशित केले.
मिपा टॉप २५ मधील सर्वांनाच वाढदिवसाच्या शुभेच्छा. मुख्य म्हणजे सर्वोच्च पंचवीसांत दोन-दोनदा सहभाग असणारे अदिती, आणि सुधीर काळे ह्यांना ह्यापी बर्डे देखील !!! प्रथम क्रमांकावर असलेल्या चोता दोन ह्यांना गोल्ड मेडल जाहीर करण्यात येते आहे. त्यांनी त्यांच्या ब्यांकेचा अकाउंट नंबर आणि पिन पाठवावा. म्हणजे ते जमा करता येईल. मिपाकरांची ओळखपरेड ( नव्या-जुन्या सदस्यांची ओळख ) ... छोटा डॉन 242 पुणेरी पुणेकरः काही निरिक्षणे डॉ.प्रसाद दाढे 234 हा पहिला अनुयायी कसा मिळवायचा/मिळतो/ते? ३_१४ विक्षिप्त अदिती 231 लुटा 'लुत्फ' उर्दू गज़ल-अशयारांचा! सुधीर काळे 213 इंचा-इंचाने आपण जम्मू-काश्मीरमध्ये माघार घेत आहोत? सुधीर काळे 180 मराठी अंताक्षरी आजानुकर्ण 179 Drinks ...मुली आणि मद्यपान! जाई अस्सल कोल्हापुरी 165 IT WIFE आणि स्वयंपाक अद्ययावत सुजय कुलकर्णी 158 मिपाच्या (१०००) सभासदांचे सध्याचे वास्तव्य कुठे? अमोल केळकर 156 आजची स्त्रीची प्रतिमा - १ ३_१४ विक्षिप्त अदिती 147 जेम्स लेनच्या निमित्ताने उघडी पडणारी मराठी वैचारिक दिवाळखोरी चिंतातुरजंतू 142 घरगुती सावरकर भोचक 138 मराठी, पुणेरी, पुस्तकवाला: एक डेडली काँबिनेशन! राजेश घासकडवी 138 नवनिर्माण सूचना. सरपंच 136 अतिलघुकथास्पर्धा Anonymous 134 आणि माझा मारूती झाला-२ विनायक प्रभू 131 मराठी अमेरिकन्स .. महेंद्र 127 पी.जे. (अतिशय फालतू जोक) प्राजु 125 महाराष्ट्रातील समाजवादी आणि कम्युनिस्ट राजकारणाची थोर परंपरा मेथांबा 123 वारंवार विचारले जाणारे प्रश्न. अद्ययावत सरपंच 121 लेखकाला स्वतःचा लेख स्वसंपादन करायचा अधिकार अद्ययावत जयंत कुलकर्णी 120 निषेध निषेध तीव्र निषेध... प्रशु 119 नथुराम गोडसे आणि हिटलर निमीत्त मात्र 111 हारापरी हौतात्म्य हे ज्यांच्या गळा साजे सर्वसाक्षी 111 माझे आवडते प्रेरणावाक्य त्रास 110

वाचने 11444
प्रतिक्रिया 71

प्रतिक्रिया

ह्या निमित्ताने, प्रतिसादांच्या संख्येने उतरती भाजणी केल्यास, तुम्ही कितव्या पानावर येता, ते कळवावे. आम्ही चौथ्या पानावर आहोत. (८२ प्रतिसाद)

सर्व टॉपर्सचे अभिनंदन ! - तळागाळातला.

In reply to by मुक्तसुनीत

अहो माझा नंबर तर पाताळात आहे :) लोकप्रियतेच्या शर्यतीत माझे नेहमीच असे असते. :(

गेल्या आठेक महिन्यात पॉप्युलेशन दीडपट झालेली आहे (बिल्लाक्रमांकाप्रमाणे). त्यामुळे आठ महिन्यांपूर्वीचे शंभर प्रतिसाद हे आजच्या दीडशेच्या बरोबर. (किमान. खरं तर वादविवादांची परम्युटेशनं अजूनच वाढतात, पण तेवढा छिद्रान्वेषीपणा करायला नको) तर तसं नॉर्मलायझेशन करून ही यादी पुनर्प्रकाशित करता येईल का? दुसरं म्हणजे अदितीचा धागा बंद करण्यात संपादक मंडळाचा तो टॉपला जाऊ नये अशी इच्छा असावी अशी दाट शक्यता आहे. ही तक्रार मी मंडळाच्या खवतही नोंद केलेली आहे. त्याचबरोबर हघे असंही म्हटलं आहे. आयला, आम्हाला आमच्या जिवाची काळजी आहेच. नाहीतर मारुती कांबळे व्हायचा आमचा.

In reply to by राजेश घासकडवी

(किमान. खरं तर वादविवादांची परम्युटेशनं अजूनच वाढतात, पण तेवढा छिद्रान्वेषीपणा करायला नको) तर तसं नॉर्मलायझेशन करून ही यादी पुनर्प्रकाशित करता येईल का?) उत्तम सूचना. याला आमचे उत्तर, म्हणजे: "तुम्हीच करा." धन्यवाद.

In reply to by मिसळभोक्ता

उत्तम सूचना. याला आमचे उत्तर, म्हणजे: "तुम्हीच करा."
जल्ला आम्हाला तुम्ही केलाय त्यवढा पण येत नवता. आणि आम्ही नवखे. आम्हाला नक्की कुठच्या काळी किती (खरे) सभासद होते, केव्हा काही आयडीमात्र होते वगैरे भानगडी नीट माहीत नाहीत. तेव्हा कोणीतरी थोरामोठ्यांनी, जाणकारांनी ते करावं.

In reply to by राजेश घासकडवी

दुसरं म्हणजे अदितीचा धागा बंद करण्यात संपादक मंडळाचा तो टॉपला जाऊ नये अशी इच्छा असावी अशी दाट शक्यता आहे. सहमत आहे. मी आळश्यांचा राजा ह्यांना लिहिलेला भलामोठा प्रतिसाद सुर्पुर्त केल्यावर ती लाल पाटी समोर आली. :( एक शंका: २३० + प्रतिसाद आले की चर्चा बंद करण्याचे काय कारण? सर्वरवर ताण तितकाच पडणार ना? (म्हणजे पुढचे प्रतिसाद नविन चर्चेत टाकले काय तिथेच टाकले काय ह्याने काय फरक पडतो?)

मिभोची फॅक्टरी सुरु झालेली दिसते. टॉपर्ससोबत मिभोंचेही अभिनंदन!

प्रतिसादांच्या संख्येवरुन 'टॉप २५' वगैरे ठरवणे - त्यातही 'टॉप २५' हे तद्दन फिल्मी नाव वापरणे हे मिभोंच्या लेखनपरंपरेशी विसंगत आहे. मिभो, लहानपणी आम्ही अशा सूरपारंब्या खेळत असू. लहानपणी तू अशा सूरपारंब्या खेळत असस. 'बघीतलंस, मनात आणलं तर तात्याला ५०-६० प्रतिसाद काही अवघड नाहीत' या अजरामर वाक्याची आठवण आली आणि डोळे भरुन आले.

In reply to by सन्जोप राव

तुम्ही पाचव्या पानावर (अगा लेखकांनो सन्जोप राव 78) टुक टुक !

आणखी छिद्रान्वेष : कित्येक बहुशतकी चर्चा अप्रकाशित झालेल्या आहेत. त्या सर्व दिसल्या असत्या तरी बहुधा मी चवथ्या पानावरच असतो. अदृश्य शतकवीरांचेही अभिनंदन. (चवथ्या पानावर असल्यामुळे) ब्यांकखात्याऐवजी पिनसह हातगोळा पाठवावा असा विचार करतो आहे. पिन तपासून सोबतच्या पाकिटातून परत पाठवावी.

In reply to by प्रभो

प्रयोगासाठी लागणारी माकडे ही द्राक्षासवाच्या अंमलाखाली असत्यात. त्यो बी येक वायलाच प्रयोग म्हनायचा!

१) सांख्यिकी विदा विश्लेषण हे मिभोंच्या लेखनपरंपरेशी सुसंगत आहे असे वाटते. मिपाकरांना त्यांच्या लोकप्रिय चर्चेच्या गुर्‍हाळापाशी नेउन पुन्हा एकदा आरसा दाखवल्याप्रमाणे हे असावे असे समजतो. १.१) यात लेखांची वाचनसंख्या कळली तर अजुन लोक कुठल्या चर्चा रस घेउन वाचतात ते कळेल. १.२) यात अवांतर प्रतिसाद किती? १.३) मुख्य म्हणजे एकाच धाग्यात जास्तीत जास्त प्रतिसाद कोणत्या सदस्याचे? व वरील सर्व २५ चर्चात मिळुन जास्त प्रतिसाद कोणाचे? २) धनंजय म्हणाल्यासारखे हुतात्मा शतकवीर चर्चांना आदरांजली :-)

In reply to by सहज

१.२) यात अवांतर प्रतिसाद किती? १.३) मुख्य म्हणजे एकाच धाग्यात जास्तीत जास्त प्रतिसाद कोणत्या सदस्याचे? व वरील सर्व २५ चर्चात मिळुन जास्त प्रतिसाद कोणाचे? मिभोंनी चांगला विषय ठेवला आहे. हा पहीलाच प्रयत्न असावा. परन्तु वरील मुद्दा विचार करण्यासारखा आहे. वर उल्लेखिलेल्या अनेक विषयांमधे दोन्ही प्रकार दिसतात. पुढील टॉपर्स जाहीर करतान जरूर विचार करावा या मुद्यांचा.

ह्या चर्चांचे दुवेही त्यात एंबेड केले तर वाचायला सोपे जाईल.

In reply to by आमोद शिंदे

आजुक येक सुचवनी धपा धप येनारे प्रतिसाद खरे लेखांन्ला असत्यात कि प्रतिसादांना हे ठरवायला सोपी आयडिया काय हाय कि नाय?

.

धर्म, नथुराम, पाकिस्तान, पुणे, अनिवासी, आयटी, स्त्रीस्वातंत्र्य, पुरोगामी वृती आणि अभाव, स्वातंत्र्य/स्वैराचार, ओळखी/तक्रार/प्रश्न आणि गाणी हे नेहमीचे यशस्वी विषय/कीवर्ड्स आले आहेत अपेक्षित २५ मध्ये :). अजून पाच वर्षांनी काय शीर्षकं येतात ते पहायचं. विषय बहुतेक बदलायचे नाहीत.

In reply to by नंदन

धर्म, नथुराम, पाकिस्तान, पुणे, अनिवासी, आयटी, स्त्रीस्वातंत्र्य, पुरोगामी वृती आणि अभाव, स्वातंत्र्य/स्वैराचार, ओळखी/तक्रार/प्रश्न आणि गाणी हे नेहमीचे यशस्वी विषय/कीवर्ड्स आले आहेत >>> एक नंबर नंदनराव !! टॉपर्सचे अभिनणंद !! (बोलनेमे क्या जाता है)

मिपावर मिपाविषयी असणारे लेख म्हणजे हिटच जातात. आपला लेख ह्याला अपवाद नसावा. आणखी काही आकडे शोधालया जमले, तर बघा. (चला महिनाभराच्या विरझणाची सोय झाली)

पण चक्क तिसर्‍या पानावर 'पाहुणा संपादक' म्हणून आमचे संपादकीय आहे ९० प्रतिसाद! आता स्वतःचीच पाठ थोपटायला हवी! ;) चतुरंग थोपटे

In reply to by चतुरंग

चतुरंगराव, आपले विधान मी पटकन वाचताना चुकून "पेज ३ वर पाहुणा संपादक" असा अर्थ घेतला ;) नंतर अर्थातच गैरसमज दूर झाला. ;) (काळजी नसावी :) )

In reply to by विकास

अहो 'पेज ३ संपादक' असेच आले आधी माझ्याही मनात पण म्हटले स्वतःच कशाला स्वतःची स्तुती करा! ;) शेवटी आम्ही जात्याच विडंबक पडलो ना त्यामुळे ते बरोबरच आहे! ;) (पेज३संपादक)तीनरंग

In reply to by चतुरंग

अहो...आमच्या कोणत्यातरी धाग्याला १०० मिळाले कि..आम्ही पण स्वताचीच पाठ थोपटतो.. मिभोंना एक रिक्वेष्ट : मिपावर जास्तीत जास्त लिखाण करणारे आय डी यांची पण एक लिष्ट बनवा... म्हणजे कमीतकमी वेळात जास्तीत जास्त लिखाण कोणाचे?

In reply to by शिल्पा ब

>>मिपावर जास्तीत जास्त लिखाण करणारे आय डी यांची पण एक लिष्ट बनवा... म्हणजे कमीतकमी वेळात जास्तीत जास्त लिखाण कोणाचे हॅ हॅ हॅ. त्यात रिसर्च काय करायचा? सामंत काका (आणि लवकरच काळेकाका) सगळ्यांना हॉलो मारतील. अवांतर: बिकांनी एकदा कॉम्पिटिशनचा प्रयत्न म्हणून खोबार भाग १ ते २८८ लिहायला घेतले होते पण ते ६-७ भागातच आउट झाले.

In reply to by नितिन थत्ते

नितिन, खरं सांगायचं म्हणजे माझे जे लेखन मला आवडते त्या लेखनाला त्या मानाने कमीच प्रतिसाद आले. काश्मीरच्या प्रश्नावरचा माझा लेख एक लेखन या नात्याने कांहीं खूप चांगला नव्हता. 'टाइम्स'मधील बातमी आणि पंतप्रधान/राष्ट्रपतींना मी लिहिलेले पत्र यापेक्षा त्यात माझे असे कांहींच कौशल्य नव्हते. केवळ वादविवादातून त्याला इतके प्रतिसाद मिळाले. असो. आज आणखी एक टाइम्स'मधील बातमी व माझे कालच्या जकार्ता पोस्ट'मधे प्रकाशित झालेले पत्र जरूर वाच. हे पत्र लिहिल्याचा मात्र मला अभिमान आहे कारण कांहींसा अभ्यासही त्यामागे आहे व परदेशी राहून किरकोळ देशसेवाही होते. तरी जरूर वाच. काका

लवकरच एखाद्या प्रक्षोभक विषयावर काथ्या कुटावा म्हणते आहे. पान क्र. ३१ वरून किती वरच्या क्रमांकावर उडी मारता येते ते तरी कळेल.

In reply to by यशोधरा

ही ही ! जर पाचकळपणा दुसरं काही नाही.;) पण आता खरच अदितीच्या मदतीनं एखादा धागा काढावा असं वाट्टय. आमच्या चटण्या कोशिंबीरींच्या धाग्याला येउन येउन असे किती प्रतिसाद येणार?;)

In reply to by रेवती

तसं नाही रेवती ताई! चटण्या कोशिंबीरीचे धागे काढच; माझ्यासारख्या विसरभोळ्या आळसटांसाठी चांगले संदर्भ तयार होतील. पण त्यात अमक्याची चटणी करता येईल, तमक्याचं भरीत करता येईल असल्या टिमक्या वाजव. आपल्याला सुपरवुमनायटीस* झाला आहे याची प्रचंड जाहीरात कर. शिवाय या सुपरवुमनायटीसचे फायदे तोटे यावर एक मोठ्ठं लेक्चर दे ... की झालाच समज धागा हिट!! *सदर शब्द मंगला गोडबोले यांच्या 'पर्स हरवलेली बाई'मधून साभार उचलला आहे. अवांतरः मिभोकाकांनी टॉप-२५ मधे माझाही धागा टाकल्यामुळे मलाही त्यांच्यासाठी थोडेफार प्रतिसाद देणं आलंच!

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

असं बनायचं असतं होय सुपरवूमन! मला ठाऊकच नव्हतं ब्वॉ! स्वतःची जाहिरातही करावी लागते? त्यासाठी मिपावरच्या विवक्षित कंपूला सुपारी देईन म्हणते! :D

In reply to by रेवती

मी दिलेली रेसिपी वापरून तर पहा! ३१ चा १३ तर ऑपॉप* होईल, पुढे १३ चं तीन करायला मी आहेच. तीनचं एक मात्र नशीबाचा भाग आहे! ;-)

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

तीनचं एक मात्र नशीबाचा भाग आहे! ;)
नशीब! ;) त्या शब्दांत मी "प्रयत्ने वाळूचा कण रगडता तेलही निघे," हे वाचू शकलो. हुश्श! ;)

In reply to by श्रावण मोडक

यावर एक स्वतंत्र लेख लिहीण्याचा विचार होता, पण मी आधीच 'धाग्याचा खफ कसा करावा' हा लेख लिहीला असल्यामुळे वेगळं आणखी लिहीण्याची गरज नसावी. ;-) मेहेंदळे साहेबः श्श, कुठे बोलायचं नाही!

In reply to by रेवती

सुपारी दे! थांब गं देते! देवघराजवळच्या पेटीत चार सुपार्‍या, हळकुंडं ठेवलीत जपून.
हे फारच 'थांब अदिती, कुंकू लावते' टाईप वाटतंय...

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

हा ३५% महिला आऱशणाचा परीणाम समजावा का ? (महिला पण सुपारी घ्यायला लागल्यात म्हणून वाटले !)

या सर्व धाग्यांची लिंक दिली असती तर यातील न वाचलेले धागे वाचता आले असते. सर्व लेखकांचे अभिनंदन.

एकुणच या चर्चेचा रोख पहाता सध्या मि.पा. वर धागे फक्त प्रतिसाद मिळवण्या साठीच काढले जातात असे वाटते. मी मि.पा. चा जुना वाचक आहे. मला खेदाने असे नमुद करावेसे वाटते की लेखनाचा दर्जा सध्या हरवत चालला आहे. सदस्यांच्या वाढत्या संख्येच्या प्रमाणात लिखाणाच्या दर्जाची घसरण होत आहे. काहीतरी सवंग, चटपटीत, प्रक्षोभक किंवा कोणावर तरी टीका करणारे लिहीले आणि त्याला अमाप प्रतिसाद मिळाले तर त्यात कौतुक करण्या सारखे ते काय? (वरील यादी मधील काही उदाहरणे वानगी साठी घेता येतील) पण कधी कधी वाटते की आपल्या अजुबाजुला जे चालले आहे त्याचेच प्रतिबिंब मि.पा.वर उठते आहे. जसे सिनेमा चालावा म्हणुन हिंदी चित्रपट निर्माते करत असलेल्या युक्त्या. किंवा टी.व्ही चॅनेल ची टी.आर. पी. टीकवण्या साठी चाललेली धडपड. मि.पा. ची अशी काहीतरी अवस्था होउ नये असे वाटते. मि.पा. वर जशा नविन आ.डीं ची भर पडते आहे तशी काही जुनी मंडळी गायब झाली आहेत ज्यांचे लेखन खरोखर वाचनिय असायचे. असे का झाले / होत आहे याचा शोधघेणे जरुरीचे आहे. पैजारबुबा,

आता मिभोकाकांचा धागा आहे 'चान चान' म्हणणे ओघाने आलेच, तशी पद्धतच आहे म्हणे मिपावर :)
प्रथम क्रमांकावर असलेल्या छोटा डॉन ह्यांना गोल्ड मेडल जाहीर करण्यात येते आहे. त्यांनी त्यांच्या ब्यांकेचा अकाउंट नंबर आणि पिन पाठवावा. म्हणजे ते जमा करता येईल
घ्या, आम्ही समजत होतो की इथे लॉगिन केले की आमचे सर्व डिटेल्स ( खरे नाव, गाव, पासपोर्ट नंबर, पॅन कार्ड नंबर, लायसन्स डिटेल्स, बॅक अकाउंट डिटेल्स वगैरे ) ऑपॉप ( कॉपीराईट : धमु ) तुमच्याकडे जमा होतात म्हणुन ;) नाय, तसे आधी आम्ही कुठेतरी वाचले होते म्हणुन म्हटले. - ( ट्रॅकर ) छोटा डॉन

टॉपर्सचे अभिणंधण... मिभो.....विरजण घालण्याचे आपले व्यस्त वेळापत्रक सांभाळून हे मौल्यवान काम केल्याबद्दल आभार, बाकी आमचा नंबर कितवा हे विचारुन तुमच्या कामात अडथळा आणत नाही.

लेखावर किती प्रतिसाद मिळाले त्यावर लेख उत्तम अथवा फालतू हे ठरविण्याचा एक लोकप्रीय प्रकार म्हणजे प्रतिसांदांची संख्या. हे लॉजीक फारच तोकडे वाटते. हे म्हणजे एखादी भिन्न लिंगी ( हे बरे ना उगाच सुपरवुमनायटीस वाल्यांचा ओरडा नको) व्यक्तीने किती कमी/तोकडे कपडे परीधान केले यावरून त्याव्यक्तीचे सौंदर्य मोजण्यासारखे आहे. धाग्यातले लिखाण उत्तम यासाठी किती प्रतिसाद मिळाले ही मोजपट्टी वापरणे म्हणजे एखाद्या जागेची खोली/उंची सांगण्यासाठी व्होल्टमीटर वापरण्यासारखे आहे. सोन्याची शुद्धता मोजण्यासाठी सेंटीमिटर एककाचा वापर सर्वार्थाने अयोग्य ठरतो. चांगले काय हे ठरवण्यासाठी योग्य मोजपट्ट्या वापरा अन्यथा "काय जेवलात? " सारखे एकोळी धागे सर्वश्रेष्ठ ठरतील

In reply to by विजुभाऊ

लेखावर किती प्रतिसाद मिळाले त्यावर लेख उत्तम अथवा फालतू हे ठरविण्याचा एक लोकप्रीय प्रकार म्हणजे प्रतिसांदांची संख्या. हे लॉजीक फारच तोकडे वाटते. ज्यांच्या लेखनावर प्रतिसाद येत नाहीत, ते अशीच मनाची समजूत घालून घेतात. त्यामुळे तुमच्याकडून हे अपेक्षितच होते.

हे पान क्र. कसे मिळतात?

In reply to by ऋषिकेश

नवे लेखनवर जायचे. आणि वरच्या हेडलाईनीतल्या (होय, आमच्याकडे असंच म्हंत्यात)प्रतिसाद या शब्दावर दोनवेळा टिचकी मारायची. पहिल्यांदा मारली , की शून्य प्रतिसादवाले सगळे धागे वरती येतात.. आणि दुसर्‍यांदा मारली, की जास्तीत जास्त वाले.. आता तू माझा मित्र म्हणून तुला डायरेक लिंक दिल्या गेलेली हाये.. :p http://www.misalpav.com/tracker?order=comment_count&sort=desc तू पान नं. २ आणि मी १९व्या पानावर आहे. :(