Skip to main content

टेकडीच्या माथ्यावर

लेखक दत्ता काळे यांनी बुधवार, 06/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
मी महात्मा सोसायटीच्या मागच्या टेकडीवर व्यायामाच्या निमित्ताने फिरायला जात असे. हल्लीही जातो पण दोन वर्षापूर्वी जसा सलग दोन वर्षे नित्यनियमाने जात असे तसे आता काही राहीले नाही. पण अजूनही टेकडीवर कधी गेलोच तर पूर्वीचाच ताजवा जाणवतो. टेकडीवरच्या कितीक मजेशीर आणि अन्य प्रसंगामुळे टेकडीवर फिरायला जाणे हि कल्पना दिवाळीच्या सणाइतकी मनाला प्रसन्नता देणारी असते. पश्चिम ते पूर्व असा विस्तार असणार्‍या ह्या टेकडीचे एक टोक पश्चिमेकडे मुंबै-बंगळूर हायवेकडे तर पूर्वेचे गांधीभवन-डहाणूकर कॉलनी भागाला वळसा घालून कर्व्यांच्या कॉलेजकडे उतरते. टेकडीवर मी पश्चिमेच्या दिशेने न जाता पूर्वेच्या दिशेने जातो.

हनुमानाचा शाप व त्यावर उतारा

लेखक रणजित चितळे यांनी बुधवार, 06/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
अंतिम भाग गुरवारी (७ आक्टोबर) ला प्रसिद्ध ब्रिटीश सेनानी फिल्ड मार्शल फिलिप चेटवुडच्या शब्दात थोडा बदल करुन राष्ट्रव्रती कसा असावा हे थोडक्यात सांगतो - आपल्या राष्ट्राची सुरक्षा, राष्ट्राचा सन्मान आणि राष्ट्राचे कल्याण - नेहमीच सगळ्यात आधी. तदनंतर आपल्या परिवाराचा सन्मान, परिवाराचे कल्याण आणि परिवाराची सोय. स्वतःची सोय, स्वतःचे कल्याण व स्वतःची - सुरक्षा शेवटी, नेहमीच शेवटी. हनुमानाचा शाप व त्यावर उतारा – पहील्या भागात आपण प्रामुख्याने खालील निर्देशित मुद्द्यांवर चर्चा केली.

भेट

लेखक अनिवासि यांनी बुधवार, 06/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
मी दिवाळीसाठी भारतात येणार आहे. पुण्यात जास्त वेळ आणि मग मुम्बई वगेरे. साधारण २-३ महीने आहे. मिपाकराना भेटायला आवडेल. खरडवहीत नीरोप ठेवावा.

मला हे प्रश्न पडतात

लेखक शुचि यांनी बुधवार, 06/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
मॉंटेसरीत असताना होळीच्या भूतांना घाबरले होते. तोंडे रंगवलेले, मुखवटे घातलेले लोक, लहान मुलं पाहून मागे मागे जात गेले अन खरोखरच तारेच्या काटेरी कुंपणावर पडले. बरच ओरखडलं होतं, धनुर्वाताची लस टोचून घ्यावी लागली होती. तेव्हा कितीही सांगीतलं असतं की ती भूतं खोटी असतात तरी बालमनाला पटलं नसतं. त्या क्षणापुरता त्यांची विद्रूप, भडक रूपं हेच वास्तव होतं. ___ भविष्यविषयक चिंता , असुरक्षितता मग ती वित्तीय असो वा आरोग्यविषयक या भूतांसारख्याच असतात का? आपलं उरलं सुरलं मानसिक स्वास्थ्य नष्ट करणार्‍या.

रोबो भेटला बाळासाहेबांना.

लेखक चिंतामणी यांनी बुधवार, 06/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
रजनीकांत उर्फ शिवाजी गायकवाडेने आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. 'मातोश्री'वर शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी 'महाराष्ट्र देशा' हा फोटो अल्बम रजनीकांतला भेट दिला. शिवसेनाप्रमुखांना भेटताच तो भारावून गेला. यापूर्वीही तो शिवसेनाप्रमुखांना भेटला होता. त्यामुळे आज पुन्हा त्यांची भेट झाल्यानंतर रजनीकांतच्या चेहऱ्यावर आनंद पसरला होता. त्याचा तो आनंद पत्रकारांशी गप्पा मारताना दिसून येत होता. मूळचा मराठी असलेल्या रजनीकांतचा मराठी बाणा अचानक उफाळून आला आणि त्याने आपणास मराठी चित्रपटात काम करायचे आहे, अशी इच्छा व्यक्त केली. शिवाय असंख्य मुंबईकरांचे आभार मानले.

नेट नेटकं

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी बुधवार, 06/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
परदेशात नुकत्याच जन्मलेल्या माझ्या नातवाचं "तोंड" मला फेसबूकवर दाखविण्यात आलं तेव्हा माझ्या इतकच लक्षात आलं कि माझ्या अंत्ययात्रेच्या वेळी ...माझ्या मुलाला यायची गरज नाही अंत्यायात्रेची क्षणचित्रे त्याला फेसबूकवर पाहता येतील...! खरच या इन्टरनेट मुळे किती जवळ आलो आहोत नाही आपण...? अगदी सगळं "नेटनेटकं" झालय....!!
काव्यरस

रम्य ते बालपण

लेखक शानबा५१२ यांनी मंगळवार, 05/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
त्यावेळी मी तीसरी चौथीत असेन.तेव्हा मी बोरीवलीला रहायचो.पाच पैसे,वीस पैश्याचे नाणे हातात घेउन पेपरमीटच्या गोळ्या,बोरकुट्,पोंगा(त्या पिवळ्या नारंगी नळ्या),जांबुलवडी(हे असत चिंचेच पण आम्ही त्याला जांबुलवडीच म्हणायचो),गुलाबजाम(कशाने बनवतात माहीती नाही,पण गुलाबी असत म्हणुन हे नाव्),रसना पावडर - ही हातात तळव्यावर घेउन त्यावर जीभ फीरवायची(मला कुणी हे खाताना पाहुन माझ्याबद्दल काय मत बनवेल ह्याची तमा मी बाळगत नसे,मंदीराच्या पाय-यावर बसुन माझे चालु असायचे,खाउन झाले की त्यावर ईतर काही न खाता थंड पाणी पियायच्,पोटात जाउन 'रसना सरबत' तयार होत,एवढी अक्कल तेव्हा नसेल पण अस करायला मजा यायची) आणि जलजीरा पावडर

मद्त : नकळ्त सारे घड्ले स्च्रीन प्ले (पी डी य् फ ) कु थे मीळेल

लेखक जानम यांनी मंगळवार, 05/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
नकळ्त सारे घड्ले स्च्रीन प्ले (पी डी य् फ ) कु थे मीळेल ? आप्ल्याकडे अस्ल्यास क्रुपया ख. व. करा... ध्न्यवाद...