लेखकश्रीगणेशायांनी शनिवार, 13/11/2021 23:11 या दिवशी प्रकाशित केले.
बोलणं होतंय, कळणं नाही.
पाहणं होतंय, रमणं नाही.
ऐकणं होतंय, समजणं नाही.
धावणं होतंय, थांबणं नाही.
भेटणं होतंय, मिसळणं नाही.
फिरणं होतंय, शोधणं नाही.
आठवणं होतंय, विसरणं नाही.
वाचणं होतंय, उमगणं नाही.
लेखकअनन्त्_यात्रीयांनी शनिवार, 13/11/2021 16:30 या दिवशी प्रकाशित केले.
किनखापी आभाळाने
लपविले निळे नक्षत्र
मृगजळात बुडून गेले
काळाचे घटिकापात्र
थोपवल्या आवेगांच्या
डोहात दफनली रात्र
रिक्तता नसे ज्या ठावी
ते फुटले अक्षयपात्र
जागवूनी पिशाच्च शमतो
का कधी अघोरी मंत्र ?
लेखकश्रीगणेशायांनी शुक्रवार, 12/11/2021 21:52 या दिवशी प्रकाशित केले.
(मागच्या वेळी श्री ने मोठ्या शिताफीने वाइनचा प्रसंग वेळ मारून नेला होता. वाईन - भाग १
पण सौ काही हार माननाऱ्यातील नव्हती. पाहुयात पुढे काय घडलं ते...)
सौ: मग काय विचार केला आहे तुम्ही?
श्री: (गोंधळून) कशाचा विचार? आणि तू असं अचानक कोड्यात काय बोलते आहेस आज?
सौ: वाटलंच. माझं मन काही तुम्ही जाणू शकत नाही. आज १६ वर्षे संसार एकटीने चालवला. पहिल्यांदा काहीतरी मागितलं तर तुम्ही चेष्टेवारी नेला विषय.
श्री: (डोक्यात प्रकाश पडून) मी तुझी चेष्टा का करेल? आणि तेही वाईन वरून? उलट तूच माझी चेष्टा केली की काय असं मला वाटतंय.
लेखकमायमराठीयांनी शुक्रवार, 12/11/2021 00:13 या दिवशी प्रकाशित केले.
गंध साऱ्या पाकळ्यांना
जागवे जो जाणीवांना,
मोगऱ्याचे उमलणे,
सोसते का नकारांना ?
मोहण्याची हौस नाही
त्याविना जीणेच नाही
जगे कसा जीव कोरा
रंग ज्यात उरलेच नाही ?
विरहगीत हाय रे !
सुमन कसे सावरे
मधुप का स्तब्ध होई
पंख रोखून बावरे ?
हा उत्सव नित असे
दैवयोग मग हसे
गळून गेल्या आसवांना
प्रणय कोणाचा पुसे ?
लेखकज्ञानोबाचे पैजारयांनी गुरुवार, 11/11/2021 15:38 या दिवशी प्रकाशित केले.
सगळे कंस पूर्ण केलेले आहेत उगाच मोजत बसू नका...
पेरणा, प्राची ताईची ही कविताhttp://www.misalpav.com/node/49553
प्राचीताईने केलेला भावानुवाद करायचा प्रयत्न चांगला होता, पण तिला बिचारीला त्या गाण्याचा खरा अर्थ समजलाच नाही ( हा उगाच खोटे कशाला बोलायचे?)
स्पष्ट बोललो म्हणून रागावू नको बरका प्राचीताई, पण माझ्या फार अपेक्षा होत्या तुझ्या या भावानुवादा कडून.
माझ्या आता पर्यंतच्या अनुभवावरुन सांगतो हे गाणे असे भारी आहे की दुसऱ्या कोणाlला खरा अर्थ लक्षात येण्याची शक्यताच नाही.
लेखकप्राची अश्विनीयांनी बुधवार, 10/11/2021 15:52 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्यापाशी ठेवलेले
काही जपून अजून.
चिंब चिंब भिजलेले
श्रावणाचे काही दिन..
एक रात्र थांबलेली
पत्र माझे पांघरून,
रात्रीला त्या विझवून
दे ना सारे पाठवून..
ऐकतोस ना रे तूही
पाचोळा हा वाळलेला?
नाद त्याचा एकदाच
कानांमध्ये माळलेला..
शिशिराची एक फांदी
हलताहे रे अजून,
तीच डहाळी मोडून
दे ना सारे पाठवून..
छत्री एकुलती एक,
दोघे अधमुरे ओले
कोरडे वा चिंब थोडे.
सुके तर माझ्यासवे;
उशापाशी भिजलेले
राहिले का माझे मन?
आवरून सावरून
दे ना सारे पाठवून..
अगणित चंद्रवेळा..
एक तीळ खांद्यावरी..
मेंदीओला दरवळ..
रुसवे ते कितीतरी,
आणि अनेक वचनं
खरीखोटी भासणारी..
बघ तूही आठवून
दे ना सारे पाठवून..
पाठवशी जे तू सारे
मृ