सलमान खानचे "स्टारडम' आणि दोन-तीन चांगल्या फाइट्स, एवढ्याच बाबतीत "दबंग' जगावेगळा, विशेष म्हणावा लागेल. अन्यथा कॉमेडी नाही, जबरदस्त पटकथा नाही, चक्रावून टाकणारी वळणं नाहीत, नायक-खलनायकाच्या दमदार कुरघोड्या नाहीत...असं असतानाही "दबंग' एवढा का चालतोय? का गाजतोय? टाळ्या-शिट्ट्या खेचणारे संवाद, हे एक कारण असू शकतं. पण फक्त तेवढंच? बाकी काय असावं?
तुम्हाला काय वाटतं?
(विशेष सूचना ः "दबंग' पाहिलेल्या व्यक्तींनीच या विषयावर प्रतिक्रिया द्याव्यात, अशी अपेक्षा आहे. तो न पाहता प्रतिक्रिया देणाऱ्यांच्या तज्ज्ञतेबद्दल पूर्ण मान राखूनही, त्यांनी आधी चित्रपट पाहावा, ही विनंती.)