Skip to main content

पाप-पुण्य, स्वर्ग-नरक

लेखक शुचि यांनी गुरुवार, 09/09/2010 22:49 या दिवशी प्रकाशित केले.
ईश्वर के संभावित अस्तित्व का ख़ौफ़ इतना लद जाता है मन पर कि सर पत्थर तक जा गिरता है । ........................राजर्षि अरूण या ओळी आज हिंदी कविताकोष या स्थळावर वाचल्या आणि मनात प्रश्नचिन्ह उमटल्याशिवाय राहीलं नाही. देवाची भक्ती आपण नीस्सीम प्रेमातून करतो की खौफ अर्थात भीतीतून?

फोनवरचा संवाद व काही प्रश्न

लेखक शानबा५१२ यांनी गुरुवार, 09/09/2010 22:36 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार,नमस्कार............ मी काही दीवसांपुर्वी "सल्ला हवा आहे" वगैरे काहीतरी एक लेख लिहला होता व विचारल होतं की अमुक व्यक्तीला फोन करायचा आहे.काय बोलु वगैरे.ती माझ्या वर्गात होती.आम्ही ५ ते १०वी एकत्र होतो. मला ह्या लेखातुन काहीतरी सांगायच आहे व विचारायच आहे.आजचा संवाद सांगितल्यानंतर विचारतो. "हॅलो"मी "कोण?"ती. "कोण लीना? मी सुशांत बोलतोय" मी ८-९ वर्षांनी तिच्याशी बोलत होतो.पाहील्याला पण तेवढीच वर्षे झाली. "सुशांत.....हा बोलना"तिचा शंकेने भरलेला सुर. "कुठे आहेस?"मी "कोण सुशांत?" "मी तुझ्या वर्गात होतो ना?.............तो" "तु कोणी वेगळ आहेस का?

हे बंध रेशमाचे.. (संपुर्ण)

लेखक निखिल देशपांडे यांनी गुरुवार, 09/09/2010 22:24 या दिवशी प्रकाशित केले.
(प्रेमदिनी पूर्वप्रकाशित) प्रिय सखे.... तू हे वाचे पर्यंत प्रेमदिन सुरु झालेला असेल... ह्या प्रेमदिनी मी आज हे प्रेमपत्र लिहित आहे. खरे तर ह्या नंतर तुझी रिऍक्शन काय असेल ह्या भीतीने लिहायला हात धजावत नाहीय पण आता याचीही सवय होत आहे असेच म्हणावेसे लागेल... गेल्या तीन वर्षा पासून आपण एकमेकांना ओळखतो... ओळखतो म्हणजे काय? मागचे तीन महिने सोडले तर आपले बोलणे फार कमीच व्हायचे. अर्थात त्याला कारण मीच आहे हे मला मान्य आहेच.. वागलोच होतो मी तसा... त्याची शिक्षा करतोय ना सहन गेले तीन वर्ष.. आता अजुन किती सहन करणार????

किमान एवढा तरी हक्क मला आहेच ना?

लेखक भानस यांनी गुरुवार, 09/09/2010 21:56 या दिवशी प्रकाशित केले.
' अ वेनस्डे ',' अब तक छप्पन ' हे दोन्ही सिनेमे मी कमीतकमी २५-३० वेळा पाहिले असतील. शिवाय कधीकधी तर कुठूनही सुरवात करून कुठेही बंद केले... असेही पाहिलेत. हे दोन्ही सिनेमे पाहताना वारंवार वाटते, असे खरेही कधी घडावे. हा ' स्टुपिड कॉमन मॅन ' मला हवाय. आतुरतेने मी त्याची वाट पाहतेय. ते आमचे शेकड्याने मारत आहेत तर किमान त्यांचे दोन तरी मारले गेलेले मला पाहायचेत. कुठलाही अतिरेकी हमला झाला की जीव मुंडके अर्धवट चिरलेल्या कोंबडीसारखा तडफडू लागतो. खरे तर मुंडके कधीचेच चिरलेय, त्यावर पुन्हा पुन्हा नव्याने सुरी फिरवली जाते. कधी छातीवर तर कधी पाठीवर.... वारच वार. अव्याहत व पद्धतशीर.

आठवण

लेखक विश्नापा यांनी गुरुवार, 09/09/2010 20:45 या दिवशी प्रकाशित केले.
रसिक मिपाकर, माझी मिपासाठी पहिलीवहिली रचना, शाळा-कॉलेजाच्या दिवसांमध्ये लिहिलेली.. षड्ररसांनी भरलेल्या आपल्या प्रतिक्रिया अपेक्षीत... आठवण याद आहे अजून मजला, श्रावणातल्या त्या बरसातीची | याद आहे अजून मजला, चित्त चिंब भिजविणार्‍या त्या नाजूक श्रावणधारांची || कसा विसरेन मी, तुझी ती पावसातील सोबत | तुझ्या अन त्या श्रावणगगनाविना भान न दुजाचं होतं मला प्रेमाच्या पवित्र त्या नगरीत || तुझ्या मनातलं सारं काही सांगत होत्या त्या जलधारा | अबोल,नि:शब्द माझ्या मनाला, बोलका करु पहात होता व

पिकलं पान

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 09/09/2010 20:02 या दिवशी प्रकाशित केले.
पिकलं पान
पिकलं पान झाडाला म्हणते बाय बाय माझं आता काय काम?
काव्यरस

हनुमंताची व्यथा !

लेखक चिगो यांनी गुरुवार, 09/09/2010 16:06 या दिवशी प्रकाशित केले.
त्या दिवशीच्या पेपरात कूठल्याशा गावची खबर होती खबर जरी लहान असली तरी तिची मजा जबर होती.. गाव म्हणे आकारानं तसं जरा छोटं होतं गावकुसाच्या शिवेवर हनुमानाचं मंदिर मोठं होतं.. जेव्हा कधी गावात लग्नाची वरात यायची व-हाडी मंडळी मंदिराच्या सावलीला आडोशाला हायची.. वरातीतल्या बायका मात्र कधीमधी मंदिरात जायच्या हनुमानच्या मुर्तीसमोर खुशाल अंगावरच्या साड्या बदलायच्या.. सालोसाल असंच घडुन अखेर ती एक रीत झाली मात्र शेवटी हनुमंताच्या ब्रम्हचर्याची जीत झाली.. एकदिवशी भक्तांच्या ध्यानी आलं मुर्तीनं डोळे मिटले होते कदाचित हनुमंताच्याही डोळ्याचे आता पारणे फिटले होते...!
काव्यरस

ई-पत्र किंवा ई-गप्पा मधल्या गमती जमती

लेखक मराठमोळा यांनी गुरुवार, 09/09/2010 14:58 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, गणपा शेट बरोबर ग-बोल वर गप्पा करताना टंकन-गल्लती मुळे एक विनोद झाला. त्यावरुन आधीच्या काळचे काही झालेले ग-बोल वरचे गैरसमज आणि जुन्या आठवणी ताज्या झाल्या. कधी कंप्युटर च्या प्रॉब्लेम्स मुळे, कधी घाईगडबडीत टंकण्यामुळे आपण कै च्या कैच बोलुन्/टंकुन जातो, पण परिणाम नेहमीच विनोदी असतील असे नाही ना, ;) ************************************************************* एकदा मला माझी जुनी मैत्रीण फब वर भेटली. तिच्याशी १-२ वेळा फॉर्मल बोलणं झालं. मग असंच एका दिवशी.. मी: Hi.

हिंदुत्व आणि भारतीयत्व

लेखक शहराजाद यांनी गुरुवार, 09/09/2010 11:21 या दिवशी प्रकाशित केले.
समरमध्ये इथे, म्हणजे अमेरिकेत, फार्मर्स मार्केट नावाचा एक प्रकार असतो. म्हणजे जागोजागी आठवड्याचा बाजार भरतो. आम्ही सबर्बमध्ये राहतो, खरेदी सुपरमार्केटमध्ये करतो. त्याऐवजी एखाद्या शनिवारी किंवा रविवारी सकाळी शहरांमध्ये जागोजागी आसपासच्या शेतांतून येणारा ताजा भाजीपाला व फळं विकण्यासाठी शेतकरी व मळेवाले येतात. खरेदीसाठी भारतीय व चिनी लोक तसेच ऑर्गॅनिक व फ्रेश खाण्याची हौस असलेले अनेक अमेरिकन तिथे येतात. या बाजारातून नुसता फेरफटका मारणे हादेखील अतिशय उल्हसित करणारा अनुभव असतो. परवाच आमच्या इथल्या भाजीबाजारात एका अनोळखी अमेरिकन बाईशी माझे बोलणे झाले.