Skip to main content

टाईल्स लावता घरा..... !!

लेखक जयवी यांनी मंगळवार, 31/08/2010 02:25 या दिवशी प्रकाशित केले.
असं म्हणतात, “घर पहावं बांधून आणि लग्न पहावं करुन” !! म्हणजे काय की घर बांधणं, लग्न समारंभ आयोजित करणं…. ही फार मोठी कामं आहेत. अगदी मान्य !! ह्या कामात खरोखरंच जीव मेटाकुटीला येतो. पण घरात टाईल्स बसवणं हे सुद्धा इतकं जिकीरीचं काम असेल असं आम्हाला परवा-परवा पर्यंत तरी वाटलं नव्हतं. तर त्याचं असं झालं. नवीन नवीन आखातात आलो तेव्हा सगळ्या घरातल्या wall to wall गालिच्याचं कसलं कौतुक होतं !! अगदी वेगवेगळ्या कोनातून, वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या लाईट्स मधे आपल्या घरचा गालिचा किती सुरेख दिसतो ह्याचं कोण अप्रूप होतं !! पण जसजशी वर्ष जायला लागली…तसतसा ह्या कौतुकाचा भर ओसरायला लागला.

वेल् ... मला वाटलं ते लिहीलं

लेखक शुचि यांनी सोमवार, 30/08/2010 23:57 या दिवशी प्रकाशित केले.
नवीन प्रकल्पावर रुजू झाले आहे. आत्तापर्यंत थोडेच सहकारी मिळाले आहेत. पैकी एक बराच संबंध येणारा सहकारी - त्याला आल्याआल्या ओळख झाल्यानंतर पहीला प्रश्न विचारल्याशिवाय रहावलं नाही - "फॅमिली इथे आहे का?" बर्‍याच जणांना नसत्या चौकशा लागतात तेही लगेच. नंतर २ दिवसात क्युबमधे येऊन विचारलं " तू काम सुरू केलंस का? तुला काही काम दिलय का?" मी म्हटलं "नाही फक्त फन्क्शनॅलिटीच शिकतेय." जरी मला काम दिलं असलं तरी मी कशाला माझे पत्ते उघडे करू हा काय माझा बॉस आहे का अपडेट्स मागायला? नोझी पीपल. परवा माझ्या क्युबिकलमधून खुर्ची मागुन घेऊन गेला ती परत केलीच नाही. हे साधे एटीकेट्स नाही का?

बुलबुल तरंग - माहिती हवी आहे

लेखक यशवंतकुलकर्णी यांनी सोमवार, 30/08/2010 22:52 या दिवशी प्रकाशित केले.
सद्या मी बॅंजो किंवा बुलबुलतरंग नावाचे एक वाद्य शिकत आहे (फक्त सातशे रूपयात ब्रॅण्ड न्यू पीस मिळाला). आजकालच्या ढ्याण-ढ्याण संगीतात हे गोड, नाजूक आवाजाचे वाद्य अगदी तुरळक प्रमाणात दिसते - हे वाद्य मरत चालले आहे असे म्हटले तरी चालेल; पण शिकायला फार सोपे असते (सा रे ग म प ध नी काही तासांत शिकता येते) इंटरनेटवर शोधून पाहिले, पण एकच साईट सापडली - त्यावर बाळबोध धडे नाहीत. मिसळपाववर हे वाद्य वाजवणारे, त्याबद्दल मार्गदर्शन करू शकणारे कुणी आहे का?? याबद्दल पुस्तके इ.

दहि

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी सोमवार, 30/08/2010 22:18 या दिवशी प्रकाशित केले.
मी एका होटेल मधे जेवायला गेलो होतो..शेवटी डाळ भात व दहि मागवले..दहि आल्यावर च्मच्याने एक लपका खाल्ला.. दहि खुप मधुर व घट्ट होते... घरी दहि लावले..पण दह्यात बराच पाण्याचा अंश व दहि आंबट गोड चविला होते.. होटेल सारखे मधुर व घट्ट दहि लावण्यास काहि खास पद्धत असते का? काहि टिप्प्स..असतिल तर कृपया सांगाव्यात.. सन्माननिय सभासदांनी या धाग्यावर विरजण घालु नये हि नम्र विनंति..

झोपाळा... आयुष्य...

लेखक एक अनामी यांनी सोमवार, 30/08/2010 21:00 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्य... आयुष्य म्हणजे एक झोपाळाच... वेगात झोके घेत असतानाच कसा झोपाळ्यातला खरा आनंद लुटता येतो तसाच वेगवान आयुष्य जगत असताना जीवनातला खरा आनंद मिळतो... जसजसा झोपाळ्याचा वेग कमीकमी होत जातो अन त्यातला आनंद सरत जातो तेव्हा खरंतर पुन्हा स्वतःहून झोका घेऊ शकतो पण ते जरा कठीण असतं, त्याऐवजी झोका देण्यास कुणी असेल तर पुन्हा अलगद वेगावर स्वार होणं त्यामानाने सोपे असते... तसाच आयुष्याचा-जगण्याचा वेग कमी होतो, पुन्हा गाडी रूळावर यायला एकत्याचे प्रयत्न अपुरे पडतील की काय ? असा प्रश्न पडतो तेव्हा खरं कुणाच्यातरी आधाराची गरज असते...

नव्या रुपयाच्या नाण्याचा घोळ : डॉक्टर संजय होनकलसे

लेखक dr sanjay honkalse यांनी सोमवार, 30/08/2010 18:17 या दिवशी प्रकाशित केले.
नव्या रुपयाच्या नाण्याचा घोळ : डॉक्टर संजय होनकलसे drsanjayhonkalse@gmail.com http://drsanjayhonkalse.tripod.com आर्थिक प्रगती पासून वाढणाऱ्या उत्पादनाला बाजारात क्रियाशीलता मिळवून देण्यासाठी चलनाची आवशकता असते त्यासाठी चलन शास्त्राचा योग्य व आदर्श उपयोग करण्याचे काम हे देशाच्या वित्त धोरण व वित्त संस्थेचे असते.

श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत: कर्म चक्र सिद्धांतानुसार पंच महा पतीव्रतांचे धर्म सूक्ष्म विवरण. डॉक्टर संजय होनकलसे : drsanjayhonkalse@gmail.com

लेखक dr sanjay honkalse यांनी सोमवार, 30/08/2010 18:10 या दिवशी प्रकाशित केले.
श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत: कर्म चक्र सिद्धांतानुसार पंच महा पतीव्रतांचे धर्म सूक्ष्म विवरण. डॉक्टर संजय होनकलसे : drsanjayhonkalse@gmail.com http://drsanjayhonkalse.tripod.com श्रीपाद चरित्र अनेक अर्थाने अद्भूत आहे, विलक्षण आहे. एकतर ते तेराव्या शतकात श्रीपादांच्या अनेक चमत्कारपूर्ण जीवन प्रवाहाबरोबरच लिहिले जात होते.