Skip to main content

जीव कोरा

लेखक मायमराठी यांनी शुक्रवार, 12/11/2021 00:13 या दिवशी प्रकाशित केले.
गंध साऱ्या पाकळ्यांना जागवे जो जाणीवांना, मोगऱ्याचे उमलणे, सोसते का नकारांना ? मोहण्याची हौस नाही त्याविना जीणेच नाही जगे कसा जीव कोरा रंग ज्यात उरलेच नाही ? विरहगीत हाय रे ! सुमन कसे सावरे मधुप का स्तब्ध होई पंख रोखून बावरे ? हा उत्सव नित असे दैवयोग मग हसे गळून गेल्या आसवांना प्रणय कोणाचा पुसे ?
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 886
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया