Skip to main content

चौकट

लेखक दत्ता काळे यांनी बुधवार, 29/09/2010 या दिवशी प्रकाशित केले.
मळलेल्या वाटेवरुन मी जातो बागेतल्या त्या कोपर्‍याकडे गुलमोहोराखाली असलेल्या लाकडी बाकाकडे तिथे असतो गुलमोहोराच्या फुलांचा पखरण ल्यायलेला जमीनतुकडा. मला हे चित्र सुखदायी वाटतं वाटतं करावंसं चौकटबध्द मी चौकट टाकतो त्या चित्राभोवती. आता लाकडी बाक, मागे बहरलेला गुलमोहोर अन् त्याखालची लालरेशमी जमीन ...

माहिती हवी आहे.( दिल्लीतील हॉटेल बद्दल)

लेखक अमोल केळकर यांनी बुधवार, 29/09/2010 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, मला आपणाकडून एक मदत पाहिजे आहे. माझे आई-बाबा ( वय सत्तरीच्या पुढे) नोव्हेंबर मधे दिल्ली, जालंदर ,चंदिगड, अमृतसरला जाणार आहेत. आईला जालंदरला तिच्या लेखनाबद्दल पुरस्कार मिळाला आहे. तिकडची रहाण्याची सोय आयोजकांनी केली आहे . मात्र दिल्ली, चंदिगड त्याढिकाणी रहाण्याची सोय असलेली चांगली हॉटेल्स ( महाराष्ट्र मंडळ वगैरे ) माहित नाहीत . ज्यांना काही यासंबंधी माहित असेल तर कृपया माहिती द्यावी . धन्यवाद अमोल केळकर

मला पडणारे काही प्रश्न

लेखक एमी यांनी बुधवार, 29/09/2010 या दिवशी प्रकाशित केले.
रुढी/परंपरा पुरुषांना सोयिस्कर आहेत म्हणुन अजुनही पाळल्या जाव्यात का? काही उदाहरणे
  1. मुलीने लग्न झाल्यावर मुलाच्या घरी/सासरी रहायला जाणे जर मुलगी (एकुलती एक असेल/फक्त बहिणी असतील तरीही) आपले घर सोडून येते तर मुलानेही त्याचे घर सोडले आणि दोघानी नविन संसार मांडाला तर एवढा गहजब का माजवला जातो.

माझी - ती....

लेखक अथांग यांनी बुधवार, 29/09/2010 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवसांपूर्वी कुसुमिता ची 'ती' वाचली, आणि शेवटचा प्रश्न छळत राहीला - 'स्त्री' आहे ती आता, आता तिच्या स्वप्नांवर तिचा काय हक्क? वाटले याच्याही पुढे काहितरी असावे.

मराठी रॅप ...

लेखक बट्ट्याबोळ यांनी मंगळवार, 28/09/2010 या दिवशी प्रकाशित केले.
नुकताच तु-नळी वर "मराठी रॅप" बघायला मिळाला. Colors चॅनल वर "India's Got Talent" मधे प्रदिप काशीकर हा पोरगा लय भारी मराठी रॅप गातो. http://www.youtube.com/results?search_query=pradip+kashikar&aq=f सोनाली, साजिद (जज्ज) यांना त्याचा परफॉर्मन्स खूप अवडला. आता चर्चेचा मुद्दा: पण किरण खेर (तिसरी जज्ज) ने मात्र त्याच्या "भाषेवर" टीका केली. तिच्या प्रमाणे, प्रदीप ने मुंबईय्या-हिन्दि भाषेत रॅप केला असता तर "आम्हाला पण" कळला असता. आम्ही म्हणजे साजिद आणि ती !! (साजिद खान ला मराठी कळते ..) तुमच काय म्हणणे आहे ?

भारतीय इंजिनिअरिंग क्षेत्र

लेखक नितिन थत्ते यांनी मंगळवार, 28/09/2010 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतीच विकास यांच्या "गोईंग फॉरवर्ड" या धाग्यावर जी चर्चा झाली त्या निमित्ताने भारतातल्या इंजिनिअरांची गुणवत्ता वगैरे गोष्टींची चर्चा झाली. त्यानिमित्ताने इंजिनिअरिंगच्या व्यवसायाविषयी आणि शिक्षणा*विषयीचे माझ्या मनात आलेले फुटकळ विचार. इंजिनिअरिंग हे क्षेत्र डॉक्टरी, अकाउंटन्सी, वकिली यांसारखेच व्यावसायिक क्षेत्र समजले जाते. परंतु या इतर व्यवसायांमध्ये आणि इंजिनिअरिंगच्या व्यवसायामध्ये मुख्य फरक हा की या इतर व्यावसायिकांची एक अ‍ॅपेक्स संघटना असते. आणि ती त्या त्या व्यावसायिकांचे आणि व्यवसायांचे नियंत्रण करते. इंजिनिअरांची अशी संघटना नाही.

संधी

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी मंगळवार, 28/09/2010 या दिवशी प्रकाशित केले.
मला नाही वाटत, की मी कधी कुणाच्या उपयोगी पडेन ! पण मिळालीच मला संधी पाय घालून पाडण्याची कुणाला तर मात्र ... मी नक्की पाडेन त्याला कारण ..... एवढं तरी केलं पाहिजे आपण कुणासाठी तरी असं नेहमी वाटतं मला एक माणूस म्हणून.....!!