Skip to main content

क्रिकेट वेळ वाया घालवून बघण्याचा खेळ आता उरला आहे का?

लेखक सुनिल पाटकर यांनी गुरुवार, 02/09/2010 21:45 या दिवशी प्रकाशित केले.
दिवसेंदिवस क्रिकेट खेळात होत असलेला गोंधळ ,रडीचा डाव ,मँच फिक्सिंग,भ्रष्टाचार यामुळे क्रिकेट वेळ वाया घालवून बघण्याचा खेळ आता उरला आहे का?

धिस टाईम फॉर आफ्रिका. - चित्रसफर.

लेखक अर्धवट यांनी गुरुवार, 02/09/2010 20:59 या दिवशी प्रकाशित केले.
थांबा... शिर्षक वाचुन घाबरू नका, अजुन एक भाग पाणी घालून वाढवत नाहिये. पण प्रवासातल्या गडबडीमुळे शेवटच्या काही भागात फोटो टाकायला जमलं नव्हतं. भरपाई म्हणुन या भागात केवळ फोटोच टाकतोय.

स्वीट कॉर्न घालुन आप्पे.

लेखक चिंतामणी यांनी गुरुवार, 02/09/2010 18:21 या दिवशी प्रकाशित केले.
स्वीट कॉर्न घालुन आप्पे. आप्पे बनवण्यासाठी साहित्य:- १.५ कप तांदुळ, ३ कप मका दाणे, १/४ कप उडीद डाळ, १ /२ कप खवलेला नारळ,आले, मीरची, कोथिंबीर, चवीनुसार मीठ. From APPE" alt="" /> कृती:- तांदु

महालक्ष्म्या

लेखक मितान यांनी गुरुवार, 02/09/2010 17:43 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या मराठवाड्यात गणपतीपेक्षा जास्त महत्त्व गौरींचं. आमच्याकडे त्यांना गौराया किंवा महालक्ष्म्या म्हणतात. माझ्या लहानपणच्या आमच्या घरातल्या लक्षुम्यांच्या या आठवणी. मी आठनऊ वर्षांची असेन तेव्हाच्या. अण्णांच्या नोकरीमुळे आम्ही लातूरला रहायचो. पण मुख्य देवघर मंजरथलाच. त्याला अण्णा हेडक्वार्टर म्हणायचे. गोदावरीच्या काठावर असलेल्या या छोट्याश्या क्षेत्रावरचे आमचे भटांचे घराणे. आजोबा म्हणजे जोशीबुवांचा गावात चांगलाच वचक. काका पण याज्ञिकी शिकलेले. पण शेती करायचे. अजूनही करतात. अण्णा आणि काका असे दोनच भाऊ. त्यामुळे आटोपशीर कुटुंब. शेती, गाईगोर्‍हे भरपूर...आजोबांचे पौरोहित्य उत्तम.

दंगल-ए-खास

लेखक अरुंधती यांनी गुरुवार, 02/09/2010 16:06 या दिवशी प्रकाशित केले.
''ए बच्ची, अंदर जा, अंदर जा....'' माझ्या बालमूर्तीला उद्देशून लॉजचा मॅनेजर खेकसला तशी मी घाबरून त्या जुनाट लॉजच्या लाकडी दरवाज्यातून आत स्वागतकक्षात गेले आणि आईला घट्ट बिलगून बसले. बाहेर जोरजोरात कानडी भाषेतील घोषणा ऐकू येत होत्या. सकाळच्या रम्य, शांत प्रहरी त्या घोषणांचा असंतुष्ट सूर वातावरण ढवळून काढत होता. गणपतीच्या सुट्टीतले ते सुंदर, सोनेरी दिवस. शाळेच्या सुट्ट्यांचा फायदा घेऊन माझे व धाकट्या बहिणीचे गाठोडे बांधून आई-वडील आम्हाला दक्षिण भारताच्या सफरीसाठी घेऊन गेले होते. मी होते जेमतेम दहा - अकरा वर्षांची तर बहीण आठ वर्षांची!

महाराष्ट्राला शिवसुष्टी ची खरच गरज आहे ?

लेखक टग्या टवाळ यांनी गुरुवार, 02/09/2010 15:21 या दिवशी प्रकाशित केले.
आज महाराष्ट्रात किमान ३ ते ४ शिवसुष्टी उभारल्या गेल्या आहेत. आता पुण्यात सुद्दा शिवसुष्टी उभी राहत आहे.खरच शिवसुष्टी साठी कोट्यावधी रुपये खर्च करणे कितपत योग्य आहे. त्या पेक्शा तोच खर्च जर मोडकळीस आलेल्ल्या अनेक गड आहेत त्यांना करुन हे गड सुधारता येणार नाहीत का. महाराष्ट्राची शान कशात आहे.

त्सोत्सी

लेखक सुनील यांनी गुरुवार, 02/09/2010 14:54 या दिवशी प्रकाशित केले.
एक जेमतेम तीन महिन्यांचे मूल - तेही दुसर्‍याचे - एखाद्याच्या जीवनात किती बदल घडवू शकते? एखादा क्रूर, पाषाण्हृदयी गुन्हेगार एका चिमुरड्याच्या सानिध्यात, अवघ्या तीन-चार दिवसात किती आरपार बदलतो, याचे फार सुरेख चित्रण आहे, गेविन हूड दिग्दर्शित "त्सोत्सी" ह्या इंग्रजीमिश्रित झुलू भाषिक चित्रपटात. झुलू भाषेत "त्सोत्सी" म्हणजे ठग. लहानगा डेविड. रागीट बाप मृत्युशय्येवर पडलेल्या आईलादेखिल भेटू देत नाही. शेवटी तो घर सोडून पळून जातो. जोहान्सबर्गमधील एका झोपडपट्टीत लहानाचा मोठा होतो. चार जणांचे टोळके जमवून चोर्‍या-मार्‍या करायला लागतो.

भेंडीची कुरकुरीत भाजी

लेखक शिल्पा ब यांनी गुरुवार, 02/09/2010 12:47 या दिवशी प्रकाशित केले.
ही फोटोची लिंक. तर काय आहे कि आज मी भेंडीच्या भाजीचा एक छोटासा प्रयोग करून पहिला...कुरकुरीत.. साहित्य : १) भेंडी २) लसूण ३) लाल मिरच्या (वाळलेल्या) ४) दाण्याचा कुट ५) मीठ फोडणीसाठी तेल, जिरे, मोहरी, हिंग, हळद कृती : भेंडी धुवून बर्यापैकी पातळ गोल काप करून घ्या. एक मोठे पसरट फ्राय पॅन घेऊन त्यात फोडणीसाठी तेल टाका...तुम्हाला जर भाजीच्या अंदाजानुसार फोडणीसाठी तेल ठरवता येत नसेल कृपा करून स्वैपाकाच्या भानगडीत न पडता हाट

'खमंग थालिपीठ' चं भाषांतर...

लेखक राजेश घासकडवी यांनी गुरुवार, 02/09/2010 12:46 या दिवशी प्रकाशित केले.
पुलंच्या कुठच्यातरी लेखात/भाषणात 'आता, आमच्या हिनं काय खमंग थालिपीठ बनवलं होतं, या वाक्याचं इंग्रजीमध्ये कसं भाषांतर करणार?' असा प्रश्न विचारला होता. पुलंना मराठी मनाची जाण होती, व 'खमंग, थालिपीठ' ह्या खास मराठी गोष्टी आहेत. त्यामुळे हे वाचकांना/श्रोत्यांना पटायला फारसा वेळ लागत नाही. पण या वाक्याचा नक्की अर्थ काय? इंग्रजांकडे इतर गोष्टी आहेत पण त्यांना बिचाऱ्यांना थालिपीठाचा खमंगपणा माहीत नाही असं म्हणून स्वतःलाच हुरळवण्याचा तो प्रकार आहे का? अर्थात इंग्लिश पाकपद्धतीला जे सगळेच जण हसतात व जोडे हाणतात, त्यामुळे तेवढा भाग खराही असेल.