Skip to main content

काही रेखाचित्रे

Published on गुरुवार, 28/10/2010
आज सहज जुन्या फाईली बघत असताना मी कधी तरी सहज म्हणून काढलेली रेखाचित्रे हाती लागली. ती इथे चिकटवली आहेत. आणखीही काही होती. पण सापडत नसल्याने सद्ध्या एवढीच चिकटवतो. कशी वाटली ते सांगा. काही सुधारणा सुचवाविशी वाटली तरी सांगा. ( कारण पुन्हा एकदा हा छंद चालू करावा असा विचार चालू आहे .) १. हे रेखाटन पै. मुहम्मद रफी यांच्या तरुणपणातील छायाचित्र पाहून काढले आहे. २. हा कोण हे आपण ओळखू शकाल ....

विवाहबाह्य संबंध आणि वैवाहिक स्थैर्य : नवे संशोधन

Published on गुरुवार, 28/10/2010
एकनिष्ठते मधून प्रेम सिद्ध होत नाही. अधिक वाचण्या साठी इथे भेट द्या... http://timesofindia.indiatimes.com/life-style/relationships/man-woman/Extra-marital-affairs-are-good-for-marriage-/articleshow/5395063.cms

एक राजकारणी संत : समर्थ रामदास

लेखक पारा
Published on गुरुवार, 28/10/2010
मी सध्याच काही आठवड्यांपूर्वी सज्जनगडावर गेलो होतो. तिथली एकूण शिस्त आणि व्यवस्था पाहून मी प्रभावित झालो. तिथल्या एका पुस्तकांच्या दुकानांतून मी हे पुस्तक निवडलं. 'एक राजकारणी संत : समर्थ रामदास'. हे पुस्तक म्हणजे एक व्याख्यानमाला आहे, रा. शं. वाळिंबे ह्याच्या ओघवत्या शैलीत. एकूण सात दिवस ही व्याख्यानमाला चालली, त्यात त्यांनी रामदासांच्या आयुष्यामधल्या अनेक पैलूंचं व्यवस्थित विवरण करून सांगितलं. हे पुस्तक वाचून मला ही पटलं की समर्थ रामदास खरोखर समर्थ का आहेत ते. आणि ते इतर संतमंडळींपासून कसे पूर्णतया वेगळे ठरतात.

चिऊचं घर शेणाचं...

Published on गुरुवार, 28/10/2010
एक होता काऊ एक होती चिऊ काऊचं घर होतं मेणाचं चिऊचं घर होतं शेणाचं एकदा काय झालं, जोराचा वारा आला चिऊचं घर उडून गेलं चिऊ आली काऊकडे तिला वाटलं, तो आपलं ऐकून घेईल त्याचं घर एवढं मोठं, त्यात जागा देईल काऊदादा काऊदादा दार उघड ""नको, माझं घर लहान आहे'' काऊदादा काऊदादा दार उघड" "नको, माझं घर खराब होईल'' काऊदादा काऊदादा दार उघड ""नको, माझे कपडे खराब होतील'' काऊदादा काऊदादा दार उघड ""नको, मला जायला उशीर होईल'' ""असं काय रे करतोस? माझं घर वाहून गेलंय. सगळे छळतील. टोचतील, त्रास देतील. तू मला घरी घे; दाणे दे, पाणी दे. जरा वेळाने बरी होईन.
काव्यरस

मोती साबण

Published on गुरुवार, 28/10/2010
दिवाळी म्हटली कि अभ्यंग स्नान आले..कारखान्यात ला कामगार वर्ग याला पहिली अंघोळ.. दुसरी अंघोळ असे म्हणायचा तर गावाकडे पुरुषाचे नहाणे???..व बायकांचे नहाणे असे म्हणायचे.. दिवाळीच्या अभ्यंग स्नानाला "मोती" साबण साधारण पणे वापरला जातो....दिवाळीच्या अभ्यंग स्नानाला "मोती" साबणच का? हे पण एक कोडे आहे.... एक खरे....... हि परंपरा वर्षानु वर्षे चालत आली आहे व त्यात खंड नाहि ... आपल्याला मोती साबण आवडतो का?

अरे विठ्या विठ्या ...

लेखक अवलिया
Published on गुरुवार, 28/10/2010
संत जनाबाई. महाराष्ट्राच्या भूमीत समाजसुधारणा, भक्तीमार्गदर्शन या हेतुन प्रेरीत होऊन जे अनेक संत होऊन गेले त्यातले एक अग्रणी नाव. नामयाची दासी, दासी जनी, जनी नामयाची यासारख्या अनेक नावांनी स्वतःला संबोधुन विठ्ठल भक्तीत अखंड रममाण झालेली एक स्त्री संत. कधी आवडीने विठ्ठलाचे नाम घेत तल्लीन होऊन भजणारी तर कधी त्याच्यावर संतापणारी जनी. एक ना अनेक अशी तिची रुपे आपल्याला तिच्या अभंगातुन पहायला मिळतात.

हे शक्य आहे का...?

Published on गुरुवार, 28/10/2010
भारतातील दलित नेते शिक्षणात आरक्षण असावे म्हणून आंदोलने करतात. त्याचा फायदा केवळ मूठभर दलित विद्यार्थ्य़ांना होऊ शकतॊ. यातील बरेचसे विद्यार्थी सामान्य दर्जाच्या माध्यमिक शाळांतून शिकलेले असल्याने बरेचदा उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळूनही पूर्णत: फायदा घेऊ शकत नाही. मार्टीन ल्युथर किंग यांनी हार्वर्ड येथे प्रवेश मिळविण्यासाठी जाळ्पोळ केली नाही, तर संपूर्ण माध्यमिक शिक्षणपद्धती समतेच्या तत्त्वावर व उच्च दर्जाची असावी यासाठी आग्रह धरला. भारतातील सामाजिक चळवळीने असाच आग्रह धरला तरच ज्ञानगंगा तळागाळापर्यंत पोहोचू शकेल.

मग,काय केलस ग या वाढदिवसाला ?

लेखक सुहास..
Published on गुरुवार, 28/10/2010
मग,काय केलस ग या वाढदिवसाला ? विसरलीस का त्या मंद, मृदुगंधाला पाहताच हरवलेल्या आपल्या शब्दांना बिलगलीस नकळत हरवून स्वतःला मग,काय केलस ग या वाढदिवसाला ? विसरलीच असशील त्या गावाला भिजलेल्या त्या चिंब पावसाला ओंठावर विसावलेल्या त्या थेंबाला मग,काय केलस ग या वाढदिवसाला ? डोळ्यातून मी व्यक्त होताना, तुला आठवतो का पहिलाच स्पर्श केलेला माझा हात तुझ्या केसांत विसावलेला मग,काय केलस ग या वाढदिवसाला ? माझी आठवण नको तुझ्या मनाला आपल्या हळूवार जपलेल्या त्या क्षणांला म्हणून विसरलीस ना आपल्या नात्याला मग,काय केलस ग या वाढदिवसाला ? हसताना हलकेच ओघळणार्‍या अश्रुला निक्षुन बजावताना, झालेल्या यातनेला

आंधळी कोशिंबीर

Published on गुरुवार, 28/10/2010
सुमारे १००० वर्षांपूर्वी अरबी राष्ट्रांमध्येच जगाची वैचारिक प्रगती झाली. बगदाद व कैरॊ ही जागतिक संस्कृतीची केंद्रस्थाने बनली . नंतरच्या १००० हजार वर्षांत त्या प्रदेशांची अधोगती झाली. भ्रष्टाचार, बेजबाबदारपणा, संपत्तीचे ऒंगळ प्रदर्शन, आपापसातील भांडण, लढाया यामुळे अरब राष्ट्रे पारतंत्र्यात गेली. स्वतंत्र झाल्यावरही काही वर्षे तेथील नेते आंधळी कोशिंबीर खेळत होते. आता त्यांनी डोळ्यांवरची पट्टी काढली आहे. आपल्या समाजाचे भवितव्य शिक्षणावर अवलंबून आहे, हे त्यांना उमगले आहे. त्यामुळे या देशात स्वत: राष्ट्राध्यक्ष व त्यांची पत्नी शिक्षण क्षेत्रात जातीने लक्ष देतात, भरपूर पैसा ऒततात.