Skip to main content

सिंहगडावरची खादाडी

योगेश२४ यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनविषय:
विसोबा खेचर

सगळा प्रकार असह्य आहे..योगेशराव, मी आपला निषेध करतो..! :) शिवरायांच्या लाडक्या तानाजीला मानाचा मुजरा..! तात्या. -- प्रसिद्ध मुलाखतकार, नाट्य अभिनेत्री, सूत्रसंचालक, कथ्थक नृत्यांगना, स्तंभलेखिका आणि माझी मैत्रीण संपदा जोगळेकर-कुलकर्णी हे माझ्या 'गुण गाईन आवडी..' मधील आगामी व्यक्तिचित्र असून लौकरच मिपावर येईल..
06/10/2010 - 11:02 Permalink
विजुभाऊ

In reply to by परिकथेतील राजकुमार

फोटु बघुन आत्मा तृप्त झाला. हम्म पर्‍या पितृ पक्षात ही भाषा योग्य नव्हे. बाकी ते फोटो येकदम बेष्ट रे भाव
06/10/2010 - 13:01 Permalink
मिसळभोक्ता

In reply to by श्रावण मोडक

एवढेच नाही, तर योगेशरावांचा आयडी ब्लॉक करावा, ही नम्र विनंती. योगेश, कुठे फेडशील हे पाप?
06/10/2010 - 22:50 Permalink
गणपा

प्रकाशचित्रांतल्या सौंदर्याला कसलाही धक्का न देता टाकलेले वॉटरमार्क फार छान वाटले. वॉटरमार्क कसे आसावेत हे दाखवुन दिल्या बद्दल धन्यवाद :)
06/10/2010 - 13:41 Permalink

असेच म्हणतो. उत्तम उदाहरण. पण तरी हे जे जुलूम चालवले आहेत त्याबद्दल निषेध नोंदवल्याखेरीज राहणार नाही! ;)
06/10/2010 - 15:17 Permalink
भडकमकर मास्तर

In reply to by गणपा

काय फोटो राव.. अहाहा.. तोंडास पाणी सुटलेच.. आणि वॉटरमार्काबद्दल सहमत.... अजिबात विरस होऊ न देता टाकलेली पाणीखूण
06/10/2010 - 17:53 Permalink
बिपिन कार्यकर्ते

पहिला फोटो बघून मी वारलो आहे त्यामुळे बाकीचे पदार्थ आमच्या कावळ्याला खायला घालावेत नाही तर मिपावर भुताटकी येऊन या योगेश२४ आयडीचे सगळे या आधीचे आणि या नंतरचे धागे, प्रतिसाद, खरडी, व्यनि आपोआप डिलिट होईल. धन्यवाद.
06/10/2010 - 17:15 Permalink
योगेश२४

सगळ्यांच्या "प्रेमळ" प्रतिसादाबद्दल धन्यवाद :)
06/10/2010 - 22:24 Permalink
राजेश घासकडवी

लाळ सुटण्याच्या बाबतीत सर्वांशी सहमत. आपण कशी मज्जा केली हे दाखवून लोकांना जळवण्याच्या हीन प्रकाराबद्दल इतरांप्रमाणेच निषेध. मात्र तांत्रिक बाबी इतक्या सुंदर सांभाळल्या आहेत की त्या न जाणवता केवळ आतला ऐवजच डोळ्यावर येतो याबद्दल हॅट्स ऑफ. पहिल्या चित्रात उन्हातल्या शेंगा छान दिसतात, पण दुसऱ्या चित्रातल्या (पावसाळी ढगाळ हवेत दिसणाऱ्या) अधिक आवडल्या. आवळ्यांच्या फोटोला त्यातल्या सुरीच्या तीखटमीठवाल्या टोकाने बहार आली आहे. काकड्यांचा फोटो लाजवाब. अननस, कणसं आणि भजीही आवडली. ताटांमधल्या मांडणींची चित्रं तितकीशी आवडली नाहीत. ती इतर फोटोंना पूरक म्हणूनच छान वाटतात. असेच छान छान फोटो काढत रहा.
07/10/2010 - 02:01 Permalink
३_१४ विक्षिप्त अदिती

In reply to by राजेश घासकडवी

ताटाच्या फोटोत चटई धूसर केली असती किंवा काळा रंग मारला असता तर आणखी मजा आली असती. फोटो सुंदरच आहेत. वॉटरमार्कबद्दल गणपाशी सहमत. योगेशचा आयडी ब्लॉक करण्यालाही सहमती.
07/10/2010 - 11:32 Permalink
चित्रा

सर्वांचे बोलून झाले आहे, तेव्हा अजून काय बोलणार? ते तिखटमीठ घातले आहे ते आमच्या जखमांवर चोळण्यासाठी असावे.
07/10/2010 - 06:54 Permalink
आंसमा शख्स

सगळे चांगले फोटो. शेवटचे जेवणाचे फोटो आवडले. भाकरी आणि पिठले. बेस्ट असते.
07/10/2010 - 07:06 Permalink
योगेश२४

किती त्या सुंदर सुंदर प्रतिक्रिया ;-) फोटो दिसतच नायत>>>> :) :)
07/10/2010 - 08:39 Permalink
गांधीवादी

फोटो आवडले, आम्ही सिंहगडाच्या वार्या नेहमीच करत असतो, महिन्य्तून एकदाका होईना तिथे जाने होतेच, त्यामुळे जळजळ झाली नाही. कधीही हुक्की आली कि संध्याकाळी ४ ला गाडीला किक मारून ५, ५.३० पर्यंत सिंहगडावर. मग तिथे ५०-६० रुपयांत तिघांचे पोट भरून झाले कि परत रवाना. देव टाकीचे पाणी काय सांगू ? झक्कास. बाकी आम्ही पण पुढे मागे DIGITAL CAMERA घेतला कि अशेच फोटो टाकू.
07/10/2010 - 08:44 Permalink
डावखुरा

खरंच गांधीवादी... सग्ळ्यांच्या ईतक्या ज्वलंत प्रतिक्रीया{मी पण अपवाद नाहीच्चे मुळी}
07/10/2010 - 12:12 Permalink
गांधीवादी

In reply to by डावखुरा

अहो लालसा ताई, जे सात समुद्र पलीकडे बसले आहेत त्यांनाच जाणवते अशी जळजळ. आम्हाला परदेशी वर्णन ऐकून जळजळ होते. जे तिथे आहेत त्यांना इथली ओढ, जे इथे आहेत त्यांना तिथली ओढ. चालायचंच.
07/10/2010 - 12:42 Permalink
संजय अभ्यंकर

प्रचंड निषेध! निषेधाला शब्द अपूरे आहेत. बोरे पाहून तोंडाला पाणी सुटले.
31/10/2010 - 22:29 Permalink