Skip to main content

ठेवू अम्ही विश्वास

लेखक पॅपिलॉन यांनी रविवार, 19/09/2010 या दिवशी प्रकाशित केले.
जॉन मॅकक्रे ह्यांच्या In Flanders Field ह्या कवितेला We Shall Keep The Faith ह्या कवितेने उत्तर दिले आहे मोनिका मायकल ह्या अमेरिकन कवयित्रीने. त्याच कवितेचा हा स्वैर अनुवाद. तुम्ही सोपवलेल्या मशाली, विश्वास आम्ही जपू अविरत! लालभडक खसखशीची फ़ुले रणांगणावर पसरलेली देताहेत संदेश आभाळाला फ़्लॆंडर्सच्या रणावरील ते रक्त केवळ अविस्मरीणयच! ही मशाल आणि ही फ़ुले नेहेमीच आठवण करून देतील फ़्लॆंडर्सच्या रणात शांतपणे निजलेल्यांची! मूळ कविता Oh!

फ्लँडर्साच्या रणामध्ये

लेखक धनंजय यांनी रविवार, 19/09/2010 या दिवशी प्रकाशित केले.
फ्लँडर्साच्या रणामध्ये मूळ कविता इंग्रजीमध्ये; कवी : जॉन मॅकक्रे. फ्लँडर्साच्या रणामध्ये स्थानदर्शक आमचे क्रूस आहेत रोवले - त्यांच्या रांगां-रांगांंमध्ये फुलतात रानफुले. वरती आकाशामध्ये धजून अजून थवे चंडोलांचे उडणारे ऐका अंधूक गाणारे, बंदुकींच्या बारांमध्ये. कोण आम्ही? आम्ही मृत.
काव्यरस

`दबंग'च्या यशाचे इंगित काय?

लेखक आपला अभिजित यांनी रविवार, 19/09/2010 या दिवशी प्रकाशित केले.
सलमान खानचे "स्टारडम' आणि दोन-तीन चांगल्या फाइट्‌स, एवढ्याच बाबतीत "दबंग' जगावेगळा, विशेष म्हणावा लागेल. अन्यथा कॉमेडी नाही, जबरदस्त पटकथा नाही, चक्रावून टाकणारी वळणं नाहीत, नायक-खलनायकाच्या दमदार कुरघोड्या नाहीत...असं असतानाही "दबंग' एवढा का चालतोय? का गाजतोय? टाळ्या-शिट्ट्या खेचणारे संवाद, हे एक कारण असू शकतं. पण फक्त तेवढंच? बाकी काय असावं? तुम्हाला काय वाटतं? (विशेष सूचना ः "दबंग' पाहिलेल्या व्यक्तींनीच या विषयावर प्रतिक्रिया द्याव्यात, अशी अपेक्षा आहे. तो न पाहता प्रतिक्रिया देणाऱ्यांच्या तज्ज्ञतेबद्दल पूर्ण मान राखूनही, त्यांनी आधी चित्रपट पाहावा, ही विनंती.)

वॅब साईट

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी रविवार, 19/09/2010 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्याला एखादी वेब साइट बनवायची असेल तर त्या साठी काय कराव लागतं ? त्याची प्रक्रिया काय ? याची माहिती देणारा सविस्तर लेख ऑन लाइन कुठे वचायला मिळेल कॄपया मार्गदर्शन करवे

माज

लेखक सविता यांनी रविवार, 19/09/2010 या दिवशी प्रकाशित केले.
एखाद्याला उगाच माज आहे एखाद्या गोष्टीचा असं वाटून किती वैतागतो आपण कधीतरी..... माझ्या घराच्याजवळच एक सायकलचे दुकान होते."जयनाथ सायकल मार्ट". हवा भरणे, किरकोळ दुरुस्ती अशा प्रकारचे एक १५ बाय १५ जागेत थाटलेले जुनाट दुकान होते ते! दुकान तसे यथा तथाच पण बहुतेक त्या एरिया मध्ये तेव्हा असेलेले एकमेव सायकलचे दुकान असल्यामुळे चांगले चालायचे... दुकानाचा मालक एक गतकाळीचा पहिलवान होता.....म्हणजे ते मला दुकानात लावलेल्या फोटोवरुन कळले होते. पहिलवान गल्ल्यावर बसण्यशिवाय आणि एखाद्या आलेल्या मित्राशी तास न तास गप्पा मारण्याशिवाय काहीच करायचा नाही.

मी

लेखक प्रीत-मोहर यांनी रविवार, 19/09/2010 या दिवशी प्रकाशित केले.
स्वत:तच गुंतलेली मी स्वतःलाच शोधणारी मी क्षणा़क्षणाला नवीन शोधाने अधिकच व्याकूळ मी... ...नाही आवडत त्यांना हे असे.... म्हण्तात एकुलकोंडी मी... माणुसघाणी मी हे ऐकुन , पुन्हा माझ्यातच हरवलेली वेडी मी..... चाललाय माझा प्रयत्न स्वतःला ओळखण्याचा ..... कळत असूनही नासमझ, मूर्ख मी..... -- (प्रीतमोहर/प्रीमो)

स्व प्न भं ग -

लेखक विदेश यांनी रविवार, 19/09/2010 या दिवशी प्रकाशित केले.
तू हात पुढे जो केला मी दिला त्यास आधार समजून फोड तळहाती हळुवारपणे जपणार वचनास पाळण्याचा केला पक्का निर्धार चाललीस सप्तपदी तू मी कधी न अंतरणार शंकेस कधी तो थारा तू मनात ना देणार जोडीची गोडि गुलाबी ही सदैव दिसणार तू कामावरून येता तव स्वागत मी करणार कप हाती गरम चहाचा बिस्किटासवे देणार तारीख एक ती येता मी खूष अती होणार तव पगार माझ्या हाती- मी तुजभवती फिरणार ...स्वप्नातहि असले भलते तू आणु नको कुविचार - जा सांग तुझ्या बापाला मी घरजावई ना होणार ! ती केबी-फोरची संधी मी नाही दवडणार करोडपती बनण्याची मी स्वप्ने बघणार !!

भारताच्या क्रिडा क्षेत्राला चांगले दिवस.

लेखक चिंतामणी यांनी रविवार, 19/09/2010 या दिवशी प्रकाशित केले.
सरकारी धोरणात क्रिडा प्रकाराला जरी फारसे चांगले स्थान नसले तरी काही क्रिडा संघटनाची चांगली कामगिरी आणि खेळाडुंच्या अथक परीश्रमामुळे चांगले दिवस येउ लागले असे वाटत आहे. आजच बातमी आली की भारताची महिला मुष्टियुद्ध खेळाडू एम.सी. मेरीकोम हिने सलग पाचव्यांदा विश्वविजेतेपद पटकावले आहे. प्रथमतः तीचे अभीनंदन. काही दिवसापुर्वी ऑलींपिकमधे कांस्य पदक मिळविणा-या सुशिलकुमार या मल्लाने जागतीक अजींक्यापद स्पर्धेत विजेतेपद मिळविले. तत्पुर्वी तेजस्वीनी सावंतने इतीहास घडवला.