साध्याचे मीपा वर प्रकाशित झालेले काही लेख आणि अयोध्धेचा निकल ह्या पार्श्वभूमी वर सर्वधर्मसमभाव आजूबाजुला मला कुठे दिसतो ह्या साठी प्रपंच !
पहिला किस्सा
लग्ना नंतर आम्ही सध्या राहत असलेल्या घरी भाढ्याने रहवायस आलो. आमचा मजला म्हणजे एक छोटा भारत असावा , आम्ही हिंदू , समोरच घर मुस्लिम , शेजारी ख्रिचन जैन आणि अजुन एक हिंदू. अश्या एकदम कॉसमपलिटिन शेजार म्हणजे आम्हाला सॉलिड धाकधुक होती , खासकरून घरी येणारे सर्व पाहुणे समोरच फ्लॅट वरच मुस्लिम नाव पाहून नाक मुरडायचे.
त्यातून आम्हाला अस कळल की त्या घरातला करता माणुस ह्याचा बिल्डींग बांधकामाचा व्ययसाय आणि बर्यापैकी राजकीय वजन असलेला होता.
पण हळु हळु सर्वच कुटुंबांची जशी ओळख झाली आणि वाढली तसे सर्व संभ्रम दूर झाले , ईद ला खीर-कूर्मा (की शीर-कूर्मा) घरी , नातळला केक , कुकीज , ईस्टरला काही गोड-धोड , जैनांचे पर्युषण संपला की त्यांच गोड-धोड बाकी इतर प्रसंग पूजा , वाढदिवस वैइगरे दणक्यात सुरू झाले.
नंतर हे घर आणि शेजार एवढ आवडले की मालक ते विकायला तयार आहे हे कळल्यबरोबर विकत घेऊन टाकल.
ह्या वर्षी तर रमझान-ईद आणि गणेश-चतुर्थी एकाच दिवशी पुन्हा शीर-कूर्मा आणि मोदकन्ची देवाण घेवाण झाली.
सर्वधर्मसमभावाचा पहिला टप्पा पोटोबातुन जाउ शकतो याची खात्री झाली.
दुसरा किस्सा
आम्ही समस्त कुटुंब आई-बाबासकट मेंफिस(अमेरिका) इथे दोन वर्षांसाठी होतो , तेव्हा अर्थातच आमच्या बाप्पाच पण स्थलनन्तर झाले , दुसर्या वर्षी बाप्पा च आगमन झाल्या नंतर एका मुस्लिम बाईने आमच्या गुजू शेजर्याच्याकडून गणपती बाप्पाच्या दर्शनाला येउका म्हणून विचारणा केली , नसीम त्यांच नाव. आम्ही जास्त आडे-वेधे न घेता पटकन या सांगून दिल.
तर त्या बाईंनी येताना चक्क बदामी शिरा पसाद म्हणून आणला , आम्ही घेऊ की नाही याची खात्री नव्हती म्हणून अजुन एक फळांची मोठी बासकेट पण आणली.
नसीम आली तेंव्हा आम्ही काय बोलणार म्हणून एका-मेकांची तोंड बघताना त्यानीच बोलायला सुरूवात केली. ती म्हणाली मी लहान पणापासून सायन कोळी-वाड्यात वाढले गणपती आणि ईद आणि कोळी लग्न याना खूप मिस करते , इथे आल्या नंतर मंदिरात जाऊ की नाही याचा विचार करताना दहा वर्ष गेली पण आता तुमचा कडे गणपती बाप्पा आहे हे कळल्याननंतर राहवले नाही.
तिच्या इतर अनेक आठवणिनी नकळत हळवी झाली. ती गेल्या नंतर आम्ही सर्व जन बराच वेळ एकमेकाशी बोललो नाही शेवटी धर्म माणसांना जोडण्यासाठी असतो पण आपण सर्वच नेमक उल्ट करत राहतो.
असे अनेक प्रसंग आहेत पण त्यावर नंतर कधी तरी , मी-पा वरील जाणकारणी असे काही प्रसंग लिहिल्यास माझा लेखाचा उद्देश नक्कीच पूर्ण होईल.
याद्या
2542
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
असेच शेजारी सरवाना लाभो
छान वाटलं!
अगदी नविन घडलेला
छान किस्सा !
In reply to अगदी नविन घडलेला by निवेदिता-ताई
धर्म माणसांना जोडण्यासाठी
+१
In reply to धर्म माणसांना जोडण्यासाठी by गणेशा
खर आहे...........
तुमच्याप्रमाणे सर्वांना असा
आमेन!
In reply to तुमच्याप्रमाणे सर्वांना असा by शहराजाद
@माझीही शॅम्पेन छान अनुभव.
In reply to आमेन! by बेसनलाडू
तरीही तथास्तु म्हटले नसते :)
In reply to @माझीही शॅम्पेन छान अनुभव. by विश्वनाथ मेहेंदळे
शब्दाचे मूळ संस्कृत असले तरी
In reply to तरीही तथास्तु म्हटले नसते :) by बेसनलाडू