Skip to main content

वडिलोपार्जित मालमत्ता

लेखक ऋषिकेश यांनी बुधवार, 22/09/2010 या दिवशी प्रकाशित केले.
एका दिवशी भारतात दोन बालके जन्मली. एक होते अब्जोपती कारखानदाराचे मुल तर दुसरे जन्मले त्याच कारखान्यातल्या शिपायाच्या घरात. केवळ मुल म्हणून बघितले तर दोघेही सारखी. एकाच वयाची, एकाच वेळी जन्मलेली. फक्त ते कोणा पोटी जन्मले या फरकाने त्यांचे एकूण आयुष्य एकमेकांपेक्षा वेगळे असणार हे नक्की. अश्या वेळी ह्या दोघांना मिळणार्‍या संधीमधे कमीत कमी फरक निर्माण व्हावा म्हणून सरकार विविध उपाय योजना करते. जसे निम्न उत्पन्न गटासाठी आरक्षण, मागास जमातींसाठी शिक्षण व नोकरीमधे आरक्षण, शिक्षणाच्या फी मधे सवलत अथवा सुट, शिक्षण घेतायेण्याच्या पात्रतेत सवलत/सुट वगैरे वगैरे.

मदत

लेखक केशवपुत यांनी बुधवार, 22/09/2010 या दिवशी प्रकाशित केले.
मदत हवी आहे... आपणाकडे "शिक्षक" , "मित्र" ह्या विषयांसंबंधीचे काव्यलेखन असेन तर कृपया द्यावे. आपणास एखाद्या जाला बद्द्ल माहिती असेन तर ति प्रसारित करावी. धन्यवाद!!!

गझल

लेखक यशोधरा यांनी बुधवार, 22/09/2010 या दिवशी प्रकाशित केले.

पुढल्या वर्षी लौक्कर या...

लेखक विसोबा खेचर यांनी बुधवार, 22/09/2010 या दिवशी प्रकाशित केले.
ज्याच्या कृपाशीर्वादाने मिपा सुरू झाले तो आमचे लाडके दैवत असलेला लालबागचा राजा मुंबैचा मुक्काम आटपून आज निघाला.. लालबागच्या राजाचा रुबाब अन् त्याची शान.. लै भारी.. सर्व मिपाकरांतर्फे त्याला अलविदा.. बाय बाय.. टाटा..:) गंपती बाप्पा मोरया पुढल्या वर्षी लौक्कर या!

सर्वधर्मप्रेम !

लेखक माझीही शॅम्पेन यांनी बुधवार, 22/09/2010 या दिवशी प्रकाशित केले.
साध्याचे मीपा वर प्रकाशित झालेले काही लेख आणि अयोध्धेचा निकल ह्या पार्श्वभूमी वर सर्वधर्मसमभाव आजूबाजुला मला कुठे दिसतो ह्या साठी प्रपंच ! पहिला किस्सा लग्ना नंतर आम्ही सध्या राहत असलेल्या घरी भाढ्याने रहवायस आलो. आमचा मजला म्हणजे एक छोटा भारत असावा , आम्ही हिंदू , समोरच घर मुस्लिम , शेजारी ख्रिचन जैन आणि अजुन एक हिंदू. अश्या एकदम कॉसमपलिटिन शेजार म्हणजे आम्हाला सॉलिड धाकधुक होती , खासकरून घरी येणारे सर्व पाहुणे समोरच फ्लॅट वरच मुस्लिम नाव पाहून नाक मुरडायचे.

हिशेबाची माय मेली?

लेखक गंगाधर मुटे यांनी बुधवार, 22/09/2010 या दिवशी प्रकाशित केले.
हिशेबाची माय मेली? कशी झोपडी हीच अंधारलेली? कुण्या उंदराने दिवावात नेली? पुजारी पुसे एकमेकांस आता नटी कोणती आज नावाजलेली? तिला घाबरावे असे काय आहे अशी काय ती तोफ़ लागून गेली? किती नाडती आडदांडे तराजू कशी रे हिशेबा, तुझी माय मेली? कुणी हासला तो कळ्या कुस्करोनी कशी दरवळावीत चंपा चमेली? म्हणालेत आम्ही तुरुंगात डांबू जरी तू कधी अभय फ़िर्याद केली..! गंगाधर मुटे ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, (वृत्त - भुजंगप्रयात)

सल्ल्यासाठी विजूभाऊनी, इथ फोडिला टाहो,

लेखक केशवसुमार यांनी बुधवार, 22/09/2010 या दिवशी प्रकाशित केले.
सल्ल्यासाठी विजूभाऊनी, इथ फोडिला टाहो, प्रतिसादातून पडती लाथा, श्रोते ऐका हो ! त्याच्या धाग्याचीच वाट आज लावली कशी वाचकांनी त्याची लाज काढली! गंगेवानी निर्मळ होतं, असं पुण्य गाव सुखी समाधानी होतं, रंक आणि राव त्याची गुणगौरवानं किर्ती वाढली कशी वाचकांनी त्याची लाज काढली! अशा गावि आला एक चालू जालवंत महाचालू म्हणती त्याला, कुणी म्हणे चंट त्याला पुण्यामंन्दी नोकरी हि लागली कशी वाचकांनी त्याची लाज काढली! स्वस्त घरासाठी त्यांन शोधाशोध केली हवेशीर कोठी एक पाहण्यात आली पण अट मालकानं, अशी घातली कशी वा

मदत हवी आहे होएक्स (चकमा) मेल कसा ओळखावा ??

लेखक कापूसकोन्ड्या यांनी बुधवार, 22/09/2010 या दिवशी प्रकाशित केले.
" एक वेळ स्वतः हरवलास तरी चालेल पण पासपोर्ट हरवू नको." प्रथम परदेशी जाताना माझ्या जवळच्या मित्राने दिलेला हा बहुमोल सल्ला आत्ताच प्रकर्षाने आठवण्याचे कारण म्हणजे एक आलेला (का आलेली?) इमेल. हे ढकलमेल (Mass forward) किंवा चकमा (hoax) मेल समजू नये ही विनंती आत्तापर्यंत अश्या अनेक मेल येत असतात आणित्याना फाट्यावर कसे मारायचे हे आपणासर्वाना आता चांगलेच ठावूक आहे. (उदा:-इमेल रूपी संतोषी माता किंवा तत्सम) पण विषय महत्वाचा आणि चिंताजनक होता म्हणून हा लेखन प्रपंच. तर विषय आहे पासपोर्ट (पारपत्र) चा.

सायकल चोर

लेखक तिमा यांनी बुधवार, 22/09/2010 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या लहानपणी, साधारण सात-आठ वर्षांचा असताना एक इटालियन चित्रपट पाहिला होता 'द बायसिकल थिव्हज' ! तेंव्हा तो फारसा समजलाही नव्हता पण घरी आल्यावर आईने त्याची गोष्ट सांगितली होती. नुकतीच त्या सिनेमाची आठवण झाली व प्रकर्षाने तो पुन्हा पहावा असे मनाने घेतले. मग मुलाच्या मदतीने तो नेटवर शोधला, त्याची सबटायटल्स शोधली आणि बघितला. एक अविस्मरणीय अनुभव घेतल्याचे समाधान मिळाले. या चित्रपटाला ऑस्कर व इतर अनेक पुरस्कार मिळाले आहेत व जगभरातल्या समीक्षकांनी तो अद्वितीय असल्याचे मान्य केले आहे.