Skip to main content

झोपाळा... आयुष्य...

लेखक एक अनामी
Published on सोमवार, 30/08/2010
आयुष्य... आयुष्य म्हणजे एक झोपाळाच... वेगात झोके घेत असतानाच कसा झोपाळ्यातला खरा आनंद लुटता येतो तसाच वेगवान आयुष्य जगत असताना जीवनातला खरा आनंद मिळतो... जसजसा झोपाळ्याचा वेग कमीकमी होत जातो अन त्यातला आनंद सरत जातो तेव्हा खरंतर पुन्हा स्वतःहून झोका घेऊ शकतो पण ते जरा कठीण असतं, त्याऐवजी झोका देण्यास कुणी असेल तर पुन्हा अलगद वेगावर स्वार होणं त्यामानाने सोपे असते... तसाच आयुष्याचा-जगण्याचा वेग कमी होतो, पुन्हा गाडी रूळावर यायला एकत्याचे प्रयत्न अपुरे पडतील की काय ? असा प्रश्न पडतो तेव्हा खरं कुणाच्यातरी आधाराची गरज असते...
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचन संख्या 1719
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

फारच सुंदर ..... खरं आहे. कोणीतरी आपलं लागतं अलगद झोका द्यायला-घ्यायला. ज्याच्याबरोबर खळखळून हसता येईल, समरसून आनंद लूटता येईल असं. आळीपाळीनी झोका द्यायला-घ्यायला.....